Skip to content

Mountains बद्दल बायबलमधील वचने

136 वचने · 82 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “ ‘मी ऐकत आहे की, ही मेंढरे कातरण्याची वेळ आहे. जेव्हा तुझे मेंढपाळ आमच्याबरोबर होते, आम्ही त्यांच्याशी वाईट वागलो नाही आणि जितका काळ ते कर्मेल येथे होते त्यांचे काहीही हरवले नाही.

  2. आता याहवेहच्या समक्षतेपासून दूर माझे रक्त भूमीवर पडू नये. जसे कोणी डोंगरामध्ये तीतराची शिकार करावी, तसा इस्राएलचा राजा पिसवा शोधायला बाहेर आला आहे.”

  3. पलिष्ट्यांनी इस्राएलविरुद्ध युद्ध केले; इस्राएली लोक त्यांच्यापुढून पळून गेले आणि गिलबोआ डोंगरावर पुष्कळजण मारले गेले.

  4. तो तरुण मनुष्य म्हणाला, “मी सहज गिलबोआच्या डोंगरावर होतो आणि तिथे शौल त्याच्या भाल्यावर टेकलेला आणि रथाचा सारथी आणि त्यांचे स्वार जोरात त्याचा पाठलाग करीत होते असे मला दिसले.

  5. “गिलबोआच्या डोंगरांनो, तुम्हावर दव किंवा पाऊस न येवो; तुमच्या उतरणीच्या शेतांवर पावसाच्या सरी न पडोत. कारण तिथे शूरवीराची ढाल तिरस्कृत झाली, शौलाची ढाल—यापुढे तेलाने पुसली जाणार नाही.

  6. तरीही, दावीदाने सीयोन गड हस्तगत केला; हेच दावीदाचे शहर आहे.

  7. शलोमोन लबानोनला प्रत्येक महिन्याला दहा हजार पुरुष आळीपाळीने पाठवित असे, म्हणजे ते लबानोनमध्ये एक महिना व दोन महिने आपल्या घरी राहत असत. अदोनिराम बिगारी कामकर्‍यांवर अधिकारी होता.

  8. राजाच्या आज्ञेनुसार त्यांनी मंदिराच्या पायासाठी खाणीतून उच्च दर्जाचे मोठे दगडे काढले.

  9. शलोमोनाने यरुशलेमच्या पूर्वेकडील डोंगरावर मोआबाचे अमंगळ दैवत कमोश व अम्मोनी लोकांचे अमंगळ दैवत मोलख यांच्यासाठी पूजास्थाने बांधली.

  10. तेव्हा मिखायाहने उत्तर दिले, “सर्व इस्राएल लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे पर्वतांवर पांगलेले आहेत असे मला दिसले आणि याहवेह म्हणाले, ‘या लोकांना धनी नाही. प्रत्येकाला शांतीने आपआपल्या घरी जाऊ दे.’ ”

  11. तुझे दूत पाठवून तू प्रभूची चेष्टा केली. आणि तू म्हणतोस, ‘मी माझ्या अनेक रथांनी उंचच उंच पर्वतावर चढून गेलो, लबानोनच्या सर्वात उंच पर्वतावर गेलो. मी तिचे सर्वात उंच देवदारू तोडले, निवडक गंधसरू तोडले. मी तिच्या दुर्गम भागात पोहोचलो तिच्या अत्यंत उत्तम जंगलात गेलो.

  12. पुढे शलोमोनाने यरुशलेमच्या पूर्वेकडील आणि विध्वंसगिरीच्या दक्षिणेकडील टेकड्यांवरील मंदिरे काढून टाकली. ही मंदिरे इस्राएलचा राजा शलोमोनाने सीदोन्यांच्या अष्टारोथ, मोआबाच्या कमोश आणि अम्मोन्यांच्या मिलकाम या अमंगळ दैवतांसाठी बांधली होती.

  13. गादचे महान शूर वीरसुध्दा फितूर होऊन दावीद अरण्यवासात असताना त्याच्याकडे गेले. ते ढाली व भाले वापरण्यात निष्णात होते. त्यांचे चेहरे सिंहाच्या मुखासारखे असून ते डोंगरावरील हरणांसारखे चपळ होते.

  14. या कामासाठी शलोमोनाने 70,000 मजूर, 80,000 पाथरवट व त्यांच्यावर देखरेखीसाठी 3,600 मुकादम यांची भरती केली.

  15. “याशिवाय लबानोनच्या जंगलातून गंधसरू, देवदारू व रक्तचंदन यांची लाकडे माझ्याकडे पाठवा. लाकडे कापून पाठविण्याच्या कामी तुमचे लोक निष्णात आहेत हे मी जाणतो. माझे कारागीर तुमच्या कारागिरांसह काम करतील.

  16. जे मंदिर मी बांधणार आहे ते अत्यंत विशाल व भव्य असेल, म्हणून लाकडाचा फारच मोठा साठा लागेल.

  17. तुमच्या लाकूड तोडणाऱ्या सेवकांना मी वीस हजार कोर झोडलेला गहू, वीस हजार कोर जव, द्राक्षारसाचे वीस हजार बथ व वीस हजार जैतुनाच्या तेलाचे बथ देईन.”

  18. मग शलोमोनाने यरुशलेमच्या मोरिया डोंगरावर याहवेहच्या मंदिराचे बांधकाम सुरू केले. याच ठिकाणी याहवेहने शलोमोनचे पिता दावीदाला दर्शन दिले होते. ही आर्णोन यबूसी याच्या खळ्याची जागा होती. मंदिरासाठी दावीदाने ही जागा पुरविली होती.

  19. त्याने यहूदीयाच्या टेकड्यांवर उच्च स्थानेही बांधली आणि यरुशलेमच्या लोकांना व्यभिचार करावयाला लावले होते आणि यहूदीयाला चुकीच्या मार्गाने नेले होते.

  20. त्याने वाळवंटात बुरूजही बांधले आणि पुष्कळ पाण्याच्या टाक्या बांधल्या, कारण त्याच्याकडे डोंगरपायथ्याजवळ आणि मैदानात भरपूर गुरे होती. त्याच्या शेतामध्ये आणि डोंगरामधील द्राक्षमळ्यात आणि उपज देणाऱ्या जमिनीवर काम करणारे लोक त्याच्याकडे होते, कारण त्याला जमिनीची आवड होती.

  21. ते पर्वतांना त्यांना नकळत त्यांच्या ठिकाणातून हलवितात, आणि आपल्या रागात त्यांना उलथून टाकतात.

  22. परमेश्वराच्या धमकावण्याने आकाशातील स्तंभ थरथरतात, त्यांच्या धाकाने ते भयचकित होतात.

  23. गारगोटीसारखा कठीण खडक लोक आपल्या हातांनी फोडतात आणि पर्वतांना समूळ उघडे करतात.

  24. तुमचे नीतिमत्व विशाल पर्वतासारखे आहे, तुमचे न्याय अथांग खोलीसारखे आहेत. याहवेह, तुम्ही मनुष्य आणि प्राण्यांची जोपासना करता.

  25. माझ्या परमेश्वरा, माझा जीव माझ्याठायी उदास झाला आहे; तेव्हा मी यार्देन प्रदेशातून आणि हर्मोनाच्या शिखरावरून, मिसहार पर्वतावरून तुमचे स्मरण करणार.