मुख्य मजकुरावर जा

Travellers बद्दल बायबलमधील वचने: Generally treated with great hospitality

15 वचने · 39 पैलू

Generally treated with great hospitality बद्दल वचने

  1. तो त्यांना म्हणाला, “माझ्या स्वामी, माझ्यावर आपली कृपा झाली असल्यास, माझ्या घरी न येता पुढे जाऊ नका.

  2. मी थोडे पाणी आणतो आणि तुम्ही आपले पाय धुऊन या झाडाखाली विसावा घ्या.

  3. तुम्हाला ताजेपणा यावा म्हणून थोडे अन्नही आणतो मग तुम्ही पुढील प्रवासास निघा; तुम्ही तुमच्या या सेवकाकडे आला आहात.” “ठीक आहे. तू म्हणतोस त्याप्रमाणे कर.” त्यांनी उत्तर दिले.

  4. मग अब्राहाम धावत आपल्या तंबूत येऊन साराहला म्हणाला, “लवकर तीन सिआ सपीठ घेऊन ते मळ आणि भाकरी कर.”

  5. नंतर अब्राहाम आपल्या गुरांच्या कळपाकडे गेला, त्यातील एक कोवळे व उत्तम वासरू त्याने निवडले आणि ते लवकर बनवावे म्हणून एका नोकराकडे दिले.

  6. मग त्याने दूध, दही आणि वासराचे मांस घेतले, जे त्याने बनविले होते आणि ते त्यांच्यासमोर ठेवले; आणि ते जेवत असता तो त्यांच्याजवळ झाडाखाली उभा राहिला.

  7. लोट त्यांना म्हणाला, “स्वामींनो, कृपा करून आज रात्री तुम्ही आपल्या सेवकाच्या घरी या. आपण आपले पाय धुवावे आणि रात्री इथे मुक्काम करावा, मग पहाटे तुमच्या पुढील प्रवासास निघा.” ते म्हणाले, “नको, आम्ही चौकातच रात्र घालवू.”

  8. तिने उत्तर दिले, “मी नाहोर व मिल्का, यांचा पुत्र बेथुएल यांची कन्या आहे.”

  9. मग तो मनुष्य त्यांच्या घरी गेला. उंटांवरून सामान उतरून त्यांना गवत आणि खाण्याकरिता चाराही देण्यात आला. त्यास व त्याच्या बरोबरीच्या लोकांस पाय धुण्याकरिता त्याने पाणीही दिले.

  10. यानंतर भोजन वाढण्यात आले; परंतु तो म्हणाला, “मला जे काही सांगायचे ते सांगेपर्यंत मी भोजन करणार नाही.” लाबान म्हणाला, “ठीक आहे, आम्हाला सांग.”

  11. “तो कुठे आहे?” रऊएलाने आपल्या मुलींना विचारले, “त्याला तुम्ही का सोडून आला? काहीतरी खावे म्हणून त्याला आमंत्रण द्या.”

  12. “तुमचे कल्याण असो,” तो म्हातारा गृहस्थ म्हणाला. “तुम्हाला जे काही लागेल ते मला पुरवू द्या. फक्त रात्र चौकात घालवू नका.”

  13. तेव्हा त्याने त्यांना आपल्याबरोबर घरी नेले. ते विश्रांती घेत असताना आणि त्यांच्या गाढवांना वैरण दिली. त्यांनी आपले पाय धुतले, त्यांनी काही खाणेपिणे केले.

  14. परंतु कोणी अनोळखी व्यक्तीने देखील रस्त्यावर रात्र काढली नाही, कारण प्रवाशांसाठी माझ्या घराचे दार नेहमीच उघडे असे;

  15. अपरिचितांचे आदरातिथ्य करण्यास विसरू नका, कारण असे करताना काहींनी नकळत देवदूतांचा पाहुणचार केला आहे.