Skip to content

Stones बद्दल बायबलमधील वचने: Hewn

10 वचने · 16 पैलू

Hewn बद्दल वचने

  1. मग याहवेह मोशेला म्हणाले, “पहिल्या पाट्यांसारख्याच दोन दगडी पाट्या तू घडव, मग तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होते ते मी त्यावर लिहेन.

  2. त्यावेळी याहवेहने मला सांगितले, “पहिल्या पाट्यांसारख्याच आणखी दोन दगडी पाट्या तू घडव आणि त्या घेऊन पर्वतावर माझ्याकडे ये. एक लाकडी कोशही तयार कर.

  3. राजाच्या आज्ञेनुसार त्यांनी मंदिराच्या पायासाठी खाणीतून उच्च दर्जाचे मोठे दगडे काढले.

  4. आणि त्याने आतील अंगणात वळणदार दगडांच्या तीन रांगा आणि छाटलेल्या गंधसरूच्या तुळयांची एक रांग बनविली.

  5. या सर्व इमारती, बाहेरच्या बाजूपासून ते दरबारापर्यंत आणि त्यांच्या पायापासून छपराच्या वळचणीपर्यंत, उच्च प्रतीचे दगड घेऊन त्यांना आकारात कापून आतील व बाहेरील बाजूने त्यांना गुळगुळीत बनवून वापरले होते.

  6. गवंडी आणि दगड फोडणारे यांना पैसे दिले. त्यांनी याहवेहच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी लाकूड आणि दगड घडविणे केले आणि मंदिराच्या दुरुस्तीचे इतर सर्व खर्च पूर्ण केले.

  7. सुतार, बांधकाम करणारे, गवंडी यांना द्यावा आणि मंदिराच्या डागडुजीसाठी लागणारी लाकडे व घडीव दगड विकत घेण्यात यावे.

  8. दावीदाने इस्राएलमध्ये राहणार्‍या सर्व परकियांना एकत्र करून परमेश्वराच्या मंदिरासाठी चिरे घडविण्याची आज्ञा दिली.

  9. ज्या इमारती नाश होण्यासाठी यहूदीयाच्या राजांनी पडू दिल्या होत्या, त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी बांधकाम करणारे व सुतार यांना घडीव दगड आणि इमारतीचे वासे व तुळईची लाकडे खरेदी करण्यासाठीसुद्धा पैसे दिले.

  10. मोठमोठे दगड ठेऊन माझ्या मार्गात बाधा घातली आहे. त्यांनी माझी वाट आडवळणांची केली आहे.