Skip to content

Levites बद्दल बायबलमधील वचने

186 वचने · 17 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. म्हणून मोशे छावणीच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहिला व म्हणाला, “जे कोणी याहवेहच्या पक्षाचे आहे, त्यांनी माझ्याकडे यावे.” तेव्हा लेवीचे सर्व लोक त्याच्याकडे आले.

  2. मग मोशे त्यांना म्हणाला, “याहवेह इस्राएलांचे परमेश्वर असे म्हणतात: ‘प्रत्येकाने आपली तलवार कंबरेस बांधावी. छावणीतून एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत फिरत, प्रत्येकाने आपला भाऊ आणि मित्र व शेजारी यांना जिवे मारून टाकावे.’ ”

  3. मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे लेवीच्या लोकांनी केले आणि त्या दिवशी अंदाजे तीन हजार लोक मरण पावले.

  4. परंतु लेवी पूर्वजांच्या गोत्रांची गणना मात्र इतरांबरोबर करण्यात आली नाही.

  5. याहवेहने मोशेला सांगितले होते:

  6. “लेवी गोत्राची गणती करू नये किंवा इस्राएलच्या जनगणनेमध्ये त्यांचा समावेश करू नये.

  7. परंतु कराराच्या नियमाचा निवासमंडप; त्यातील सामुग्री व त्यासंबंधाचे जे काही आहे त्यावर लेवींची प्रमुख म्हणून नेमणूक कर. त्यांनी निवासमंडप व त्यातील सामुग्री वाहून न्यावी; त्यांनी त्याची काळजी घ्यावी व त्याभोवती आपला डेरा उभारावा.

  8. ज्यावेळी निवासमंडप पुढे जायचा असेल, त्यावेळी लेव्यांनीच तो खाली काढावा आणि ज्यावेळी निवासमंडप उभारावयाचा असेल त्यावेळी लेव्यांनीच तो उभारावा. इतर कोणी निवासमंडपाच्या जवळ गेल्यास त्याला जिवे मारावे.

  9. इस्राएली लोकांनी आपआपल्या दलानुसार, प्रत्येकाने आपआपल्या छावणीत, आपआपल्या झेंड्याखाली आपले डेरे द्यावे.

  10. परंतु लेव्यांनी आपले डेरे कराराच्या निवासमंडपाच्या सभोवती उभारावे, म्हणजे इस्राएली समुदायाविरुद्ध माझा क्रोध पेटणार नाही. लेव्यांनी कराराच्या नियमाच्या निवासमंडपाची जबाबदारी घेऊन त्याची काळजी घ्यावी.”

  11. याहवेहने मोशेला जसे आज्ञापिले होते, त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी सर्वकाही केले.

  12. “लेवीच्या गोत्राने अहरोन याजकाला मदत करावी म्हणून तू त्यांना त्याच्यासमोर सादर कर.

  13. त्यांनी सभामंडपात त्याच्यासाठी आणि संपूर्ण समुदायासाठी निवासमंडपाचे काम करून कर्तव्ये पार पाडावीत.

  14. सभामंडपाच्या सर्व सामानाची त्यांनी काळजी घ्यावी, निवासमंडपाचे काम करून इस्राएली लोकांची कर्तव्ये पूर्ण करावी.

  15. यास्तव लेव्यांना अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या हाती द्यावे; संपूर्ण इस्राएली लोकांमधून ते अहरोनाला पूर्णपणे देण्यात आलेले आहेत.

  16. याजकाची सेवा करण्यासाठी अहरोन व त्याच्या पुत्रांची नेमणूक करावी. इतर दुसरे कोणी पवित्रस्थानाच्या जवळ आले, तर त्यास जिवे मारावे.”

  17. आणि याहवेह मोशेला म्हणाले,

  18. “इस्राएली लोकांतील प्रत्येक स्त्रीच्या पोटी प्रथम जन्मलेल्या पुत्रांच्या ऐवजी मी लेव्यांना घेतले आहे. लेवी लोक माझे आहेत,

  19. कारण सर्व प्रथम जन्मलेले माझे आहेत. ज्या दिवशी इजिप्तमध्ये मी सर्व प्रथम जन्मलेले मारून टाकले, त्या दिवशी इस्राएलातील प्रत्येक प्रथम जन्मलेले मी माझ्यासाठी समर्पित करून घेतले, ते मनुष्य असो किंवा पशू, ते माझे आहेत, मीच याहवेह आहे.”

  20. याहवेहने पुन्हा मोशेला सीनाय रानात सांगितले,

  21. “आता तू लेवींची त्यांच्या घराण्यानुसार व कुळानुसार गणती करावी. एक महिन्याच्या व त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक पुरुषाची गणती करावी.”

  22. याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने लेव्यांची गणती केली.

  23. लेवीच्या पुत्रांची नावे ही: गेर्षोन, कोहाथ आणि मरारी.

  24. गेर्षोनाच्या कुळांची नावे ही होती: लिब्नी आणि शिमी.

  25. कोहाथाची कुळे: अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जीएल.