- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 970–930 BC
Solomon & The Temple
Solomon builds the great Temple in Jerusalem and rules with unprecedented wisdom and wealth before foreign gods divide his heart.
या कालखंडातील वचने
- 1 राजे १:५१सुमारे इ.स.पू. १०१५
तेव्हा शलोमोनला सांगण्यात आले, “अदोनियाह शलोमोन राजाला घाबरत आहे आणि वेदीच्या शिंगांना धरून ठेवले आहे. तो म्हणतो की, ‘शलोमोन राजाने आज माझ्याशी शपथ घ्यावी की तो त्याच्या सेवकाला तलवारीने मारणार नाही.’ ”
- 1 राजे १:५२सुमारे इ.स.पू. १०१५
शलोमोनने उत्तर दिले, “जर तो स्वतःस योग्य असा सिद्ध करेल, तर त्याच्या डोक्यावरील एक केससुद्धा जमिनीवर पडणार नाही; पण त्याच्या ठायी दुष्टाई आढळली, तर तो मरण पावेल.”
- 1 राजे १:५३सुमारे इ.स.पू. १०१५
तेव्हा शलोमोन राजाने माणसे पाठवून त्याला वेदीवरून खाली आणले आणि अदोनियाहने येऊन शलोमोन राजास मुजरा केला आणि शलोमोन त्याला म्हणाला, “आपल्या घरी जा.”
जेव्हा दावीदाचा शेवट जवळ आला, तेव्हा त्याने आपला पुत्र शलोमोनाला आज्ञा दिल्या.
दावीदाने म्हटले, “जगाच्या प्रथेनुसार आता माझी जाण्याची वेळ आली आहे, तर खंबीर हो आणि शुराप्रमाणे वाग.
आणि याहवेह तुझे परमेश्वर काय म्हणतात त्याकडे लक्ष दे: मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे याहवेहच्या आज्ञांचे पालन कर आणि त्यांचे नियम आणि आज्ञा, त्यांचे निर्णय आणि निर्बंध पाळ. असे केल्याने जे काही तू करशील आणि जिथे कुठे तू जाशील तिथे तू यशस्वी होशील.
आणि मला दिलेले हे अभिवचन याहवेह पूर्ण करतील: ‘जर तुझे वंशज आपले जीवन यथायोग्य ठेवतील आणि त्यांच्या सर्व हृदयाने आणि जिवाने माझ्यासमोर विश्वासूपणे चालतील, इस्राएलच्या राजासनावर बसण्यासाठी तुझा वंश खुंटणार नाही.’
“तर तू स्वतः समजून घे की जेरुइयाहचा पुत्र योआब माझ्याशी कसा वागला; इस्राएलच्या सैन्याचे दोन सेनापती, नेरचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा यांना त्याने काय केले. त्याने त्यांना जसे युद्धकाळात मारावे तसे शांतीच्या काळात जिवे मारले आणि त्या रक्ताने त्याचा कंबरपट्टा आणि पायतणे डागाळली आहेत.
तुझ्या सुज्ञतेनुसार त्यांचे कर, परंतु त्याचे पिकलेले डोके शांतीने कबरेत जाऊ देऊ नकोस.
“परंतु गिलआदी बारजिल्लईच्या मुलांवर दया दाखव आणि त्यांना तुमच्या मेजावर भोजन करणाऱ्यांपैकी असू दे. तुझा भाऊ अबशालोम याच्यापासून मी पळून गेलो तेव्हा ते माझ्या पाठीशी उभे राहिले.
“आणि बहूरीम येथील बिन्यामीन गेराचा पुत्र शिमी तुमच्यात आहे हे विसरू नकोस, मी महनाईमकडे जाताना त्या दिवशी ज्याने मला भयंकर शाप दिला होता. पण जेव्हा तो मला यार्देनकडे भेटण्यास आला, तेव्हा ‘मी तुला तलवारीने ठार मारणार नाही’ अशी याहवेहच्या नावाने मी त्याला शपथ दिली होती.
परंतु त्याला निर्दोष समजू नको. तू सुज्ञ व्यक्ती आहेस; त्याचे काय करावे हे तुला कळेल. त्याचे पिकलेले डोके रक्ताळलेले असे कबरेत पाठव.”
यानंतर दावीद त्याच्या पूर्वजांसोबत विसावला आणि दावीदाच्या नगरात त्याला पुरले गेले.
दावीदाने इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले; सात वर्षे हेब्रोनमध्ये आणि तेहतीस वर्षे यरुशलेमेत राज्य केले.
- 1 राजे २:१२सुमारे इ.स.पू. १०१४
मग शलोमोन आपला पिता दावीद याच्या राजासनावर बसला आणि त्याचे राज्य बळकट असे स्थापित झाले.
- 1 राजे २:१३सुमारे इ.स.पू. १०१४
हग्गीथेचा पुत्र अदोनियाह हा शलोमोनची आई बथशेबाकडे आला. बथशेबाने त्याला विचारले, “तू शांतीने आला आहेस काय?” त्याने उत्तर दिले “होय, मी शांतीने आलो आहे.”
- 1 राजे २:१४सुमारे इ.स.पू. १०१४
नंतर तो पुढे म्हणाला, “मला तुमच्याशी काही बोलायचे आहे.” ती म्हणाली, “तू बोलू शकतो.”
- 1 राजे २:१५सुमारे इ.स.पू. १०१४
तेव्हा तो म्हणाला, “तुम्हाला तर ठाऊकच आहे की वास्तविकता राज्य माझे होते. त्यांचा राजा म्हणून सर्व इस्राएलची नजर माझ्याकडे होती. परंतु ते पालटले आणि राज्य माझ्या भावाकडे गेले आहे; कारण त्याला ते याहवेहकडून आले आहे.
- 1 राजे २:१६सुमारे इ.स.पू. १०१४
तर आता मला तुमच्याकडे एक विनंती करावयाची आहे. मना करू नका.” ती म्हणाली, “बोल.”
- 1 राजे २:१७सुमारे इ.स.पू. १०१४
तो पुढे म्हणाला, “शलोमोन राजा तुम्हाला मना करणार नाही; कृपया त्यांना विचार की त्यांनी शूनेमकरीण अबीशग ही मला पत्नी म्हणून द्यावी.”
- 1 राजे २:१८सुमारे इ.स.पू. १०१४
बथशेबा म्हणाली, “ठीक आहे, मी तुझ्या वतीने राजाशी बोलेन.”
- 1 राजे २:१९सुमारे इ.स.पू. १०१४
जेव्हा बथशेबा शलोमोन राजाकडे त्याच्याशी अदोनियाहसाठी बोलण्यास गेली, तिला पाहताच राजा तिला भेटण्यास उभा राहिला, त्याने तिच्यापुढे डोके लवविले. राजाच्या आईसाठी आसन मागविले आणि ती त्याच्या उजवीकडे बसली.
- 1 राजे २:२०सुमारे इ.स.पू. १०१४
ती म्हणाली, “मला तुझ्याकडे एक लहानशी विनंती करावयाची आहे, मला मना करू नकोस.” राजाने म्हटले, “माझ्या माते, माग, मी तुला मना करणार नाही.”
- 1 राजे २:२१सुमारे इ.स.पू. १०१४
तेव्हा ती म्हणाली, “शूनेमकरीण अबीशग हिला तुझा भाऊ अदोनियाह याला पत्नी म्हणून दे.”
- 1 राजे २:२२सुमारे इ.स.पू. १०१४
शलोमोन राजाने त्याच्या आईला उत्तर दिले, “तू अदोनियाहसाठी शूनेमकरीण अबीशग हिची विनंती का करतेस? तू त्याच्यासाठी राज्य मागू शकतेस; शेवटी तो माझा थोरला भाऊ आहे; होय, त्याच्यासाठी आणि अबीयाथार याजक व जेरुइयाहचा पुत्र योआब यांच्यासाठी देखील मागू शकतेस!”