Skip to content

Stones बद्दल बायबलमधील वचने

79 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दुसर्‍या दिवशी याकोब अगदी पहाटेस उठला आणि जो धोंडा त्याने उशाशी घेतला होता, तो त्याने स्तंभ म्हणून उभा केला आणि त्यावर जैतुनाचे तेल ओतले.

  2. त्याने त्या जागेचे नाव बेथेल असे ठेवले, जरी त्या नगराचे नाव लूज असे होते.

  3. नंतर याकोबाने नवस केला, “जर परमेश्वर माझ्यासोबत असतील, या प्रवासात माझे रक्षण करतील, मला अन्नपाणी, वस्त्र देतील,

  4. व मला आपल्या पित्याच्या घरी सुखरुपपणे परत आणतील, तर याहवेह माझे परमेश्वर होतील

  5. आणि हा जो धोंडा मी स्तंभ म्हणून उभा केला आहे ते परमेश्वराचे भवन होईल आणि जे सर्वकाही ते मला देतील, त्यातील प्रत्येकाचा दशांश मी त्यांना अर्पण करेन.”

  6. तेव्हा याकोबाने स्तंभ म्हणून एक धोंडा उभा केला;

  7. आणि याकोबाने आपल्या नातेवाईकांना म्हटले, “काही दगड गोळा करा.” त्यांनी त्यांची रास केली, मग त्या सर्वांनी दगडाच्या राशी जवळ बसून एकत्र भोजन केले.

  8. मग त्या राशीला लाबानाच्या भाषेत यगर-सहदूथा आणि याकोबाच्या भाषेत गलेद असे नाव दिले.

  9. लाबान म्हणाला, “आपल्या दोघांपैकी कोणीही एकमेकांविरुद्ध अतिक्रमण केले, तर ही दगडांची रास त्याला साक्षी राहील.” याकारणास्तव या जागेला गलेद म्हणतात.

  10. यावरून तिला मिस्पाह असेही नाव देण्यात आले; कारण लाबान म्हणाला, “आपण एकमेकांपासून दूर जाऊ तेव्हा आपण आपला करार पाळू, याहवेह आपल्यावर लक्ष ठेवो.”

  11. तू माझ्या मुलींना निर्दयतेने वागविलेस किंवा अन्य स्त्रिया केल्यास, “जरी आपल्यासोबत कोणीही नसेल, तरीपण परमेश्वर तुझ्यात व माझ्यात साक्षी आहेत.”

  12. लाबान आणखी याकोबास म्हणाला, “ही रास आणि हा स्तंभ तुझ्या व माझ्या दरम्यान ठेवला आहे.

  13. हे ओलांडून मी तुझ्यावर हल्ला करणार नाही किंवा तू देखील ही रास व हा स्तंभ ओलांडून माझ्यावर हल्ला करणार नाही. ही रास व स्तंभ याची साक्ष आहे.

  14. मग याहवेह मोशेला म्हणाले, “तू पर्वतावर माझ्याकडे ये आणि येथेच राहा आणि लोकांसाठी सूचना म्हणून नियम आणि आज्ञा ज्या मी दगडी पाट्यांवर लिहिल्या आहेत त्या मी तुला देईन.”

  15. जेव्हा याहवेहने सीनाय पर्वतावर मोशेबरोबर आपले बोलणे संपविले, तेव्हा त्यांनी मोशेला कराराच्या नियमाच्या दोन दगडी पाट्या दिल्या, ज्या परमेश्वराच्या बोटाने कोरलेल्या होत्या.

  16. मग याहवेह मोशेला म्हणाले, “पहिल्या पाट्यांसारख्याच दोन दगडी पाट्या तू घडव, मग तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होते ते मी त्यावर लिहेन.

  17. तू सकाळी तयार राहा आणि मग सीनाय पर्वतावर ये. तिथे डोंगरमाथ्यावर माझ्यासमोर स्वतःला सादर कर.

  18. तुझ्याबरोबर कोणीही येऊ नये किंवा डोंगरावर कुठेही इतर कोणी दृष्टीस पडू नये; गुरे आणि शेरडेमेंढरे यांनी सुद्धा डोंगरासमोर चरू नये.”

  19. मग मोशेने पहिल्यासारख्या दोन दगडी पाट्या घडवून घेतल्या आणि त्या दोन दगडी पाट्या आपल्या हातात घेऊन याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे मोठ्या पहाटे सीनाय पर्वतावर गेला.

  20. त्यांनी आपला करार तुम्हाला घोषित केला, दहा आज्ञा, ज्या पालन करण्याची त्यांनी आज्ञा दिली आणि त्यांनी त्या दोन दगडी पाट्यांवर लिहिल्या.

  21. तिथे तुम्ही लाकूड आणि दगडाच्या मानवनिर्मित दैवतांची सेवा कराल, जे पाहू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत, खाऊ शकत नाहीत किंवा वासही घेऊ शकत नाहीत.

  22. याहवेहने या आज्ञा तुमच्यातील प्रत्येकाला अग्नी, मेघ व निबिड अंधकार यांनी वेष्टिलेल्या पर्वतावरून उंच आवाजात उच्चारून दिल्या; व त्यात अधिक काहीही जोडले नाही. त्यांनी त्या दोन दगडी पाट्यांवर लिहून माझ्याजवळ दिल्या.

  23. याहवेहने तुमच्याशी केलेल्या कराराच्या दगडी पाट्या स्वीकारण्यासाठी मी त्या पर्वतावर चढून गेलो होतो. तिथे मी चाळीस दिवस व चाळीस रात्री होतो; त्या काळात मी भाकर खाल्ली नाही आणि पाणीदेखील प्यालो नाही.

  24. याहवेहने दोन दगडी पाट्या मला दिल्या, ज्यावर परमेश्वराच्या बोटाने लिहिलेले होते. तुम्ही पर्वताच्या पायथ्याशी गोळा झालेले होता, त्यावेळी याहवेहने तुमच्याशी बोलताना पर्वतावर अग्नीतून सांगितलेल्या सर्व आज्ञा त्यावर होत्या.

  25. चाळीस दिवस व चाळीस रात्री लोटल्यानंतर, याहवेहने कराराच्या दोन दगडी पाट्या मला दिल्या.