Levites बद्दल बायबलमधील वचने: Intermarry with Canaanites
Intermarry with Canaanites बद्दल वचने
या सर्व गोष्टी आटोपल्यावर, यहूद्यांचे पुढारी माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितले, “इस्राएली लोक, याजक आणि लेवी यांनी स्वतःला कनानी, हिथी, परिज्जी, यबूसी, अम्मोनी, मोआबी, इजिप्तचे व अमोरी या मूर्तिपूजक लोकांच्या घृणास्पद चालीरीतीपासून अलिप्त ठेवले नाही.
या लोकांनी सभोवती असलेल्या राष्ट्रांच्या कन्यांचा स्वतःशी व आपल्या पुत्रांशी केलेल्या या विवाहांमुळे परमेश्वराचे पवित्र लोक मिश्रित झाले आहेत. काही राजकीय पुढारी आणि अधिकाऱ्यांनी तर या विश्वासघातात पुढाकार घेतला आहे.”
लेवी मधून: योजाबाद, शिमी, कलायाह (उर्फ कलीता), पथह्याह, यहूदाह, व एलिएजर.
गायकांपैकी: एल्याशीब हा होता. द्वारपालापैकी: शल्लूम, तेलेम आणि उरी हे होते.