Skip to content

The Ishmaelites बद्दल बायबलमधील वचने: Gideon

15 वचने · 30 पैलू

Gideon बद्दल वचने

  1. आता जेबह राजा व सलमुन्ना राजा आपल्या उरलेल्या पंधरा हजार सैनिकांसह कर्कोर येथे पोहोचले होते, पूर्वेकडील देशांच्या मित्र सेनांपैकी तेवढेच सैनिक उरले होते; कारण त्यांचे एक लाख वीस हजार सैनिक आधीच ठार झालेले होते.

  2. मग गिदोनाने नोबाह व योगबेहाहच्या पूर्वेस राहुट्यात राहणार्‍या लोकांच्या वाटेने वर जाऊन बेसावध सेनेवर अचानक हल्ला चढविला.

  3. जेबह व सलमुन्ना हे दोन मिद्यानी राजे पळाले, परंतु त्याने त्यांचा पाठलाग केला व त्यांना पकडले आणि त्यांच्या सर्व सैन्याची दाणादाण केली.

  4. योआशाचा पुत्र गिदोन युद्धावरून हेरेसच्या खिंडीतून परत आला.

  5. तिथे त्याने सुक्कोथातील एका तरुणास पकडले व त्याला विचारले आणि त्या तरुणाने सुक्कोथ येथील सर्व सत्याहत्तर अधिकारी आणि वडीलजनांची नावे लिहून दिली.

  6. मग गिदोन आला आणि सुक्कोथ येथील लोकांना म्हणाला, “यांना पाहा हे जेबह राजा व सलमुन्ना यांच्याविषयी तुम्ही मला टोमणा मारत म्हटले होते, ‘आता तुझ्या हातात ओरेब व जेबाचे हात आहेत काय? मग आम्ही तुझ्या थकलेल्या सैन्याला भाकरी का द्यावी?’ ”

  7. मग त्याने त्या शहरातील वडिलांना पकडले आणि सुक्कोथ येथील लोकांना रानातील काटे आणि काटेरी झुडपांची शिक्षा देऊन धडा शिकविला.

  8. त्याने पेनुएल येथील बुरूज मोडून टाकला व त्या शहरातील पुरुषांचा संहार केला.

  9. मग गिदोनाने जेबह राजा व सलमुन्ना राजाला विचारले, “तुम्ही ताबोर येथे ज्या पुरुषांना ठार केले ते कसे होते?” त्यांनी उत्तर दिले, “ते तुझ्यासारखेच, प्रत्येकजण राजपुत्राप्रमाणे दिसत होते.”

  10. गिदोनाने म्हटले, “ते माझे भाऊ होते, माझ्याच आईचे पुत्र. जीवित याहवेहची शपथ घेऊन सांगतो की त्यांना तुम्ही ठार केले नसते, तर मी तुमचा वध केला नसता.”

  11. मग आपल्या ज्येष्ठपुत्र येथेर याच्याकडे वळून त्याला म्हणाला, “त्यांना ठार कर!” परंतु येथेर याने आपली तलवार उपसली नाही, कारण तो कोवळा मुलगा होता आणि भयभीत झाला.

  12. जेबह व सलमुन्ना म्हणाले, “तूच ते कर. ‘कारण जसा पुरुष, तसे त्याचे बल.’ ” तेव्हा गिदोन पुढे आला आणि त्यांना ठार केले व त्यांच्या उंटांच्या गळ्यांतील अलंकार काढून घेतले.

  13. आता इस्राएलचे लोक गिदोनास म्हणू लागले, “तू आमच्यावर राज्य कर; तू आणि तुझे पुत्र आणि तुझे नातूही; कारण मिद्यानी लोकांच्या हातातून तू आम्हाला सोडविले आहे.”

  14. परंतु गिदोनाने त्यांना म्हटले, “मी तुमच्यावर राज्य करणार नाही किंवा माझा पुत्रही तुमच्यावर राज्य करणार नाही. याहवेह तुमच्यावर राज्य करतील.”

  15. आणि गिदोन म्हणाला, “माझी एक विनंती आहे, तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या लुटीतील एक कुंडले मला द्यावे.” (सोन्याची कुंडले घालण्याची इश्माएली लोकांची प्रथा होती.)