Skip to content

Jezreel

22 verses

32.5500, 35.3300 गूगल नकाशावर पाहा

Jezreel चा उल्लेख असलेली वचने

  1. त्यांच्या सीमेमध्ये या नगरांचा समावेश होता: येज्रील, कसुल्लोथ, शूनेम,

  2. त्याने गिलआद, अशुरी, येज्रील आणि एफ्राईम, बिन्यामीन व सर्व इस्राएलवर त्याला राजा नेमले.

  3. अहीलुदचा पुत्र बाअनाकडे तानख व मगिद्दो आणि येज्रीलखाली असलेल्या सारेथान जवळील बेथ-शानपर्यंत सर्व प्रदेश, तसेच बेथ-शानपासून योकमेअम पर्यंतचा आबेल-महोलाहचा प्रदेश;

  4. थोड्याच वेळात, आकाश काळ्या ढगांनी भरले, वारा वाहू लागला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला आणि अहाब रथात बसून येज्रील येथे निघाला.

  5. याहवेहचे सामर्थ्य एलीयाहवर आले आणि तो आपली कंबर बांधून अहाबापुढे येज्रीलपर्यंत धावत गेला.

  6. काही काळानंतर, येज्रीली नाबोथच्या द्राक्षमळ्यासंबंधी एक घटना घडली, हा द्राक्षमळा अहाब राजाच्या शोमरोनातील येज्रील राजवाड्याजवळ होता.

  7. “आणि ईजबेलविषयी याहवेह म्हणतात: ‘येज्रीलच्या भिंतीजवळ ईजबेलला कुत्रे खातील.’

  8. रामाह येथे अरामचा राजा हजाएलशी लढताना झालेल्या जखमांना मलम पट्टी करण्यासाठी योराम राजा येज्रीलला परतला. यहूदीयाचा राजा यहोरामचा पुत्र अहज्याह हा अहाबाचा पुत्र योरामची प्रकृती पाहण्यासाठी येज्रीलला गेला, कारण योराम जखमी झाला होता.

  9. ईजबेलला येज्रीलच्या भूमीत कुत्री फाडून खातील आणि तिला कोणीही मूठमाती देणार नाही.’ ” मग त्या तरुणाने दार उघडले आणि पळाला.

  10. पण यहोराम राजा हा अरामचा राजा हजाएलशी लढताना ज्या जखमा अरामी लोकांनी दिल्या होत्या, त्या जखमा बर्‍या व्हाव्यात म्हणून तो येज्रीलला परतला होता.) येहू म्हणाला, “मी राजा व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर आपण काय केले आहे हे कोणीही या नगरीतून निसटून ही बातमी येज्रीलमध्ये कोणालाही कळवू नये म्हणून खबरदारी घ्या.”

  11. मग येहू रथात बसला आणि येज्रीलास गेला, कारण योराम तिथे विसावा घेत होता आणि यहूदीयाचा राजा अहज्याह त्याला भेटण्यास खाली गेला होता.

  12. येज्रीलच्या बुरुजावर असलेला पहारेकरी येहू व त्याची टोळी येताना पाहून ओरडून म्हणाला, “मला एक टोळी येताना दिसत आहे.” यहोरामाने आदेश दिला, “एका घोडेस्वारास त्यांना भेटण्यास पाठवा, जो त्यांना विचारेल, शांतीने येत आहात ना?”

  13. नंतर येहू येज्रीलास गेला. जेव्हा ईजबेलने हे ऐकले, तेव्हा तिने आपल्या पापण्या रंगविल्या व केशभूषा करून ती खिडकीतून बाहेर पाहत बसली.

  14. ते परत गेले आणि येहूला सांगितले, तेव्हा तो म्हणाला, “याहवेहचे वचन जे त्यांनी आपला सेवक एलीयाह तिश्बी याच्यामार्फत सांगितले होते ते हेच होते; येज्रीलच्या शेतात कुत्री ईजबेलचे मांस खातील.

  15. आणि ईजबेलचे शरीर येज्रीलातील शेतात खताप्रमाणे विखुरले जाईल. हे कोणालाही सांगता येणार नाही की, ही ईजबेल आहे.”

  16. मग येहूने दुसरे पत्र त्यांना लिहिले आणि त्यात असे लिहिलेले होते, “जर तुम्ही माझ्या बाजूचे असाल आणि माझ्या आज्ञा पाळणार असाल, तर उद्या याच वेळेला तुम्ही तुमच्या धन्याच्या पुत्रांची शिरे घेऊन मजकडे येज्रीलमध्ये या.” आता सत्तर राजपुत्र शहराच्या प्रमुख व्यक्तीबरोबर होते, जे त्यांचे संगोपन करत होते.

  17. जेव्हा त्यांना हे पत्र मिळाले तेव्हा त्यांनी राजपुत्रांना घेतले आणि सर्व सत्तर पुत्रांना ठार केले. त्यांनी त्यांची शिरे टोपल्यांमध्ये भरून ती येहूला येज्रीलमध्ये पाठवून दिली.

  18. असे येहूने येज्रीलमधील अहाबाच्या घराण्यातील सर्वांना, त्याचे मुख्य लोक, त्याचे सर्व जवळचे मित्र आणि त्याच्या याजकांना ठार मारले आणि कोणालाही जिवंत सोडले नाही.

  19. रामाह येथे अरामचा राजा हजाएलशी लढताना झालेल्या जखमांना मलम पट्टी करण्यासाठी योराम राजा येज्रीलला परतला. यहूदीयाचा राजा यहोरामचा पुत्र अहज्याह अहाबाचा पुत्र योरामची प्रकृती पाहण्यासाठी येज्रीलला गेला, कारण योराम जखमी झाला होता.

  20. तेव्हा याहवेह होशेयला म्हणाले, “त्याचे नाव येज्रील ठेव, कारण मी लवकरच येहूच्या घराण्याला येज्रीलच्या रक्ताबद्दल शिक्षा देईन आणि मी इस्राएल राज्याचा शेवट करेन.

  21. तेव्हा यहूदाहचे संतान व इस्राएलचे संतान एकत्र येतील; ते एक पुढारी नेमतील आणि देशातून एकत्र बाहेर येतील, कारण तो येज्रीलचा किती महान दिवस असेल.

  22. “आणि पृथ्वी धान्य, नवीन द्राक्षारस आणि जैतून तेल यांना प्रतिसाद देईल, आणि ते येज्रीलास प्रतिसाद देतील.