Jezebel बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
एलीयाहने जे काही केले आणि त्याने बआलाच्या सर्व संदेष्ट्यांना तलवारीने कसे मारून टाकले ते अहाबाने ईजबेलला सांगितले.
तेव्हा ईजबेलने एलीयाहकडे असे म्हणत एक दूत पाठवला, “उद्या या वेळेपर्यंत मी त्यांच्यातील एकाप्रमाणे तुझ्या जिवाचे केले नाही तर देव माझे त्याहूनही अधिक वाईट करो.”
एलीयाह घाबरून आपला जीव घेऊन पळून गेला. जेव्हा तो यहूदीया प्रांतातील बेअर-शेबा नगरात आला, त्याने आपल्या सेवकाला तिथे सोडले,
तेव्हा त्याची पत्नी ईजबेल आत आली व त्याला विचारले, “तुम्ही इतके खिन्न का आहात? तुम्ही अन्न का खात नाही?”
तो तिला म्हणाला, “कारण येज्रीली नाबोथला मी म्हणालो, ‘तुझा द्राक्षमळा मला विकत दे; नाहीतर तुझी इच्छा असली तर, त्याबदल्यात त्याच किमतीत मी तुला दुसर्या ठिकाणी द्राक्षमळा देईन.’ परंतु तो म्हणाला, ‘मी तुला माझा द्राक्षमळा देणार नाही.’ ”
त्याची पत्नी ईजबेल म्हणाली, “इस्राएलचा राजा असताना तुमचे वर्तन असे असावे काय? उठा आणि भोजन करा! आपले मन आनंदित करा. येज्रीली नाबोथचा द्राक्षमळा मी तुम्हाला मिळवून देईन.”
मग तिने अहाबाच्या नावाने पत्रे लिहिली, त्यावर त्याचा शिक्का मारला आणि नाबोथच्या शहरात त्याच्याबरोबर राहत असलेले वडीलजन व प्रतिष्ठित लोकांकडे ती पाठवली.
त्या पत्रांमध्ये तिने लिहिले: “शहरात उपास जाहीर करा आणि नाबोथला सर्वात महत्त्वाच्या स्थळी बसवा.
परंतु त्याच्यासमोर दोन अधम व्यक्तींना बसवावे आणि ज्या परमेश्वराने आशीर्वाद दिला त्यांना व राजाला शाप दिल्याचा आरोप त्याच्यावर आणावा. मग त्याला बाहेर नेऊन तो मरेपर्यंत धोंडमार करा.”
तेव्हा नाबोथच्या शहरात राहत असलेल्या वडीलजन व प्रतिष्ठित लोकांनी ईजबेलने लिहिलेल्या पत्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे केले.
त्यांनी उपास जाहीर केला व लोकांमधील अगदी महत्त्वाच्या स्थळी नाबोथला बसविले.
मग दोन अधम व्यक्ती त्याच्यासमोर येऊन बसले आणि लोकांसमक्ष नाबोथविरुद्ध आरोप आणले. ते म्हणाले, “नाबोथने परमेश्वराला व राजाला शाप दिला आहे.” म्हणून त्यांनी त्याला शहराच्या बाहेर नेले आणि तो मरेपर्यंत त्याला धोंडमार केली.
नंतर त्यांनी ईजबेलला निरोप पाठवून म्हटले: “नाबोथला धोंडमार करून जिवे मारले आहे.”
येज्रीली नाबोथला धोंडमार करून मारले आहे हे ईजबेलने ऐकताच, ती अहाबाला म्हणाली, “उठा आणि ज्या येज्रीली नाबोथने तुम्हाला आपला द्राक्षमळा पैसे घेऊन देण्यास नाकारले त्याचा द्राक्षमळा ताब्यात घ्या. तो आता जिवंत नाही, तो मेला आहे.”
येज्रीली नाबोथ मेला आहे असे जेव्हा अहाबाने ऐकले, तेव्हा तो उठला व नाबोथचा द्राक्षमळा ताब्यात घेण्यास निघाला.
नंतर येहू येज्रीलास गेला. जेव्हा ईजबेलने हे ऐकले, तेव्हा तिने आपल्या पापण्या रंगविल्या व केशभूषा करून ती खिडकीतून बाहेर पाहत बसली.
जसा येहू वेशीतून आत आला, तिने विचारले, “अरे आपल्या धन्याचा वध करणाऱ्या जिम्रीच्या मुला, तू शांतीने आला आहेस का?”
त्याने वर खिडकीकडे पाहिले आणि मोठ्याने म्हणाला, “माझ्या बाजूचे कोण आहेत? कोण?” तेव्हा दोघा तिघा खोजांनी त्याच्याकडे डोकावून पाहिले.
येहूने म्हटले, “तिला खिडकीतून खाली ढकलून द्या.” तेव्हा त्यांनी तिला खाली ढकलून दिले, आणि तिच्या रक्ताच्या काही चिरकांड्या भिंतीवर आणि घोड्यांवर पडल्या आणि घोड्यांनी तिला पायाखाली तुडविले.
येहू आत गेला आणि त्याने खाणेपिणे केले. तो म्हणाला, “त्या शापित स्त्रीची काळजी घ्या आणि तिला मूठमाती द्या. कारण ती एका राजकन्या होती.”
परंतु जेव्हा ते तिला मूठमाती देण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना तिची फक्त कवटी व हात आणि पायच सापडले.
ते परत गेले आणि येहूला सांगितले, तेव्हा तो म्हणाला, “याहवेहचे वचन जे त्यांनी आपला सेवक एलीयाह तिश्बी याच्यामार्फत सांगितले होते ते हेच होते; येज्रीलच्या शेतात कुत्री ईजबेलचे मांस खातील.
आणि ईजबेलचे शरीर येज्रीलातील शेतात खताप्रमाणे विखुरले जाईल. हे कोणालाही सांगता येणार नाही की, ही ईजबेल आहे.”