Skip to content

Mountains बद्दल बायबलमधील वचने

136 वचने · 82 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. उंच उंच पर्वत आणि सर्व उंच डोंगर,

  2. उघड्या टेकडीच्या शिखरावर ध्वज उंच करा, मान्यवर लोकांच्या फाटकांमधून प्रवेश करण्यासाठी त्यांना ओरडून सांगा; खुणा करून त्यांना बोलवा.

  3. जोपर्यंत तुम्हाला डोंगराच्या शिखरावर असलेल्या ध्वजस्तंभाप्रमाणे, टेकडीवर लावलेल्या पताक्याप्रमाणे सोडून दिले जात नाही तोपर्यंत एका व्यक्तीच्या धमकीने एक हजार लोक पळून जातील; पाच जणांच्या धमकीने तुम्ही सर्वजण पळून जाल.”

  4. प्रत्येक दरी उंच केली जाईल, प्रत्येक डोंगर आणि टेकडी खाली केली जाईल; खडबडीत जमीन सपाट होईल, खडकाळ जागा सखल भूप्रदेश करण्यात येईल.

  5. तुम्ही जे सीयोनसाठी सुवार्ता आणता, उंच डोंगरावर जा. यरुशलेममध्ये सुवार्ता आणणारे तुम्ही, तुमचा आवाज उंचावून आरोळी द्या, आवाज उंच करा, घाबरू नका; यहूदीयाच्या नगरांना सांगा, “तुमचे परमेश्वर येत आहेत!”

  6. त्यांच्या ओंजळीत असलेले पाणी कोणी मोजले आहे, किंवा त्यांच्या हाताच्या रुंदीने आकाशात चिन्हे मापली आहेत? पृथ्वीवरील धूळ टोपलीत कोणी ठेवली आहे, किंवा पर्वतांचे वजन तराजूवर कोणी केले आहे आणि कोणी टेकड्या तोलल्या आहेत?

  7. “पाहा, मी तुम्हाला असे मळणी यंत्र करेन ज्याचे दात नवीन व तीक्ष्ण असतील आणि तुम्ही पर्वतांची मळणी करून त्याचा चुराडा कराल आणि डोंगराचे भुसकट करून त्याची घट कराल.

  8. मी पर्वत व टेकड्या उजाड करेन. त्यांची सर्व हिरवळ वाळवून टाकेन; मी नद्यांना बेटांमध्ये रूपांतरित करेन, आणि जलाशय वाळवून टाकेन.

  9. अहो आकाशांनो, आनंद गीते गा, कारण याहवेहने हे अद्भुत कृत्य केले आहे; हे खालील पृथ्वी, गर्जना कर, हे पर्वतांनो, अरण्यांनो आणि सर्व वृक्षांनो, गायनाचा कल्लोळ उसळू द्या. कारण याहवेहने याकोबाचा उद्धार केला आहे. इस्राएलमध्ये त्यांनी त्यांचे गौरव प्रकट केले आहे!

  10. मी माझ्या सर्व पर्वतांच्या सरळ वाटा करेन, आणि माझे महामार्ग उंचावले जातील.

  11. तुम्ही आनंदाने प्रस्थान कराल व शांतीने मार्गदर्शित व्हाल; पर्वते आणि टेकड्या, तुमच्यापुढे उचंबळून गीते गातील, आणि रानातील सर्व वृक्ष टाळ्या वाजवतील.

  12. अहा, आकाश विदारून तुम्ही खाली आलात, तर किती बरे झाले असते, तुमच्यासमोर पर्वत थरथर कापले असते!

  13. जसा अग्नी शाखांना जाळून भस्म करतो, व ज्यामुळे पाणी उकळले जाते, तुम्ही खाली या व तुमच्या नामाची महती तुमच्या शत्रूंना समजू द्या ज्यामुळे राष्ट्रे तुमच्यासमोर थरथर कापली जातील!

  14. जेव्हाही आम्हाला अनपेक्षित असे अत्यंत अद्भुत चमत्कार करण्यास, तुम्ही खाली आले, पर्वतांनी तुम्हाला पाहताच ते भीतीने तुमच्यासमोर डळमळले.

  15. शोमरोनच्या डोंगरावर तू पुन्हा आपले द्राक्षमळे लावशील; शेतकरी ते मळे लावतील व स्वतःची फळे खाण्याचा आनंद उपभोगतील.

  16. “हे संहारक पर्वता, तू जो संपूर्ण पृथ्वीचा विध्वंस करतो, मी तुझ्याविरुद्ध आहे,” याहवेह जाहीर करतात, “मी माझा हात तुझ्याविरुद्ध उगारेन, तुला कडेलोट करेन, आणि तुला भस्म झालेला डोंगर करेन.

  17. मग लोखंड, माती, कास्य, चांदी आणि सोने यांचे तुकडे तुकडे झाले आणि ते उन्हाळ्यात खळ्यातील भुशाप्रमाणे झाले. वाऱ्याने त्यांना अशा प्रकारे उडवून दिले की त्यांचा एक छोटासा तुकडाही शिल्लक राहिला नाही. पण ज्या दगडाने पुतळा उलथून टाकला, त्या दगडाचा एक प्रचंड डोंगर झाला व त्याने सर्व पृथ्वी झाकून टाकली.

  18. “त्या राजांच्या काळात, स्वर्गातील परमेश्वर एक राज्य स्थापन करतील, ज्याचा नाश होणार नाही किंवा इतर कोणीही त्याच्यावर राज्य करू शकणार नाही. हे त्या सर्व राज्यांना चिरडून टाकेल आणि त्यांचा नाश करेल, परंतु ते स्वतःच कायम टिकून राहील.

  19. हा त्या खडकाच्या दृष्टान्ताचा अर्थ आहे, जो मनुष्याच्या हातून नव्हता, परंतु स्वतः एका पर्वतापासून तो खडका वेगळा झाला होता—ज्याने लोखंड, कास्य, माती, चांदी आणि सोने यांचा सर्वांचा चुराडा केला होता. “महान परमेश्वराने महाराजांना भविष्यात काय घडणार आहे हे दाखवून दिले. हे स्वप्न खरे आहे आणि त्याचा अर्थ विश्वास ठेवण्यालायक आहे.”

  20. शोमरोनच्या डोंगरावर राहणार्‍या बाशानच्या गाईंनो हे वचन ऐका, तुम्ही स्त्रिया, ज्या तुम्ही गरिबांवर अत्याचार करता आणि गरजवंतांना चिरडता आणि आपल्या नवर्‍यांना म्हणता, “आम्हाला काही पेय आणा!”

  21. ज्यांनी पर्वतांची रचना केली, ज्यांनी वारे निर्माण केले, आणि जे आपले विचार मानवजातीला प्रकट करतात, जे प्रभात समयाला अंधकारात बदलतात आणि पर्वताला आपल्या पायाखाली तुडवितात; याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर, हे त्यांचे नाव आहे.

  22. “ते दिवस येत आहेत,” याहवेह जाहीर करतात, “जेव्हा नांगरणारा कापणी करणार्‍याला आणि द्राक्षे तुडविणारा बी पेरणार्‍याला मागे टाकेल. नवीन द्राक्षारस पर्वतांवरून गळू लागेल आणि ते सर्व टेकड्यांवरून वाहू लागेल,

  23. त्यांच्यासमोर पर्वत कंपित होतात व टेकड्या विरघळतात. पृथ्वी आणि जग व त्यात राहणारे सर्वजण त्यांच्या समक्षतेत थरकापतात.

  24. संतप्त याहवेहपुढे कोणाचा निभाव लागेल? त्यांचा क्रोध कोण सहन करू शकेल? त्यांचा उग्र क्रोध अग्नीसारखा ओतला जातो; त्यांच्यापुढे खडक ढासळून पडतात.

  25. लबानोनमध्ये तुम्ही केलेला हिंसाचार तुम्हाला व्याकूळ करेल, आणि तुम्ही केलेला प्राण्यांचा नाश तुम्हाला भयभीत करेल, कारण तुम्ही मनुष्याचे रक्त वाहिले आहे; तुम्ही देश व नगरांचा आणि त्यात राहणाऱ्या प्रत्येकाचा नाश केला आहे.