Skip to content

Ithamar

20 वचने · 5 कुटुंब सदस्य

Ithamar चा उल्लेख असलेली वचने

  1. अहरोनाने अम्मीनादाबाची कन्या, नहशोनाची बहीण एलीशेबा हिच्याबरोबर विवाह केला. तिच्यापासून त्याला नादाब व अबीहू, एलअज़ार व इथामार झाले.

  2. “तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र, नादाब, अबीहू, एलअज़ार व इथामार यांनी याजक म्हणून माझी सेवा करावी, यासाठी त्यांना इस्राएली लोकांमधून तुझ्याकडे आणावे.

  3. मोशेच्या आज्ञेनुसार बनविलेले कराराच्या नियमाचे निवासमंडप यासाठी जी सामुग्री वापरली गेली, त्यांची मोजणी, अहरोन याजक याचा पुत्र इथामार याच्या नेतृत्वाखाली लेव्यांच्या द्वारे केली गेली, ती अशी:

  4. मग मोशे अहरोन व त्याचे पुत्र एलअज़ार व इथामार यांना म्हणाला, “तुमचे केस न विंचरलेले असे मोकळे सोडू नका व तुमची वस्त्रे कधी फाडू नका, नाहीतर तुम्ही मराल आणि याहवेह तुम्हा सर्व समुदायावर रागावतील. परंतु तुमचे नातेवाईक, सर्व इस्राएली लोक याहवेहनी अग्नीने नाश केलेल्या लोकांबद्दल शोक करतील.

  5. अहरोन आणि त्याचे जिवंत राहिलेले पुत्र एलअज़ार आणि इथामारला मोशे म्हणाला, “खमिराशिवाय तयार केलेल्या अन्नार्पणातून उरलेले धान्यार्पण घेऊन याहवेहला अर्पण करा आणि ते तुम्ही वेदीजवळ बसून खावे, कारण ते परमपवित्र आहे.

  6. जेव्हा मोशेने पापार्पणाच्या बोकडाचा शोध घेतला, तेव्हा त्याला समजले की तो जाळून टाकण्यात आला आहे. तेव्हा अहरोनाचे बाकी असलेले पुत्र एलअज़ार व इथामार यांच्यावर तो संतापला.

  7. अहरोनाच्या पुत्रांची नावे: प्रथम जन्मलेला नादाब, मग अबीहू, एलअज़ार व इथामार.

  8. नादाब व अबीहूनी सीनायच्या रानात अनाधिकृत अग्नी वापरल्यामुळे ते याहवेहसमोर मरण पावले, त्यांना पुत्र नसल्यामुळे एलअज़ार व इथामारनी त्यांचे वडील अहरोनाच्या जीवनकाळात याजक म्हणून सेवा केली.

  9. सभामंडपात गेर्षोनी कुळांनी करावयाची सेवा ती हीच आहे. त्यांची कर्तव्ये अहरोन याजकाचा मुलगा इथामार याच्या मार्गदर्शनाखाली असावीत.

  10. अहरोन याजकाचा पुत्र इथामार याच्या मार्गदर्शनाखाली राहून सभामंडपात जी सेवा मरारी कुळांनी करावयाची आहे ती हीच आहे.”

  11. आणि त्याने मरारी कुळाला त्यांच्या कामाच्या गरजेनुसार चार गाड्या व आठ बैल दिले. ते सर्व अहरोन याजकाचा पुत्र इथामार याच्या नेतृत्वाखाली होते.

  12. अहरोन नादाब व अबीहू, एलअज़ार व इथामार यांचा पिता होता.

  13. अम्रामाची संतती: अहरोन, मोशे व मिर्याम. अहरोनाचे पुत्र: नादाब, अबीहू, एलअज़ार व इथामार.

  14. अहरोनाच्या वंशजाची विभागणी: अहरोनाचे पुत्र नादाब, अबीहू, एलअज़ार व इथामार.

  15. नादाब व अबीहू हे अहरोनाचे पुत्र, ते अहरोना आधीच मृत्यू पावले होते. त्यांना पुत्र नव्हते; म्हणून याजकाचे कार्य एलअज़ार व इथामार हे करीत.

  16. दावीदाने एलअज़ाराचे वंशज सादोक व इथामाराचा वंशज अहीमेलेख यांच्या मदतीने अहरोनाच्या वंशजांची विभागणी केली व त्यांची क्रमानुसार सेवेसाठी नेमणूक केली.

  17. एलअज़ाराच्या वंशात इथामाराच्या वंशापेक्षा अधिक पुढारी होते आणि त्यांची त्यानुसार विभागणी करण्यात आली: एलअज़ाराच्या वंशातून सोळा कुटुंबप्रमुख आणि इथामाराच्या वंशातून आठ कुटुंबप्रमुख असे विभागण्यात आले.

  18. कोणताही भेदभाव न करता चिठ्ठ्या टाकून विभागण्यात आले, कारण ते एलअज़ार व इथामार या दोन्ही वंशातून घेतलेले मंदिराचे अधिकारी व परमेश्वराचे निवडलेले अधिकारी होते.

  19. लेवी वंशातील नथानेलाचा पुत्र लेखनिक शमायाहने राजाच्या व शासक—याजक सादोक, अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख व याजक आणि लेवीच्या कुटुंबप्रमुखांसमोर—नावनोंदणी केली. एलअज़ारच्या वंशातील एक कुटुंब व इथामारच्या वंशातील एक कुटुंब घेण्यात आले.

  20. फिनहासाच्या कुळातील: गेर्षोम; इथामाराच्या कुळातील: दानीएल; दावीदाच्या कुळातील: हट्टूश