मुख्य मजकुरावर जा

Trumpet बद्दल बायबलमधील वचने: Used in war

12 वचने · 46 पैलू

Used in war बद्दल वचने

  1. तो बेभान आवेशात भूमी गिळंकृत करतो; रणशिंगाच्या गर्जनेने तो स्तब्ध उभा राहू शकत नाही.

  2. तुतारीच्या नादाला तो ‘वाह!’ असे ओरडतो, दुरूनच तो लढाईचा वास घेतो, मग ती सेनापतीची ओरड असो किंवा रणगर्जना.

  3. अहो, माझ्या यातना, माझ्या यातना! मला अत्यंत वेदना होत आहेत. अहो, माझ्या ह्रदयाच्या यातना! माझे ह्रदय माझ्यातच धडधडते, मी शांत राहू शकत नाही. कारण मी रणशिंगाचा आवाज ऐकला आहे; मी युद्धाची ललकारी ऐकली आहे.

  4. “बिन्यामीन वंशजानो, आपल्या सुरक्षेसाठी तुम्ही पलायन करा! यरुशलेममधून पळून जा! तकोवा इथून कर्ण्याचा आवाज येताच बेथ-हक्करेम येथे धोक्याची सूचना देणारे संकेत द्या! कारण उत्तरेकडून येणारा नाश पुढे दिसत आहे, भयंकर विनाश.

  5. मी तुमच्यावर पहारेकरी नेमले आणि म्हटले, ‘रणशिंगाच्या आवाजाकडे लक्ष द्या!’ परंतु तुम्ही म्हटले, ‘आम्ही ऐकणार नाही.’

  6. आणि आम्ही इजिप्तमध्ये जाऊन राहू, जिथे आम्हाला लढाई, रणशिंगे ऐकू येणार नाहीत किंवा अन्नाची भूक यापासून सुटका मिळेल,’

  7. “या भूमीवर आपले ध्वज फडकवा! राष्ट्रांमध्ये रणशिंगे वाजवा! तिच्याशी युद्ध करण्यासाठी राष्ट्रांना सुसज्ज करा; या राष्ट्रांना तिच्याविरुद्ध पाचारण करा: अरारात, मिन्नी व आष्कनाज. तिच्याविरुद्ध सेनापतीची नेमणूक करा; टोळधाडी सारखा घोड्यांचा प्रचंड समुदाय पाठवा.

  8. “ ‘त्यांनी कर्णे वाजविली आहे, त्यांनी सर्वकाही सज्ज केले आहे, परंतु कोणी युद्धात जाणार नाही, कारण संपूर्ण समुहावर माझा क्रोध आहे.

  9. मी मोआबावर अग्नी पाठवेन तो करीयोथच्या किल्ल्याला भस्म करेन. युद्धाच्या आक्रोशात आणि रणशिंगाच्या आवाजात मोआब प्रचंड नाशाने खाली जाईल.

  10. नगरात जेव्हा रणशिंगाचा आवाज येतो, तेव्हा लोक घाबरत नाही काय? शहरात विपत्ती आली तर, ती याहवेहने घडवून आणली नाही काय?

  11. तो दिवस तटबंदीच्या नगरांविरुद्ध आणि कोपऱ्यातील बुरुजा विरुद्ध रणशिंगाचा व रणगर्जनांच्या निनादांचा असेल.

  12. जर कर्णे स्पष्ट स्वर काढणार नाही, तर युद्धावर जाण्यासाठी तयारी कोण करेल?