Barak
Barak चा उल्लेख असलेली वचने
तिने नफतालीच्या प्रदेशातील केदेश येथे राहणारा अबीनोअमाचा पुत्र बाराकास बोलावून आणले आणि ती त्याला म्हणाली, “याहवेह इस्राएलाचे परमेश्वर तुला आज्ञा देतात: ‘जा आणि तुझ्यासोबत नफताली आणि जबुलून वंशातील दहा हजार पुरुषांना सोबत घेऊन ताबोर पर्वताकडे कूच करून जा.
बाराक तिला म्हणाला, “जर तू माझ्यासोबत येशील तर मी जाईन; परंतु तू माझ्याबरोबर येत नसशील, तर मी जाणार नाही.”
दबोराने उत्तर दिले, “मी तुजबरोबर अवश्य येईन, परंतु जो मार्ग तू घेत आहेस त्यामध्ये तुझा सन्मान होणार नाही, कारण याहवेह सिसेराला एका स्त्रीच्या हातात देतील.” मग ती बाराकासोबत केदेश येथे गेली.
बाराकाने जबुलूनी आणि नफतालीच्या लोकांना बोलाविले आणि तेव्हा दहा हजार पुरुष त्याच्यामागे निघाले. दबोराही त्याच्यासह केदेशला गेली.
जेव्हा त्यांनी सिसेराला सांगितले की अबीनोअमाचा मुलगा बाराक ताबोर पर्वतावर गेला आहे,
तेव्हा दबोरा बाराकास म्हणाली, “जा! आज तो दिवस आहे, याहवेहने सिसेराला तुझ्या हाती दिलेले आहे. याहवेह तुझ्यापुढे निघाले आहेत ना?” तेव्हा बाराक दहा हजार लोकांसह ताबोर पर्वतावरून उतरला.
जसा बाराक पुढे गेला, याहवेहने सिसेरा आणि त्याचे सर्व रथ आणि त्याच्या सैनिकांचा तलवारीने धुव्वा उडविला, सिसेरा तर आपल्या रथातून उतरला आणि पायी पळून गेला.
बाराकाने रथांचा आणि सैन्याचा हरोशेथ-हग्गोईमपर्यंत पाठलाग केला आणि सिसेराचे संपूर्ण सैन्य तलवारीने पडले; एकही पुरुष जिवंत राहिला नाही.
बाराक सिसेराचा शोध करीत आला, तेव्हा याएल त्याला सामोरी गेली व म्हणाली, “या, ज्या पुरुषाचा तुम्ही शोध करीत आहात, तो मी तुम्हाला दाखविते.” तो तिच्याबरोबर आत गेला, तेव्हा तिथे डेर्याची मेख कपाळातून आरपार जाऊन सिसेरा मरून पडलेला त्याला दिसला.
त्या दिवशी दबोरा आणि अबीनोअमाचा पुत्र बाराकाने हे गीत गाईले:
‘दबोरा जागी हो, जागी हो! जागी हो, जागी हो, तुझ्या मुखातून गीत भरभरून वाहो! ऊठ, हे बाराका! हे अबीनोअमाच्या पुत्रा, तू बंधनात टाकलेल्या बंदिवानांना घेऊन जा.’
इस्साखारचे राजपुत्र दबोरा सोबत होते; होय, इस्साखार बाराक सोबत, रऊबेनच्या जिल्ह्यांमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली खोर्यामध्ये पाठविले अंतःकरणाचा बारकाईने शोध घेतला गेला.
तर मग, मी आणखी किती उदाहरणे सांगावी? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल आणि सर्व संदेष्ट्यांच्या विश्वासाबद्दलच्या कथा सांगण्यासाठी मला वेळ नाही.