- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Mountains बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
आपल्या महान शक्तीने त्यांनी पर्वतांना त्यांच्या ठिकाणी स्थिर ठेवले आहे.
बाशान पर्वता, वैभवी बाशान पर्वता, अनेक शिखरांच्या रांगा असलेल्या पर्वता, बाशान पर्वता,
मग पर्वत लोकांना समृद्धी प्रदान करो, आणि डोंगर नीतिमत्वाची फळे उत्पादित करो.
पृथ्वीची खोल स्थळे त्यांच्या नियंत्रणात आहेत, आणि पर्वताची शिखरेही त्यांचीच आहेत.
याहवेहच्या उपस्थितीत, समस्त पृथ्वीचे सत्ताधीश व सगळे पर्वत मेणाप्रमाणे वितळतात.
तुम्ही पृथ्वीला गहन जलाशयरूपी वस्त्राने आच्छादिले; जलस्तर पर्वतापेक्षा उंच केले.
ते पाणी पर्वतांवरून वाहिले, दर्याखोर्यातून गेले, आणि तुम्ही नेमलेल्या पातळ्यांवर ते स्थिर झाले.
तुम्ही त्यांना मर्यादा ठरवून दिली; जेणेकरून त्यांनी पृथ्वी पुन्हा कधीही व्यापून टाकू नये.
त्यांनी खोर्यांमधून पाण्याचे वाहते झरे केले; पर्वतामधून त्यांचे प्रवाह वाहत गेले.
ते त्यांच्या भवनाच्या वरच्या कक्षातून पर्वतावर पाऊस पाडतात; पृथ्वी त्यांच्या फलवंत कार्याने समाधान पावते.
उंच पर्वत रानबकर्यांचे निवासस्थान आहेत, खडकांमध्ये डोंगरी ससे सुरक्षित बिळे करतात.
त्यांच्या नेत्रकटाक्षांनी पृथ्वी थरथर कापते; ते स्पर्श करताच पर्वतातून धुराचे लोट बाहेर पडतात.
पर्वतांनी मेंढ्यांप्रमाणे आणि टेकड्यांनी कोकरांसारख्या उड्या मारल्या.
पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांप्रमाणे, टेकड्यांनो, तुम्ही कोकरांसारखे का बागडलात?
यरुशलेमला वेष्टण करणारे पर्वत जसे तिचे रक्षण करतात, तसेच आता आणि सदासर्वकाळ, याहवेह आपल्या लोकांना वेष्टून त्यांचे रक्षण करतात.
हे याहवेह, स्वर्ग उघडून खाली या; पर्वतांना स्पर्श करा म्हणजे ते धुमसतील.
ते मेघांनी आकाश व्यापून टाकतात; पावसाच्या सरी भूमीवर पाठवितात आणि डोंगरावर हिरवे गवत रुजवितात.
अहो पर्वतांनो व सर्व टेकड्यांनो, फळझाडे व समस्त गंधसरू,
वाळलेले गवत काढून टाकले तेव्हा नवीन वाढ दिसून येते आणि टेकड्यांवरील गवत एकत्रित केले जाते,
ऐका! माझ्या प्रियांनो! पाहा! तो येत आहे, डोंगरामधून उड्या मारत, टेकड्यांवरून बागडत येत आहे.
किती सुंदर आहेस तू, माझ्या प्रिये! आहा, किती सुंदर आहेस! तुझ्या पडद्याआड तुझे नयन कबुतरे आहेत. तुझे केस त्या शेरडांच्या कळपाप्रमाणे आहेत ज्या गिलआदाच्या टेकड्यांवरून झळकतात.
दिवस उजाडेपर्यंत, आणि छाया नाहीशी होईपर्यंत, मी गंधरसाच्या पर्वतावर व बोळाच्या टेकडीवर जाईन.
माझ्या वधू, लबानोनाहून तू माझ्यासोबत ये, लबानोनाहून माझ्यासोबत ये, अमानाह डोंगराच्या माथ्यावरून, सनीर व हर्मोनच्या शिखरावरून, सिंहाच्या गुहांपासून आणि चित्ते वावरतात त्या डोंगरावरून खाली उतरून ये.
माझ्या प्रियसख्या, लवकर ये, आणि हरिणीसारखा हो, किंवा सुगंधाने भरलेल्या डोंगरावरील तरुण काळवीटा प्रमाणे हो.
पण शेवटच्या दिवसात याहवेहच्या मंदिराचे पर्वत बळकट व उंच असे स्थापित केले जाईल; सर्व पर्वतांपेक्षा ते उंचावले जाईल, आणि सर्व राष्ट्रे त्याकडे एकत्र येतील.