Jeshua
Jeshua चा उल्लेख असलेली वचने
लेवीचे वंशज: येशूआ व कदमीएलचे (होदव्याहचे कुटुंबाद्वारे) 74,
परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामाची सर्व देखरेख येशूआ व त्याचे बंधू व पुत्र, तसेच (यहूदाहचे वंशज) कदमीएल व त्याचे पुत्र, हेनादादचे पुत्र व नातेवाईक यांच्यावर सोपविली होती. हे सर्वजण लेवी होते.
लेवी: यांचे वंशज: येशूआचे (कदमीएलचे कुटुंबातील होदव्याहचे कुटुंबाद्वारे) 74.
लेवी—येशूआ, बानी, शेरेब्याह, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीयाह, मासेयाह, कलीता, अजर्याह, योजाबाद, हानान व पेलतियाह—यांनी तिथे उभे असलेल्या लोकांना नियमशास्त्राची माहिती स्पष्ट करून सांगितली.
लेव्यांसाठी नेमलेल्या पायऱ्यावर उभे राहून येशूआ, बानी, कदमीएल, शबन्याह, बुन्नी, शेरेब्याह, बानी व कनानी या लेव्यांनी याहवेह त्यांच्या परमेश्वरासमोर आपला आवाज उंचाविला.
मग लेवी—येशूआ, कदमीएल, बानी, हशबन्याह, शेरेब्याह, होदीयाह, शबन्याह व पथह्याह—हे लोकांना म्हणाले: “उभे राहा आणि याहवेह तुमच्या परमेश्वराची स्तुती करा, कारण ते अनादि काळापासून शाश्वत परमेश्वर आहेत.” “तुमचे वैभवी नाव धन्य असो आणि ते सर्व प्रशंसा व स्तवनाच्या उच्चस्थानी राहो.
लेवी: अजन्याहचा पुत्र येशूआ, हेनादादाचा पुत्र बिन्नुई, कदमीएल,
लेवी हे होते, येशूआ, बिन्नुई, कदमीएल, शेरेब्याह, यहूदाह, मत्तन्याह व त्याचे सहकारी उपकारस्तुतीच्या उपासनेसाठी जबाबदार होते.