- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 95
The Revelation
John's vision on Patmos unveils the cosmic victory of the Lamb over evil and the final restoration of all creation.
या कालखंडातील वचने
- प्रकटीकरण ४:५सुमारे इ.स. ९६
राजासनापासून विजा चमकत होत्या. आणि मेघगर्जनांचा आवाज ऐकू येत होता. राजासनासमोर परमेश्वराच्या सात आत्म्यांचे प्रतीक असलेले सात दीप तेवत होते.
- प्रकटीकरण ४:६सुमारे इ.स. ९६
त्याचप्रमाणे राजासनापुढे स्फटिकासारखे स्वच्छ आणि काचेच्या समुद्रासारखे दिसणारे असे काहीतरी होते. राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या भोवताली चार जिवंत प्राणी होते; त्यांना पुढे आणि मागे अंगभर डोळे होते.
- प्रकटीकरण ४:७सुमारे इ.स. ९६
या प्राण्यांपैकी पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा बैलासारखा, तिसरा जो होता त्याचा चेहरा मनुष्याच्या मुखासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता.
- प्रकटीकरण ४:८सुमारे इ.स. ९६
त्या चारही सजीव प्राण्यांना प्रत्येकाला सहा पंख होते. त्यांच्या पंखांभोवती आतून बाहेरून सर्वत्र डोळे होते. ते अहोरात्र अखंडपणे बोलत होते:
- प्रकटीकरण ४:९सुमारे इ.स. ९६
जे राजासनावर बसलेले आहेत आणि जे युगानुयुग जिवंत आहेत, त्यांचा त्या सजीव प्राण्यांनी ज्या ज्यावेळी गौरव केला, त्यांना बहुमान दिला आणि त्यांची उपकारस्तुती केली,
- प्रकटीकरण ४:१०सुमारे इ.स. ९६
त्या त्यावेळी त्या चोवीस वडीलजनांनी त्या सर्वकाळ जिवंत असलेल्या परमेश्वरापुढे दंडवत घातले, त्यांची उपासना केली आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेऊन म्हटले:
- प्रकटीकरण ४:११सुमारे इ.स. ९६
“हे आमच्या प्रभू आणि परमेश्वरा, गौरव, आदर, सामर्थ्य स्वीकारण्यास तुम्ही पात्र आहात; कारण तुम्ही सर्व निर्माण केले. तुमच्याच इच्छेने सर्वकाही अस्तित्वात आले.”
- प्रकटीकरण ५:१सुमारे इ.स. ९६
जे राजासनावर बसले होते, त्यांच्या उजव्या हातात पाठपोट लिहिलेली ग्रंथपटाची गुंडाळी मी पाहिली. ती गुंडाळी सात शिक्के मारून बंद केली होती.
- प्रकटीकरण ५:२सुमारे इ.स. ९६
एक बलवान देवदूत मोठ्याने घोषणा करीत होता: “हे शिक्के फोडून, या ग्रंथपटाची गुंडाळी उघडावयास पात्र असा कोणी आहे का?”
- प्रकटीकरण ५:३सुमारे इ.स. ९६
पण स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या खाली, कोणीही ती गुंडाळी उघडण्यास किंवा त्यात लिहिलेले पाहण्यास समर्थ नव्हता.
- प्रकटीकरण ५:४सुमारे इ.स. ९६
तेव्हा मी फार रडलो. कारण ती गुंडाळी उघडावयास किंवा त्यात पाहावयास योग्य असा कोणीही सापडला नाही.
- प्रकटीकरण ५:५सुमारे इ.स. ९६
पण त्या चोवीस वडिलांपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस! कारण पाहा, यहूदाह वंशाचा सिंह, दावीदाचा मूळ विजयी झाला आहे. सातही शिक्के फोडून ती गुंडाळी उघडण्यास तो समर्थ आहे.”
- प्रकटीकरण ५:६सुमारे इ.स. ९६
मग मी पाहिले, ते राजासन, ते चोवीस वडीलजन व ते चार सजीव प्राणी यांच्या मध्यभागी वध झाल्यासारखा कोकरा उभा असलेला मला दिसला. कोकर्याला सात शिंगे, सात डोळे, असून, ते जगाच्या प्रत्येक भागात पाठविलेले परमेश्वराचे सात आत्मे आहेत.
- प्रकटीकरण ५:७सुमारे इ.स. ९६
कोकरा पुढे आला, आणि जे राजासनावर बसले होते, त्यांच्या उजव्या हातातून त्याने ती गुंडाळी घेतली.
- प्रकटीकरण ५:८सुमारे इ.स. ९६
कोकर्याने ती गुंडाळी घेतली, तेव्हा त्या चार सजीव प्राणी व चोवीस वडीलजनांनी कोकर्याच्या पुढे दंडवत केले. त्या प्रत्येकाजवळ एकएक वीणा आणि धूपद्रव्याने भरलेले सोन्याचे धूपपात्र होते. यातील धूप म्हणजे पवित्रजनांच्या प्रार्थना आहेत.
- प्रकटीकरण ५:९सुमारे इ.स. ९६
ते नवे गीत गाऊ लागले. गीताचे शब्द असे: “ती गुंडाळी घ्यावयास व त्याचे शिक्के फोडून तो उघडण्यास तुम्ही पात्र आहात, कारण तुमचा वध करण्यात आला होता आणि तुम्ही आपल्या रक्ताने परमेश्वरासाठी प्रत्येक वंश, भाषा, लोक व राष्ट्रे विकत घेतले आहे,
- प्रकटीकरण ५:१०सुमारे इ.स. ९६
तुम्ही त्या सर्वांना एक राज्य आणि आमच्या परमेश्वराची सेवा करण्यासाठी याजक केले आहे; ते पृथ्वीवर राज्य करतील.”
- प्रकटीकरण ५:११सुमारे इ.स. ९६
तेव्हा मी पाहिले हजारो आणि लाखो नव्हे तर अगणित देवदूतांचे गीत ऐकू आले. ते राजासन, सजीव प्राणी व वडीलजनांच्या सभोवती उभे होते.
- प्रकटीकरण ५:१२सुमारे इ.स. ९६
ते मोठ्याने म्हणत होत: “ज्यांचा वध करण्यात आला होता, तो कोकरा सामर्थ्य, संपत्ती, सुज्ञता, बल, सन्मान, गौरव आणि उपकारस्तुती स्वीकारण्यास पात्र आहे!”
- प्रकटीकरण ५:१३सुमारे इ.स. ९६
मग स्वर्गातील, पृथ्वीवरील, पृथ्वीच्या खालील व समुद्रातील प्राण्यांना गाताना मी ऐकले. ते गात होते: “जे राजासनावर बसले आहेत, त्यांना व कोकर्याला उपकारस्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य
- प्रकटीकरण ५:१४सुमारे इ.स. ९६
तेव्हा ते चार सजीव प्राणी म्हणाले, “आमेन,” आणि त्या चोवीस वडीलजनांनी साष्टांग नमस्कार घालून आराधना केली.
- प्रकटीकरण ६:१सुमारे इ.स. ९६
कोकर्याने त्या सात शिक्यातील पहिला शिक्का फोडून उघडताना मी पाहिले. तेव्हा त्या चार सजीव प्राण्यांतील एकाने, गर्जनेसारख्या आवाजात म्हटले, “ये!”
- प्रकटीकरण ६:२सुमारे इ.स. ९६
मी पहिले तो माझ्यासमोर एक पांढरा घोडा आहे असे मला दिसले! घोडेस्वाराजवळ एक धनुष्य होते. त्याच्या डोक्यावर एक मुकुट ठेवण्यात आला. मग विजेता म्हणून जिंकण्याच्या उद्देशाने तो स्वार निघून गेला.
- प्रकटीकरण ६:३सुमारे इ.स. ९६
नंतर कोकर्याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसर्या सजीव प्राण्याने, “ये” अशी हाक मारली, ती मी ऐकली.
- प्रकटीकरण ६:४सुमारे इ.स. ९६
यावेळी एक अग्निवर्ण घोडा बाहेर पडला. पृथ्वीवरील शांतता नष्ट करण्याचा अधिकार त्याला देण्यात आला होता. लोक एकमेकांचा वध करू लागले. त्या स्वाराला एक मोठी तलवार देण्यात आली.