मुख्य मजकुरावर जा

Mountains बद्दल बायबलमधील वचने: Forests

5 वचने · 82 पैलू

"Mountains" साठी शोधा

Forests बद्दल वचने

  1. तुझे दूत पाठवून तू प्रभूची चेष्टा केली. आणि तू म्हणतोस, ‘मी माझ्या अनेक रथांनी उंचच उंच पर्वतावर चढून गेलो, लबानोनच्या सर्वात उंच पर्वतावर गेलो. मी तिचे सर्वात उंच देवदारू तोडले, निवडक गंधसरू तोडले. मी तिच्या दुर्गम भागात पोहोचलो तिच्या अत्यंत उत्तम जंगलात गेलो.

  2. या कामासाठी शलोमोनाने 70,000 मजूर, 80,000 पाथरवट व त्यांच्यावर देखरेखीसाठी 3,600 मुकादम यांची भरती केली.

  3. “याशिवाय लबानोनच्या जंगलातून गंधसरू, देवदारू व रक्तचंदन यांची लाकडे माझ्याकडे पाठवा. लाकडे कापून पाठविण्याच्या कामी तुमचे लोक निष्णात आहेत हे मी जाणतो. माझे कारागीर तुमच्या कारागिरांसह काम करतील.

  4. जे मंदिर मी बांधणार आहे ते अत्यंत विशाल व भव्य असेल, म्हणून लाकडाचा फारच मोठा साठा लागेल.

  5. तुमच्या लाकूड तोडणाऱ्या सेवकांना मी वीस हजार कोर झोडलेला गहू, वीस हजार कोर जव, द्राक्षारसाचे वीस हजार बथ व वीस हजार जैतुनाच्या तेलाचे बथ देईन.”