मुख्य मजकुरावर जा

Trumpet बद्दल बायबलमधील वचने

139 वचने · 46 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तो दिवस तटबंदीच्या नगरांविरुद्ध आणि कोपऱ्यातील बुरुजा विरुद्ध रणशिंगाचा व रणगर्जनांच्या निनादांचा असेल.

  2. मग याहवेह त्यांच्यावर प्रगट होतील; त्यांचे बाण विजेसारखे चमकतील. सार्वभौम याहवेह रणशिंग फुंकतील; ते दक्षिणेतील वादळातून चालतील,

  3. “म्हणून तुम्ही एखाद्या गरजवंताला दान देता, तेव्हा तुतार्‍या वाजवून जाहीर करू नका, जसे ढोंगी रस्त्यांवर किंवा सभागृहांमध्ये लोकांकडून मान करून घेण्यासाठी करतात. मी तुम्हाला खरोखर सांगतो की, त्यांना त्यांचे पूर्ण प्रतिफळ मिळाले आहे.

  4. तो कर्ण्यांच्या महानादाबरोबर आकाशांच्या या टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत आणि चारही दिशेकडून त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करण्यासाठी आपल्या दूतांस पाठवेल.

  5. जर कर्णे स्पष्ट स्वर काढणार नाही, तर युद्धावर जाण्यासाठी तयारी कोण करेल?

  6. हे सर्व क्षणार्धात, डोळ्याची उघडझाप होते न होते तोच, शेवटचे रणशिंग वाजल्याबरोबर घडून येईल. कारण तुतारीचा नाद होईल आणि मरण पावलेले अविनाशीपणात उठविले जातील, आणि आपण बदलले जाऊ.

  7. कारण प्रभू स्वतःच आज्ञा करणार्‍या मोठ्या ध्वनीने, प्रधान दूताच्या वाणीने आणि परमेश्वराच्या तुतारीच्या आवाजाने स्वर्गातून खाली उतरतील. मग ख्रिस्तामध्ये जे मरण पावले आहेत, ते प्रथम उठतील.

  8. तिथे रणशिंगाचा इतका भयावह नाद झाला व भयप्रद संदेश देणारी एक वाणी ऐकू आली की लोकांनी परमेश्वराला त्यांचे बोलणे थांबविण्याची याचना केली.

  9. प्रभूच्या दिवशी मी आत्म्यात संचारलो आणि मी माझ्यामागे रणशिंगाच्या आवाजासारखा मोठा आवाज ऐकला.

  10. यानंतर मी पाहिले, आणि माझ्यापुढे स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती व जी रणशिंग ध्वनीसारखी होती, ती म्हणाली, “इकडे वर ये, म्हणजे ज्यागोष्टी यानंतर घडणार आहेत त्या मी तुला दाखवेन”

  11. त्यांनी जेव्हा सातवा शिक्का उघडला, तेव्हा स्वर्गामध्ये अंदाजे अर्धातास सर्वत्र संपूर्ण शांतता पसरली.

  12. नंतर मी पाहिले जे सात देवदूत परमेश्वरासमोर उभे राहिले, त्यांना सात कर्णे देण्यात आले.

  13. नंतर दुसरा एक देवदूत, सोन्याची एक धूपदाणी घेऊन आला व वेदीजवळ उभा राहिला. त्याला राजासनासमोरील सोन्याच्या वेदीवर अर्पण करण्यासाठी परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांच्या प्रार्थना मिश्रित बराच धूप देण्यात आला होता.

  14. त्या देवदूताच्या हातातून प्रार्थना मिश्रित धूपाचा सुगंध परमेश्वरासमोर वर चढला.

  15. तेव्हा त्या देवदूताने वेदीवरील अग्नी धूपदाणीत भरून घेतला आणि त्याने खाली पृथ्वीवर टाकला. त्याबरोबर मोठा गडगडाट व गर्जना झाल्या, विजा चमकल्या आणि प्रचंड भूमिकंप झाला.

  16. नंतर ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते, त्यांनी आपआपले कर्णे वाजविण्याची तयारी केली.

  17. पहिल्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा पृथ्वीवर रक्तमिश्रित गारा व अग्नीचा वर्षाव झाला. पृथ्वीच्या एकतृतीयांश भागाला आग लागली आणि त्यामुळे एकतृतीयांश वृक्ष व सर्व हिरवे गवत जळून गेले.

  18. नंतर दुसर्‍या देवदूताने आपला कर्णा वाजविला. तेव्हा एका मोठ्या जळत्या पर्वतासारखे काहीतरी समुद्रात टाकण्यात आले. त्यामुळे समुद्राचा तिसरा हिस्सा रक्तमय झाला. समुद्रातील एकतृतीयांश जिवंत प्राणी मरण पावले आणि एकतृतीयांश जहाजे नष्ट झाली.

  19. And the third part of the creatures which were in the sea, and had life, died; and the third part of the ships were destroyed.

  20. मग तिसर्‍या देवदूताने आपला कर्णा वाजविला. तेव्हा आकाशातून एक मोठा जळता तारा पृथ्वीवरील एकतृतीयांश नद्या व झरे यावर पडला.

  21. त्या तार्‍याचे नाव कडूदवणा असे आहे. त्यामुळे पृथ्वीवरील एकतृतीयांश पाणी कडू विषारी बनले व अनेक लोक मरण पावले.

  22. चौथ्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा सूर्याचा तिसरा हिस्सा, चंद्र व तारे यांचाही तिसरा हिस्सा काळा झाला. त्यामुळे दिवसाचा एकतृतीयांश भाग प्रकाशाविना आणि रात्रीचा एकतृतीयांश भाग अंधार झाला.

  23. मी हे पाहत असतानाच, आकाशातून एक गरुड पक्षी उडतांना मला दिसला. तो मोठ्याने म्हणत होता, “धिक्कार! धिक्कार! पृथ्वीवरील लोकांना धिक्कार! कारण लवकरच उरलेले तीन देवदूत आपआपले कर्णे वाजवितील.”

  24. मग पाचव्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा जो तारा आकाशातून पृथ्वीवर पडला होता आणि ज्या तार्‍याला अथांग कूपाची किल्ली देण्यात आली होती, त्याला मी पाहिले.

  25. तेव्हा त्याने अथांग कूप उघडले आणि प्रचंड भट्टीच्या धुरासारखा धूर त्यातून वर आला. त्या अगाध कूपाच्या धुरामुळे सूर्य व आकाश अंधकारमय झाले.