Stones बद्दल बायबलमधील वचने: Idols made of
Idols made of बद्दल वचने
तिथे तुम्ही लाकूड आणि दगडाच्या मानवनिर्मित दैवतांची सेवा कराल, जे पाहू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत, खाऊ शकत नाहीत किंवा वासही घेऊ शकत नाहीत.
तुम्हाला किंवा तुमच्या पूर्वजांना कधीही माहीत नसलेल्या राष्ट्रांमध्ये याहवेह तुम्हाला आणि तुम्ही स्वतःवर नेमलेल्या राजाला हद्दपार करतील. तिथे तुम्ही इतर दैवतांची उपासना कराल, जे लाकडाचे आणि दगडाचे दैवत असेल.
पृथ्वीच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत असलेल्या निरनिराळ्या राष्ट्रांमध्ये याहवेह तुमची पांगापांग करतील. तिथे तुम्ही किंवा तुमच्या पूर्वजांनी ज्यांची कधीही उपासना केली नाही—अशा लाकडाच्या आणि दगडाच्या दैवतांची तुम्ही उपासना कराल.
तुम्ही त्यांच्यामध्ये घृणास्पद वस्तू आणि लाकडाच्या आणि दगडाच्या, चांदीच्या आणि सोन्याच्या अमंगळ मूर्ती पाहिल्या आहेत.
आणि त्यांनी त्यांची दैवते अग्नीत फेकून दिली आहेत, कारण त्या मूर्ती परमेश्वर नव्हत्या. ते तर मनुष्याने घडविलेले लाकूड आणि दगड होते.
आणि त्यांनी त्यांची दैवते अग्नीत फेकून दिली आहेत, कारण त्या मूर्ती परमेश्वर नव्हत्या. ते तर मनुष्याने घडविलेले लाकूड आणि दगड होते.
“ ‘तुम्ही म्हणता, “राष्ट्रांप्रमाणे, जगाच्या लोकांप्रमाणे आम्हाला व्हायचे आहे, जे लाकूड व दगडाची सेवा करतात.” परंतु तुमच्या मनात जे आहे, ते कधीही घडणार नाही.