Skip to content

Abihu बद्दल बायबलमधील वचने

8 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. अहरोनाने अम्मीनादाबाची कन्या, नहशोनाची बहीण एलीशेबा हिच्याबरोबर विवाह केला. तिच्यापासून त्याला नादाब व अबीहू, एलअज़ार व इथामार झाले.

  2. मग मोशे व अहरोन, नादाब व अबीहू व इस्राएलचे सत्तर वडील वर गेले.

  3. “तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र, नादाब, अबीहू, एलअज़ार व इथामार यांनी याजक म्हणून माझी सेवा करावी, यासाठी त्यांना इस्राएली लोकांमधून तुझ्याकडे आणावे.

  4. अहरोनाचे पुत्र नादाब व अबीहू यांनी आपआपल्या धुपाटण्यात अग्नी भरून, त्यावर धूप ठेवून तो अनाधिकृत अग्नी याहवेहसमोर नेला, जे याहवेहच्या आज्ञेविरुद्ध होते.

  5. म्हणून याहवेहकडून अग्नी निघाला आणि त्याने त्यांना भस्म केले आणि ते याहवेहसमोर मरण पावले.

  6. अहरोनाच्या पुत्रांची नावे: प्रथम जन्मलेला नादाब, मग अबीहू, एलअज़ार व इथामार.

  7. नादाब व अबीहूनी सीनायच्या रानात अनाधिकृत अग्नी वापरल्यामुळे ते याहवेहसमोर मरण पावले, त्यांना पुत्र नसल्यामुळे एलअज़ार व इथामारनी त्यांचे वडील अहरोनाच्या जीवनकाळात याजक म्हणून सेवा केली.

  8. परंतु नादाब आणि अबीहूने याहवेहसमोर अनाधिकृत अग्नीद्वारे अर्पण केल्यामुळे ते मरण पावले.