Levites बद्दल बायबलमधील वचने: Exempt from enrollment for military duty
Exempt from enrollment for military duty बद्दल वचने
परंतु लेवी पूर्वजांच्या गोत्रांची गणना मात्र इतरांबरोबर करण्यात आली नाही.
याहवेहने मोशेला सांगितले होते:
“लेवी गोत्राची गणती करू नये किंवा इस्राएलच्या जनगणनेमध्ये त्यांचा समावेश करू नये.
परंतु कराराच्या नियमाचा निवासमंडप; त्यातील सामुग्री व त्यासंबंधाचे जे काही आहे त्यावर लेवींची प्रमुख म्हणून नेमणूक कर. त्यांनी निवासमंडप व त्यातील सामुग्री वाहून न्यावी; त्यांनी त्याची काळजी घ्यावी व त्याभोवती आपला डेरा उभारावा.
ज्यावेळी निवासमंडप पुढे जायचा असेल, त्यावेळी लेव्यांनीच तो खाली काढावा आणि ज्यावेळी निवासमंडप उभारावयाचा असेल त्यावेळी लेव्यांनीच तो उभारावा. इतर कोणी निवासमंडपाच्या जवळ गेल्यास त्याला जिवे मारावे.
इस्राएली लोकांनी आपआपल्या दलानुसार, प्रत्येकाने आपआपल्या छावणीत, आपआपल्या झेंड्याखाली आपले डेरे द्यावे.
परंतु लेव्यांनी आपले डेरे कराराच्या निवासमंडपाच्या सभोवती उभारावे, म्हणजे इस्राएली समुदायाविरुद्ध माझा क्रोध पेटणार नाही. लेव्यांनी कराराच्या नियमाच्या निवासमंडपाची जबाबदारी घेऊन त्याची काळजी घ्यावी.”
याहवेहने मोशेला जसे आज्ञापिले होते, त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी सर्वकाही केले.