Hiram बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
शलोमोन राजाने सोर येथून हीरामला बोलावून घेतले.
त्याची आई नफताली गोत्रातील एक विधवा होती आणि त्याचा पिता सोरचा होता, तो कास्याचे काम करण्यात निपुण कारागीर होता. हुराम सर्वप्रकारचे कास्याचे काम करण्यास ज्ञानाने, शहाणपणाने व विद्येने भरलेला होता. तो शलोमोन राजाकडे आला व त्याला नेमून दिलेली सर्व कामे केली.
त्याने कास्याचे दोन खांब तयार केले, प्रत्येक खांबाची उंची अठरा हात आणि घेर बारा हात होती.
खांबांच्या शिखरांवर बसविण्यासाठी त्याने कास्याचे दोन ओतीव कळस केले; प्रत्येकाची उंची पाच हात होती.
खांबांवर असलेल्या प्रत्येक कळसांना सात साखळीच्या विणलेल्या जाळ्या बसविल्या होत्या.
खांबांच्या वरच्या कळसांना सजविण्यासाठी त्याने प्रत्येक जाळ्याला गोलाकारात दोन रांगेत डाळिंबे बनविली. प्रत्येक कळस त्याने असेच घडविले.
द्वारमंडपात असलेल्या खांबांवरील कळस कमळांच्या फुलांच्या आकाराचे, चार हात उंच होते.
दोन्ही खांबांच्या कळसांना लागून वाटीच्या आकाराच्या जाळीभोवती, दोनशे डाळिंबाच्या रांगा केलेल्या होत्या.
त्याने हे खांब मंदिराच्या द्वारमंडपाकडे ठेवले. दक्षिणेकडे ठेवलेल्या खांबाला त्याने याखीन आणि उत्तरेकडील खांबाला बवाज असे नाव दिले.
खांबांवर असलेले कळस कमळांच्या आकाराचे होते. याप्रकारे खांबांचे काम पूर्ण झाले.
त्याने ओतीव धातूचा हौद तयार केला, तो गोलाकार असून त्याचा व्यास एका काठापासून दुसर्या काठापर्यंत दहा हात होता व पाच हात उंच होता. त्याचे सभोवार माप घेण्यास तीस हात दोरी लागत असे.
त्याच्या काठाखाली सभोवार एकेका हाताच्या अंतरावर दहा काकड्या होत्या. या काकड्या हौदाबरोबरच एकांगी अशा दोन रांगेत ओतीव केल्या होत्या.
हा हौद बारा बैलांवर उभा होता, तीन बैल उत्तरेकडे, तीन पश्चिमेकडे, तीन दक्षिणेकडे आणि तीन पूर्वेकडे तोंड करून होते आणि त्यांच्यावर हौद विसावला होता आणि त्यांचे मागचे अंग आतील बाजूस होते.
त्याची जाडी चार बोटे होते, आणि पेल्याचा घेर, कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे बाहेरच्या बाजूला वळलेला होता. त्यामध्ये तीन हजार बथ पाणी मावत असे.
त्याने कास्याचे दहा चौरंग बनविले; प्रत्येकाची लांबी चार हात, रुंदी चार हात आणि उंची तीन हात होती.
चौरंग याप्रकारे बनविले होते: त्याला बाजूने लाकडाच्या फळ्या जोडल्या होत्या.
फळ्यांच्या मध्यभागी व तिवडीवरही सिंह, बैल आणि करूब यांच्या आकृती कोरल्या होत्या आणि सिंहाच्या व बैलांच्या ठोकलेल्या लोंबत्या झालरी होत्या.
प्रत्येक चौरंगाला चार कास्याची चाके व कास्याच्या धुर्या होत्या आणि प्रत्येकाला गंगाळे होती, ज्याला आधार देण्यासाठी ओतीव स्तंभ असून त्यांच्या बाजूंनी लोंबत्या माळा होत्या.
तिवडीच्या आतील बाजूस त्याचे तोंड उघडे होते व त्याला एका हाताएवढी खोल गोलाकार पट्टी होती. हा उघडा भाग गोल होता, आणि त्याच्या व्यासाचे माप दीड हात होते. त्याच्या तोंडाभोवती कोरीव काम होते. तिवडीचे खांब गोल नसून चौकोनी होते.
चार चाके खांबांच्या खाली होती आणि चाकांच्या धुर्या तिवडीला जोडलेल्या होत्या. प्रत्येक चाकाचा व्यास दीड हात होती.
ही चाके रथाच्या चाकांप्रमाणे बनविली होती; धुर्या, कडा, आरे आणि तुंबे हे सर्व ओतीव काम होते.
प्रत्येक तिवडीला, चारही कोपर्यांना चार दांडे होते, जे तिवडीला अखंड असे होते.
तिवडीच्या वरच्या बाजूला अर्धा हात गोलाकाराची खोल पट्टी होती. त्याचे आधारस्तंभ आणि खांब तिवडीच्या वरच्या बाजूने जोडलेले होते.
आधारस्तंभाच्या आणि खांबांच्या पृष्ठभागावर करूब, सिंह आणि खजुरीची झाडे कोरली होती आणि सभोवार लोंबत्या माळा होत्या.
अशाप्रकारे त्याने या दहा तिवड्या तयार केल्या. त्या सर्व एकाच साच्यात तयार केलेल्या असून ते सारख्याच मापाच्या आणि आकाराच्या होत्या.