Jezreel
Jezreel चा उल्लेख असलेली वचने
तेव्हा याहवेह होशेयला म्हणाले, “त्याचे नाव येज्रील ठेव, कारण मी लवकरच येहूच्या घराण्याला येज्रीलच्या रक्ताबद्दल शिक्षा देईन आणि मी इस्राएल राज्याचा शेवट करेन.
त्या दिवशी येज्रीलच्या खोर्यात मी इस्राएलचे धनुष्य मोडून टाकीन.”
तेव्हा यहूदाहचे संतान व इस्राएलचे संतान एकत्र येतील; ते एक पुढारी नेमतील आणि देशातून एकत्र बाहेर येतील, कारण तो येज्रीलचा किती महान दिवस असेल.
“आणि पृथ्वी धान्य, नवीन द्राक्षारस आणि जैतून तेल यांना प्रतिसाद देईल, आणि ते येज्रीलास प्रतिसाद देतील.