- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 95
The Revelation
John's vision on Patmos unveils the cosmic victory of the Lamb over evil and the final restoration of all creation.
या कालखंडातील वचने
- प्रकटीकरण २:६सुमारे इ.स. ९६
पण एक गोष्ट तुमच्यात अनुकूल आहे: माझ्याप्रमाणेच तुम्हीदेखील निकलाइतांच्या कृत्त्यांचा द्वेष करता.
- प्रकटीकरण २:७सुमारे इ.स. ९६
ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐको. जो विजय मिळवितो, त्याला मी परमेश्वराच्या स्वर्गलोकात असलेल्या जीवनाच्या वृक्षाचे फळ खाण्याचा अधिकार देईन.
- प्रकटीकरण २:८सुमारे इ.स. ९६
“स्मुर्णा येथील मंडळीच्या देवदूताला लिही: जे पहिले व शेवटचे, जे मरण पावले होते व जिवंत झाले, ते असे म्हणतात.
- प्रकटीकरण २:९सुमारे इ.स. ९६
मला तुमचे दुःख आणि दारिद्र्य ठाऊक आहे, तरीपण तुम्ही धनवान आहात! आणि जे म्हणतात आम्ही यहूदी आहोत, पण ते नाहीत तर सैतानाचे सभास्थान आहेत, अशा लोकांनी केलेली निंदा मी जाणतो.
- प्रकटीकरण २:१०सुमारे इ.स. ९६
तुम्हाला जे काही सोसावे लागणार आहे त्याची भीती बाळगू नका. तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे आणि दहा दिवस तुम्हाला छळ सहन करावा लागेल. परंतु तुम्ही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मी तुम्हाला विजयाचे मुकुट म्हणून जीवन देईन.
- प्रकटीकरण २:११सुमारे इ.स. ९६
ज्याला ऐकावयास कान आहेत तो आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐको, जो विजय मिळवितो त्याला दुसर्या मरणाची बाधा होणारच नाही.
- प्रकटीकरण २:१२सुमारे इ.स. ९६
“पर्गमम येथील मंडळीच्या देवदूताला लिही: ज्यांच्याजवळ तीक्ष्ण आणि दुधारी तलवार आहे, ते असे म्हणतात:
- प्रकटीकरण २:१३सुमारे इ.स. ९६
तुम्ही कुठे राहता हे मला ठाऊक आहे, जिथे सैतानाचे आसन आहे तिथे. तुम्ही माझे नाव दृढ धरून राहिला आहात. माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा जो तुमच्या शहरामध्ये जिथे सैतान राहतो, तिथे ठार मारला गेला, त्या दिवसातही तुम्ही माझ्यावरील विश्वास नाकारला नाही.
- प्रकटीकरण २:१४सुमारे इ.स. ९६
परंतु, माझ्याजवळ तुमच्याविरुद्ध काही गोष्टी आहेत: त्या या की, बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे काही लोक तुमच्यामध्ये आहेत. त्यांनी बालाकाच्या शिक्षणानुसार इस्राएली लोकांपुढे असे अडखळण केले की, जेणे करून त्यांनी मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खावा व लैंगिक अनीती करावी.
- प्रकटीकरण २:१५सुमारे इ.स. ९६
याचप्रमाणे, निकलाइतांच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तुमच्यातही आहेत.
- प्रकटीकरण २:१६सुमारे इ.स. ९६
यास्तव पश्चात्ताप कर! नाही तर, मी तुमच्याकडे लवकरच येऊन माझ्या तोंडातून निघणार्या तलवारीने त्यांच्याविरुद्ध लढेन.
- प्रकटीकरण २:१७सुमारे इ.स. ९६
ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐको, जो विजय मिळवितो त्याला गुप्त राखलेल्या मान्न्यातून मी देईन आणि ज्यावर नवे नाव लिहिलेले असेल तो पांढरा खडाही मी त्या व्यक्तीला देईन, जे तो खडा घेणार्याशिवाय कोणालाही माहीत नसेल.
- प्रकटीकरण २:१८सुमारे इ.स. ९६
“थुवतीरा येथील मंडळीच्या देवदूताला लिही: ज्याचे नेत्र आगीच्या ज्वालेसारखे भेदक आहेत व ज्याचे पाय चकाकत्या कास्यासारखा आहेत, ते परमेश्वराचे पुत्र असे म्हणतात:
- प्रकटीकरण २:१९सुमारे इ.स. ९६
तुमची सर्व कृत्ये मला ठाऊक आहेत आणि तुमची प्रेमळ वागणूक व विश्वास, तुमची सेवा व धीर ही सर्व मी जाणतो. आणि दिवसेंदिवस या सर्व गुणांमध्ये तुमची होत असलेली प्रगती देखील मला दिसते.
- प्रकटीकरण २:२०सुमारे इ.स. ९६
परंतु, माझ्याजवळ तुमच्याविरुद्ध हे आहे: ईजबेल नावाची जी स्त्री स्वतःला संदेष्टी म्हणविते आणि लैंगिक अनीती करण्यास व मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाण्यास माझ्या सेवकांना तिच्या शिकवणीने भुलविते, तिचे तुम्ही सहन करता.
- प्रकटीकरण २:२१सुमारे इ.स. ९६
मी तिला वेळ दिला, पण आपल्या जारकर्माबद्दल पश्चात्ताप करण्याचे तिने नाकारले.
- प्रकटीकरण २:२२सुमारे इ.स. ९६
पाहा, मी तिला क्लेशमय अंथरुणावर खिळवून टाकीन आणि तिच्याबरोबर व्यभिचार करणार्या लोकांनी तिचा मार्ग सोडून पश्चात्ताप न केल्यास तीव्र क्लेश देईन.
- प्रकटीकरण २:२३सुमारे इ.स. ९६
मी तिच्या लेकरांना ठार मारीन, म्हणजे सर्व मंडळ्यांना कळून येईल की, मी मने व अंतःकरणांची पारख करणारा आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाला मी ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईन.
- प्रकटीकरण २:२४सुमारे इ.स. ९६
थुवतीरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाहीत व सैतानाच्या गहन गोष्टी शिकला नाहीत, मी तुम्हाला सांगतो, की मी तुमच्यावर अधिक ओझे लादणार नाही, फक्त मी येईपर्यंत तुमच्याजवळ जे आहे ते दृढ धरून राहा.
- प्रकटीकरण २:२५सुमारे इ.स. ९६
But that which ye have already hold fast till I come.
- प्रकटीकरण २:२६सुमारे इ.स. ९६
जे विजय मिळवितात व शेवटपर्यंत माझ्या इच्छेप्रमाणे करीत राहतात, त्यांना मी राष्ट्रांवर अधिकार देईन.
- प्रकटीकरण २:२७सुमारे इ.स. ९६
आणि ते त्यांच्यावर लोह-राजदंडाने अधिकार गाजवून मातीच्या पात्राप्रमाणे त्यांच्या ठिकर्या करतील;—
- प्रकटीकरण २:२८सुमारे इ.स. ९६
ज्याप्रमाणे मला माझ्या पित्याकडून अधिकार मिळाला आहे, त्याप्रमाणे मी त्यांना पहाटेचा तारा देखील देईन.
- प्रकटीकरण २:२९सुमारे इ.स. ९६
ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐको.
- प्रकटीकरण ३:१सुमारे इ.स. ९६
“सार्दीस येथील मंडळीच्या देवदूताला लिही: ज्यांच्याजवळ परमेश्वराचे सात आत्मे व सात तारे आहेत, ते असे म्हणतात: तुमची कृत्ये मला ठाऊक आहेत, तुम्ही जिवंत आहात असे तुमच्याविषयी मत आहे, पण तुम्ही मेलेले आहात.