Skip to content

Countenance बद्दल बायबलमधील वचने

11 वचने · 9 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. जेव्हा मोशे आपल्या हातात कराराच्या नियमाच्या दोन दगडी पाट्या घेऊन सीनाय पर्वतावरून खाली उतरून आला, तेव्हा याहवेहबरोबर बोलल्यामुळे त्याचा चेहरा तेजस्वी झाला होता, हे त्याच्या लक्षात आले नाही.

  2. जेव्हा अहरोन व सर्व इस्राएल लोकांनी मोशेला पाहिले, त्याचा चेहरा तेजस्वी होता आणि ते त्याच्याजवळ येण्यास घाबरत होते.

  3. पण मोशेने त्यांना बोलाविले; म्हणून अहरोन व समुदायाचे वडीलजन परत त्याच्याजवळ गेले व तो त्यांच्याबरोबर बोलला.

  4. यानंतर सर्व इस्राएली लोक त्याच्याजवळ आले आणि मोशेने त्यांना त्या सर्व आज्ञा दिल्या, ज्या याहवेहने सीनाय पर्वतावर त्याला दिल्या होत्या.

  5. मोशेने लोकांशी आपले संभाषण संपविले व आपल्या चेहर्‍यावर पडदा घातला.

  6. पण जेव्हा मोशे याहवेहबरोबर बोलण्यासाठी त्यांच्या समक्षतेत जात असे, बाहेर जाईपर्यंत तो पडदा काढत असे. जेव्हा तो बाहेर येई व त्याला जे काही आज्ञापिले गेले आहे ते तो इस्राएली लोकांना सांगत असे,

  7. इस्राएली लोकांनी पाहिले की मोशेचा चेहरा तेजस्वी होता. मग मोशे याहवेहबरोबर बोलावयास जाईपर्यंत आपल्या चेहर्‍यावर पडदा परत घालत असे.

  8. म्हणून राजाने मला विचारले, “तू आजारी नसताना तुझा चेहरा एवढा खिन्न का दिसतो? तुझ्या मनात निराशा असल्याशिवाय असे होणार नाही.” मी घाबरलो,

  9. पण मी राजाला उत्तर दिले, “महाराज, अनंतकाळ चिरंजीव राहोत! माझा चेहरा दुःखी का असू नये, कारण ज्या नगरामध्ये माझ्या पूर्वजांना पुरले आहे, त्या नगराचा विध्वंस झाला आहे व त्याच्या वेशी जाळून टाकल्या आहेत.”

  10. राजाने स्वतःच्या भोजनातून रोजचे भोजन आणि द्राक्षारसातून देण्याचा आदेश दिला. त्यांना तीन वर्षे प्रशिक्षित करावे आणि त्यानंतर त्यांना राजाच्या सेवेत आणावे.

  11. जे निवडलेले होते, त्यामध्ये काही यहूदाह वंशातील होते: दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्‍याह.