Trumpet बद्दल बायबलमधील वचने: Used at the foundation of the second temple
Used at the foundation of the second temple बद्दल वचने
बांधकाम करणार्यांनी याहवेहच्या मंदिराच्या पायाचे बांधकाम पूर्ण केले, तेव्हा याजकांनी आपले याजकीय पोशाख घातले व आपल्या तुतार्या वाजविल्या. आसाफाच्या वंशातील लेव्यांनी आपल्या झांजा वाजविल्या. इस्राएलच्या दावीद राजाने लावून दिलेल्या क्रमाप्रमाणे त्यांनी याहवेहची स्तुती केली.
त्यांनी स्तुतिगान गाईले व पुढील गीत गाऊन याहवेहची उपकारस्तुती केली: “याहवेह चांगले आहेत. इस्राएलावरील त्यांची प्रीती व दया सर्वकाळ टिकणारी आहेत.” याहवेहच्या मंदिराचा पाया घातल्याबद्दल, त्यांनी मोठ्याने जयघोष करीत याहवेहची स्तुती केली.