Hagar बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
ही अब्राहामाचा पुत्र इश्माएलची वंशावळ आहे, जो साराहची इजिप्तमधील दासी हागारेपासून जन्मला.
ही इश्माएलाच्या पुत्रांची त्यांच्या जन्मानुसार यादी: इश्माएलाचा प्रथमपुत्र नबायोथ, नंतर केदार, अदबील, मिबसाम,
मिश्मा, दूमाह, मस्सा,
हदद, तेमा, यतूर, नापीश आणि केदमाह.
त्यांनी हगरी, यतूर, नापीश व नोदाब यांच्याशी युद्ध केले.
त्यांच्याशी लढण्यास त्यास साहाय्य मिळून परमेश्वराने हगरी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर लोकांना त्यांच्या हातात दिले, कारण युध्दसमयी त्यांनी परमेश्वराचा धावा केला; त्यांनी त्यांच्यावर भरवसा ठेवला म्हणून त्यांनी त्यांची प्रार्थना ऐकली.
त्यांनी त्यांची गुरे जप्त केली—पन्नास हजार उंट, दोन लक्ष पन्नास हजार मेंढरे, दोन हजार गाढवे व एक लक्ष पुरुष कैद करून नेले.
बऱ्याच लोकांचा संहार झाला, कारण हे युद्ध परमेश्वराचे होते. ते लोक या प्रदेशात बंदिवासाच्या समयापर्यंत वस्ती करून राहिले.
अलंकारिक रूपात या गोष्टी घेतल्या आहेत पाहा: या स्त्रिया दोन करार आहेत. त्यापैकी एक करार आहे सीनाय पर्वतावर केलेला करार ज्यामुळे दास्यत्वाच्या संतानाचा जन्म होतो: ही हागार आहे.
आता हागार ही अरबस्थानातील सीनाय पर्वत असा आहे आणि आता अस्तित्वात असलेल्या यरुशलेम शहराचे प्रतीक आहे, कारण ती तिच्या संतानाबरोबर दास्यात आहे.