Sinai
28.5300, 33.9700 गूगल नकाशावर पाहा
Sinai चा उल्लेख असलेली वचने
इजिप्त देशातून बाहेर आल्यावर, दुसर्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी इस्राएलचा समुदाय एलीम येथून निघून एलीम व सीनायच्या मध्ये जे सीन रान आहे त्याकडे आला.
इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर आल्यावर तिसर्या महिन्याच्या पहिल्या दिवशी; याच दिवशी ते सीनायच्या रानात आले.
रफीदीम येथून निघाल्यावर, त्यांनी सीनायच्या रानात प्रवेश केला आणि इस्राएल त्या ठिकाणी रानात पर्वतापुढे तळ देऊन राहिले.
याहवेहनी हे नियम सीनाय पर्वतावर मोशेला दिले. सीनायच्या रानात इस्राएली लोकांना याहवेहप्रीत्यर्थ कोणती अर्पणे आणावी म्हणून मोशेला हे नियम देण्यात आले.
इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आल्यावर, दुसर्या वर्षाच्या दुसर्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानात सभामंडपामध्ये याहवेह मोशेशी बोलले. ते म्हणाले:
याहवेहने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणेच सीनायच्या रानात त्याने त्यांची गणती केली:
नादाब व अबीहूनी सीनायच्या रानात अनाधिकृत अग्नी वापरल्यामुळे ते याहवेहसमोर मरण पावले, त्यांना पुत्र नसल्यामुळे एलअज़ार व इथामारनी त्यांचे वडील अहरोनाच्या जीवनकाळात याजक म्हणून सेवा केली.
याहवेहने पुन्हा मोशेला सीनाय रानात सांगितले,
इजिप्त देशातून निघाल्यानंतर दुसर्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात ते सीनाय रानात असताना याहवेह मोशेशी बोलले. ते म्हणाले,
त्याप्रमाणे सीनायच्या रानात, पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी त्यांनी वल्हांडणाचा सण पाळला. जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याचप्रमाणे इस्राएली लोकांनी केले.
तेव्हा इस्राएली लोक सीनायच्या रानातून निघाले आणि पारानाच्या रानात मेघ स्थिर होईपर्यंत एका ठिकाणातून दुसर्या ठिकाणी प्रवास करीत राहिले.
सीनाय रानात मोशे आणि अहरोन याजकाने इस्राएली लोकांची जी मोजणी केली होती, त्यांच्यापैकी एकही या गणतीत नव्हता.
रफीदीम सोडल्यावर त्यांनी सीनायच्या रानात तळ दिला.
मग सीनायच्या रानातून निघून त्यांनी किब्रोथ-हत्ताव्वा येथे तळ दिला.
तो म्हणाला: “याहवेह सीनाय पर्वतावरून आले आणि सेईरावर ते सूर्याप्रमाणे उदय पावले; पारान पर्वतावरून ते प्रकाशले. असंख्य पवित्र जनांचा समुदाय त्यांच्याबरोबर होता. दक्षिण दिशेने, त्यांच्या पर्वत उतरणीवरून ते खाली आले.
याहवेहसमोर पर्वत थरथरला, याहवेह इस्राएलच्या परमेश्वरासमोर सीनाय थरकापला.
परमेश्वराचे रथ दहा दहा हजार आणि हजारो हजार आहेत; प्रभू सीनाय पर्वतावरून पवित्रस्थानी आले आहेत.