Travellers बद्दल बायबलमधील वचने: Provisions for the way
Provisions for the way बद्दल वचने
म्हणून आमचे वडीलजन आणि आमच्या लोकांनी आम्हाला सूचना केली, ‘लांबच्या प्रवासाची तयारी करा: वाटेसाठी शिदोरी घ्या आणि इस्राएली लोकांकडे जा. आपली राष्ट्रे त्यांचे दास आहेत असे त्यांना जाहीर करा आणि शांतीच्या करारासाठी त्यांना विनंती करा.’
आम्ही तुमच्याकडे येण्यास आमचे ठिकाण सोडले, तेव्हा या भाकरी गरम होत्या, परंतु आता तुम्ही पाहता की त्या वाळून त्यांना बुरशी लागली आहे.
आमच्याजवळ आमच्या गाढवांसाठी दाणा आणि वैरण आहे आणि आमच्या सेवकांसाठी भाकरी आणि द्राक्षारस भरपूर आहे—मी, तुमची सेविका आणि आमच्यासोबतचा तरुण. आम्हाला कशाचीही उणीव नाही.”