Trumpet बद्दल बायबलमधील वचने: The priests to blow the sacred
The priests to blow the sacred बद्दल वचने
“अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनीच कर्णे वाजवावे. हा तुम्हाला व येणार्या तुमच्या पिढ्यांसाठी सर्वकाळचा नियम असावा.
सर्व लेवीय जे संगीतकार होते—आसाफ, हेमान, यदूथून आणि त्यांचे पुत्र आणि नातेवाईक—वेदीच्या पूर्व बाजूला उत्तम तागाची वस्त्रे घातलेले आणि झांजा, सारंग्या आणि वीणा वाजवित एकशेवीस याजक उभे राहिले.
याजकांनी आपआपले स्थान ग्रहण केले, दावीद राजाने याहवेहची स्तुती करण्यासाठी व “त्यांची प्रीती सर्वकाळ टिकून राहते” असे म्हणत आभार मानले होते, तेव्हा जशी संगीतवाद्यांची रचना केली होती आणि त्यांचा उपयोग केला होता, तशाच प्रकारे लेवी लोकांनीही स्थान ग्रहण केले. लेव्यांच्या समोरच्या बाजूला याजकगण त्यांचे रणशिंग वाजवित होते आणि सर्व इस्राएली लोक उभे होते.