Stones बद्दल बायबलमधील वचने: Memorial pillars of
Memorial pillars of बद्दल वचने
दुसर्या दिवशी याकोब अगदी पहाटेस उठला आणि जो धोंडा त्याने उशाशी घेतला होता, तो त्याने स्तंभ म्हणून उभा केला आणि त्यावर जैतुनाचे तेल ओतले.
त्याने त्या जागेचे नाव बेथेल असे ठेवले, जरी त्या नगराचे नाव लूज असे होते.
नंतर याकोबाने नवस केला, “जर परमेश्वर माझ्यासोबत असतील, या प्रवासात माझे रक्षण करतील, मला अन्नपाणी, वस्त्र देतील,
व मला आपल्या पित्याच्या घरी सुखरुपपणे परत आणतील, तर याहवेह माझे परमेश्वर होतील
आणि हा जो धोंडा मी स्तंभ म्हणून उभा केला आहे ते परमेश्वराचे भवन होईल आणि जे सर्वकाही ते मला देतील, त्यातील प्रत्येकाचा दशांश मी त्यांना अर्पण करेन.”
तेव्हा याकोबाने स्तंभ म्हणून एक धोंडा उभा केला;
आणि याकोबाने आपल्या नातेवाईकांना म्हटले, “काही दगड गोळा करा.” त्यांनी त्यांची रास केली, मग त्या सर्वांनी दगडाच्या राशी जवळ बसून एकत्र भोजन केले.
मग त्या राशीला लाबानाच्या भाषेत यगर-सहदूथा आणि याकोबाच्या भाषेत गलेद असे नाव दिले.
लाबान म्हणाला, “आपल्या दोघांपैकी कोणीही एकमेकांविरुद्ध अतिक्रमण केले, तर ही दगडांची रास त्याला साक्षी राहील.” याकारणास्तव या जागेला गलेद म्हणतात.
यावरून तिला मिस्पाह असेही नाव देण्यात आले; कारण लाबान म्हणाला, “आपण एकमेकांपासून दूर जाऊ तेव्हा आपण आपला करार पाळू, याहवेह आपल्यावर लक्ष ठेवो.”
तू माझ्या मुलींना निर्दयतेने वागविलेस किंवा अन्य स्त्रिया केल्यास, “जरी आपल्यासोबत कोणीही नसेल, तरीपण परमेश्वर तुझ्यात व माझ्यात साक्षी आहेत.”
लाबान आणखी याकोबास म्हणाला, “ही रास आणि हा स्तंभ तुझ्या व माझ्या दरम्यान ठेवला आहे.
हे ओलांडून मी तुझ्यावर हल्ला करणार नाही किंवा तू देखील ही रास व हा स्तंभ ओलांडून माझ्यावर हल्ला करणार नाही. ही रास व स्तंभ याची साक्ष आहे.
“लोकातील प्रत्येक गोत्रातून एक अशा बारा पुरुषांची निवड कर,
आणि त्यांना सांग की त्यांनी यार्देनेच्या मध्यभागातून, म्हणजे जिथे याजक उभे आहेत, तिथून बारा धोंडे उचलून घ्यावे आणि ते तुमच्याबरोबर घेऊन आज रात्री ज्या ठिकाणी तुम्ही राहणार आहात त्या ठिकाणी ठेवावे.”
तेव्हा यहोशुआने इस्राएलच्या प्रत्येक गोत्रातून एक अशा बारा पुरुषास निवडले व त्यांना बोलाविले,
आणि यहोशुआ त्यांना म्हणाला, “यार्देनेच्या मध्यभागी जिथे याहवेह तुमच्या परमेश्वराचा कोश आहे त्याच्यापुढे जा. तिथून तुमच्यातील प्रत्येकाने एक धोंडा खांद्यावर वाहून आणावा. इस्राएलच्या बारा गोत्रातील प्रत्येक गोत्रामागे एक, असे एकूण बारा धोंडे तुम्ही बारा जणांनी आणावे.
ते आपल्यासाठी एक चिन्ह असेल, यासाठी की जेव्हा भावी काळात तुमची मुलेबाळे तुम्हाला विचारतील, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’
तेव्हा तुम्हाला त्यांना सांगता येईल, याहवेहच्या कराराच्या कोशासमोर यार्देन नदीचा वाहता प्रवाह थांबला होता. जेव्हा त्यांनी यार्देन पार केली, तेव्हा यार्देन नदीच्या पाण्याचा प्रवाह दुभागला होता. हे धोंडे इस्राएली लोकांसाठी कायमचे स्मारक चिन्ह असावे.”
तेव्हा इस्राएली लोकांनी यहोशुआने सांगितल्याप्रमाणे केले. याहवेहने यहोशुआला आज्ञापिल्यानुसार प्रत्येक गोत्रामागे एक याप्रमाणे बारा धोंडे त्यांनी यार्देन नदीच्या मध्यभागातून उचलले व ज्या ठिकाणी त्यांनी छावणी दिली, त्या ठिकाणी ते धोंडे ठेवले.
यहोशुआने यार्देन नदीच्या मध्यभागी असलेले बारा धोंडे जिथे कराराचा कोश वाहून नेणारे याजक उभे होते तिथे उभे केले आणि आजपर्यंत ते तिथेच आहेत.
आणि यहोशुआने गिलगाल येथे यार्देनेतून बाहेर काढलेल्या बारा धोंड्यांची रचना केली.
तो इस्राएली लोकांना म्हणाला, “भविष्यकाळात तुमचे वंशज त्यांच्या वडिलांना विचारतील, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’
त्यांना सांग, ‘इस्राएली लोक यार्देन नदीतून कोरड्या जमिनीवरून पलीकडे आले.’
कारण याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्ही यार्देन नदी पार करेपर्यंत तुमच्यासमोर नदीचे पात्र कोरडे ठेवले. याहवेह तुमच्या परमेश्वरांनी यार्देन नदीचे जसे केले तसेच त्यांनी आम्ही लाल समुद्र पार करेपर्यंत तो कोरडा केला होता.