मुख्य मजकुरावर जा

Levites बद्दल बायबलमधील वचने: Degraded from the Levitical office by Jeroboam

8 वचने · 17 पैलू

Degraded from the Levitical office by Jeroboam बद्दल वचने

  1. संपूर्ण इस्राएलमधील सर्व जिल्ह्यातील याजक आणि लेवींनी त्याची बाजू घेतली.

  2. लेवीय लोकांनी त्यांची कुरणे आणि मालमत्तासुद्धा सोडली आणि ते यहूदीया आणि यरुशलेमेत आले, कारण यरोबोअम आणि त्याच्या मुलांनी त्यांना याहवेहचे याजक म्हणून नाकारले होते,

  3. जेव्हा त्याने उच्चस्थानांसाठी आणि वासराच्या आणि बोकडाच्या मूर्ती तयार करून त्यासाठी स्वतःचे याजक नेमले.

  4. इस्रायलच्या प्रत्येक वंशातील ज्या लोकांनी इस्राएलचे परमेश्वर याहवेहच्या शोधात त्यांचे अंतःकरण लावले होते, ते लेवीय लोकांच्या मागे यरुशलेमकडे त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहसाठी यांच्या बलिदानांचे अर्पण करण्यासाठी गेले.

  5. त्यांनी यहूदीयाचे राष्ट्र बळकट केले आणि शलोमोनचे पुत्र रेहोबोअमला तीन वर्षे पाठिंबा दिला, याकाळात त्यांनी दावीद आणि शलोमोनच्या मार्गाचे अनुसरण केले.

  6. तुम्ही याहवेहचे याजक अहरोनाचे पुत्र आणि लेवी यांना हाकलून दिले आणि स्वतःचे याजक तयार केले, जसे इतर देशातील लोक करत नाहीत का? जो कोणी एक तरुण बैल आणि सात मेंढे घेऊन स्वतःला पवित्र करण्यासाठी येतो, तो जी दैवते नाहीत अशांचा पुजारी होऊ शकतो.

  7. “आमच्याविषयी म्हणाल, याहवेह हे आमचे परमेश्वर आहेत आणि आम्ही त्यांना सोडले नाही. जे याजक याहवेहची सेवा करीत आहेत ते अहरोनाचे पुत्र आहेत आणि लेवीय त्यांना मदत करतात.

  8. रोज सकाळी आणि संध्याकाळी ते याहवेह यांना होमार्पणे आणि सुगंधी धूप अर्पण करतात. ते विधिपूर्वक स्वच्छ केलेल्या टेबलावर भाकरी ठेवतात आणि दररोज संध्याकाळी सोन्याच्या दीपमाळेवर दीप लावतात. आम्ही आमचे परमेश्वर याहवेहना हव्या असणाऱ्या गोष्टींचे पालन करीत आहोत. परंतु तुम्ही त्यांना सोडून दिले आहे.