मुख्य मजकुरावर जा

Trumpet बद्दल बायबलमधील वचने: Figurative

5 वचने · 46 पैलू

"Trumpet" साठी शोधा

Figurative बद्दल वचने

  1. आणि त्या दिवशी मोठा कर्णा वाजू लागेल. ज्यांचा अश्शूरमध्ये नाश होत होता आणि जे इजिप्तमध्ये बंदिवासात गेले होते, ते येतील आणि यरुशलेममधील पवित्र पर्वतावर याहवेहची उपासना करतील.

  2. आणि ती तलवार देशावर येत आहे असे पाहताच लोकांना सावध करण्यासाठी तो कर्णा वाजवितो,

  3. सीयोनात कर्णा वाजवा; माझ्या पवित्र पर्वतावर धोक्याची घंटा वाजवा. देशात राहणार्‍या प्रत्येकाचा भीतीने थरकाप होवो, कारण याहवेहचा दिवस येत आहे. तो अगदी हाताशी आहे—

  4. मग याहवेह त्यांच्यावर प्रगट होतील; त्यांचे बाण विजेसारखे चमकतील. सार्वभौम याहवेह रणशिंग फुंकतील; ते दक्षिणेतील वादळातून चालतील,

  5. “म्हणून तुम्ही एखाद्या गरजवंताला दान देता, तेव्हा तुतार्‍या वाजवून जाहीर करू नका, जसे ढोंगी रस्त्यांवर किंवा सभागृहांमध्ये लोकांकडून मान करून घेण्यासाठी करतात. मी तुम्हाला खरोखर सांगतो की, त्यांना त्यांचे पूर्ण प्रतिफळ मिळाले आहे.