मुख्य मजकुरावर जा

The Ishmaelites बद्दल बायबलमधील वचने

32 वचने · 30 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुम्ही, तेमा येथे राहणाऱ्यांनो, तहानलेल्यांसाठी पाणी घेऊन या; पलायन केलेल्यांसाठी अन्न घेऊन या.

  2. ते तलवारीपासून पळतात म्यानातून उपसलेल्या तलवारीपासून ते पळतात, वाकवून नेम धरलेल्या धनुष्यापासून आणि युद्धाच्या कठोरतेपासून पळतात.

  3. प्रभू मला असे म्हणतात: “एका वर्षाच्या आत, कराराने बांधलेला सेवक जसे एकएक दिवस मोजत असतो, तसे केदारचे सर्व वैभव नाहीसे होईल.

  4. केदारचे वाचलेले धनुर्धारी, योद्धे थोडेच असतील.” इस्राएलचे परमेश्वर, याहवेह असे बोलले आहेत.

  5. ददान, तेमा व बूज, तसेच जे दूरच्या देशात असलेले;

  6. आणि अरबस्थानातील सर्व राजे व वाळवंटात राहणारे विदेशी लोकांचे राजे;

  7. जिम्री, एलाम व मेदिया येथील सर्व राजे;