Skip to content

Nabal बद्दल बायबलमधील वचने

37 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. माओन येथे एक श्रीमंत मनुष्य होता, ज्याची कर्मेलमध्ये मालमत्ता होती, त्याच्याकडे एक हजार बोकडे आणि तीन हजार मेंढरे होते आणि तो कर्मेलमध्ये लोकर कातरत होता.

  2. त्याचे नाव नाबाल आणि त्याच्या पत्नीचे नाव अबीगईल होते. ती बुद्धिमान व सुंदर स्त्री होती, परंतु तिचा पती कालेबच्या वंशाचा असून कठोर व दुष्ट वृत्तीचा होता.

  3. आणि नाबाल मेंढरांची कातरणी करीत आहे असे दावीदाने रानात ऐकले.

  4. तेव्हा दावीदाने दहा तरुण पुरुष पाठवित म्हटले, “कर्मेल येथे नाबालकडे जा आणि माझ्या नावाने त्याला अभिवादन करा.

  5. त्याला म्हणा, ‘चिरकाळ जग! तुला, तुझ्या घराण्याला व सर्व जे तुझे आहे त्यांना चांगली स्वस्थता लाभो!

  6. “ ‘मी ऐकत आहे की, ही मेंढरे कातरण्याची वेळ आहे. जेव्हा तुझे मेंढपाळ आमच्याबरोबर होते, आम्ही त्यांच्याशी वाईट वागलो नाही आणि जितका काळ ते कर्मेल येथे होते त्यांचे काहीही हरवले नाही.

  7. आपल्या चाकरांना ते विचार आणि ते तुला सांगतील. म्हणून आता माझ्या माणसांवर कृपादृष्टी कर, कारण आम्ही सणाच्या वेळेस आलो आहोत, तर कृपा करून जे काही तुझ्या हाती येईल ते तुझ्या सेवकांना आणि तुझा पुत्र दावीद यांना दे.’ ”

  8. जेव्हा दावीदाची माणसे तिथे आली, त्यांनी दावीदाच्या नावाने हा निरोप नाबालास दिला व ते वाट पाहत राहिले.

  9. नाबालने दावीदाच्या सेवकांना उत्तर दिले, “कोण हा दावीद? कोण हा इशायाचा पुत्र? आजकाल पुष्कळ सेवक त्यांच्या मालकांपासून पळून जात आहेत.

  10. जी भाकर व जे पाणी आणि जे मांस मी माझी मेंढरे कातरणार्‍यांसाठी कापून ठेवले आहे ते, जी माणसे कुठून आली हे मला माहीत नाही अशांना द्यावे काय?”

  11. तेव्हा दावीदाची माणसे परत त्यांच्या वाटेने गेली. आणि पोहोचल्यावर प्रत्येक शब्दाचा अहवाल दावीदाला दिला.

  12. तेव्हा दावीद त्याच्या माणसांना म्हणाला, “प्रत्येकाने आपली तलवार कंबरेस बांधा,” आणि त्यांनी तसे केले आणि दावीदानेसुद्धा त्याची तलवार कंबरेस बांधली. सुमारे चारशे पुरुष दावीदाबरोबर गेले आणि दोनशे पुरुष सामानाजवळ राहिले.

  13. चाकरांपैकी एकाने नाबालाची पत्नी अबीगईल हिला सांगितले, “दावीदाने रानातून आपल्या धन्याला अभिवादन देण्यासाठी निरोप्यांना पाठविले, परंतु त्यांनी त्यांचा अपमान केला.

  14. तरीही ही माणसे आमच्याबरोबर चांगलीच होती. ते आमच्याशी वाईट वागले नाहीत आणि संपूर्ण वेळ आम्ही शेतामध्ये त्यांच्याजवळ होतो तेव्हा आमचे काहीही हरवले नाही.

  15. जेव्हा आम्ही आमची मेंढरे त्यांच्याबरोबर राखीत होतो, तेव्हा रात्रंदिवस ते भिंतीसारखे आमच्या सभोवती होते.

  16. आता काय करावे याचा तुम्ही विचार करा, कारण आमच्या मालकावर आणि त्यांच्या संपूर्ण घराण्यावर संकट येत आहे. ते इतके दुष्ट मनुष्य आहेत की, त्यांच्याबरोबर बोलण्यास कोणी धजत नाही.”

  17. तेव्हा अबीगईलने घाई केली. तिने दोनशे भाकरी, दोन बुधले द्राक्षारस, पाच मेंढरांचे शिजविलेले मांस, पाच सिआह भाजलेले धान्य, मनुक्यांच्या शंभर व अंजिराच्या दोनशे ढेपा घेऊन ते सर्व गाढवांवर लादले.

  18. आणि ती आपल्या सेवकांना म्हणाली, “तुम्ही पुढे जा; मी तुमच्यामागे येते.” परंतु तिने तिचा पती नाबाल याला काहीही सांगितले नाही.

  19. ती गाढवावर बसून डोंगराच्या ओढ्याकडून जात असताना, तिथे दावीद आणि त्याची माणसे तिच्या समोरून येत होती व ती त्यांना भेटली.

  20. दावीद नुकताच म्हणाला होता, “त्याचे काही हरवू नये म्हणून मी रानात या लोकांच्या मालमत्तेवर पहारा ठेवला, ते व्यर्थच गेले. त्याने मला चांगल्याची फेड वाईटाने केली आहे.

  21. उद्या सकाळपर्यंत त्याच्या लोकांपैकी मी एकही पुरुष जिवंत ठेवला तर परमेश्वर दावीदाचे तसेच किंवा त्यापेक्षा अधिक वाईट करो!”

  22. जेव्हा अबीगईलने दावीदाला पाहिले, तेव्हा ती घाईने गाढवावरून उतरली आणि तिने दावीदासमोर तोंड जमिनीकडे करून अभिवादन केले.

  23. ती त्याच्या पायावर पडली आणि म्हणाली, “माझ्या धन्या, आपल्या सेवकाच्या अपराधांची क्षमा करा, आणि मला तुमच्याशी बोलू द्या; तुमच्या दासीचे बोलणे ऐकून घ्या.

  24. माझ्या धन्या, तो दुष्ट मनुष्य नाबाल याच्याकडे लक्ष देऊ नका. तो त्याच्या नावाप्रमाणेच आहे, त्याच्या नावाचा अर्थ मूर्ख आहे आणि त्याच्या ठायी मूर्खपणा आहे. परंतु ज्या पुरुषांना माझ्या धन्याने पाठवले त्यांना मी पाहिले नाही.”

  25. तर आता, माझ्या धन्या, याहवेह तुमच्या जिवंत परमेश्वराची व तुमची शपथ, याहवेहने तुम्हाला रक्तपातापासून आणि तुमच्या हातांना सूड घेण्यापासून आवरले आहे, तुमचे सर्व शत्रू आणि जे माझ्या धन्याला इजा आणू पाहतात ते नाबालाप्रमाणे होवो.