Skip to content

Sherebiah बद्दल बायबलमधील वचने

8 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. परमेश्वराच्या कृपेचा हात आमच्यावर असल्याने त्यांनी आम्हाकडे इस्राएलचा पुत्र लेवीचा वंशज, महलीचा पुत्र शेरेब्याह नावाचा एक सुज्ञ मनुष्य पाठविला. त्याच्याबरोबर त्याचे पुत्र व भाऊ मिळून एकूण 18 जण होते.

  2. मी याजकातून बारा पुढार्‍यांची नेमणूक केली ते शेरेब्याह, हशब्याह व इतर दहा याजकबंधू होते.

  3. लेवी—येशूआ, बानी, शेरेब्याह, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीयाह, मासेयाह, कलीता, अजर्‍याह, योजाबाद, हानान व पेलतियाह—यांनी तिथे उभे असलेल्या लोकांना नियमशास्त्राची माहिती स्पष्ट करून सांगितली.

  4. लेव्यांसाठी नेमलेल्या पायऱ्यावर उभे राहून येशूआ, बानी, कदमीएल, शबन्याह, बुन्नी, शेरेब्याह, बानी व कनानी या लेव्यांनी याहवेह त्यांच्या परमेश्वरासमोर आपला आवाज उंचाविला.

  5. मग लेवी—येशूआ, कदमीएल, बानी, हशबन्याह, शेरेब्याह, होदीयाह, शबन्याह व पथह्याह—हे लोकांना म्हणाले: “उभे राहा आणि याहवेह तुमच्या परमेश्वराची स्तुती करा, कारण ते अनादि काळापासून शाश्वत परमेश्वर आहेत.” “तुमचे वैभवी नाव धन्य असो आणि ते सर्व प्रशंसा व स्तवनाच्या उच्चस्थानी राहो.

  6. जक्कूर, शेरेब्याह, शबन्याह,

  7. लेवी हे होते, येशूआ, बिन्नुई, कदमीएल, शेरेब्याह, यहूदाह, मत्तन्याह व त्याचे सहकारी उपकारस्तुतीच्या उपासनेसाठी जबाबदार होते.

  8. त्यावेळी लेवीचे कुलप्रमुख—हशब्याह, शेरेब्याह, व कदमीएलचा पुत्र येशूआ व त्यांचे सहकारी. परमेश्वराचा मनुष्य दावीदच्या आज्ञेप्रमाणे मंदिरात स्तवन व उपकारस्मरणाच्या वेळी त्यांचे कुलबांधव समोरासमोर उभे राहून एकमेकांना प्रतिसाद देत असत.