मुख्य मजकुरावर जा

circa AD 95

The Revelation

John's vision on Patmos unveils the cosmic victory of the Lamb over evil and the final restoration of all creation.

404 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. प्रकटीकरण ७:१३सुमारे इ.स. ९६

    मग या चोवीस वडीलजनांपैकी एकाने मला विचारले, “हे शुभ्र पोशाख घातलेले कोण आहेत व ते कुठून आले आहेत?”

  2. प्रकटीकरण ७:१४सुमारे इ.स. ९६

    मी म्हटले, “महाराज, ते तुम्हाला माहीत आहे.” तेव्हा ते म्हणाले, “जे महान संकटातून निभावून येतात, ते हे आहेत. त्यांनी आपले झगे कोकर्‍याच्या रक्ताने धुऊन शुभ्र केले आहेत.

  3. प्रकटीकरण ७:१५सुमारे इ.स. ९६

    म्हणूनच, “आज ते येथे परमेश्वराच्या राजासनासमोर, त्यांच्या मंदिरात, त्यांची अहोरात्र सेवा करीत आहेत. जे राजासनावर बसलेले आहेत, ते त्यांच्या सानिध्यात त्यांना आश्रय देतील.

  4. प्रकटीकरण ७:१६सुमारे इ.स. ९६

    त्यांना पुन्हा कधी भूक, किंवा तहान लागणार नाही; त्यांना सूर्याचा ताप, किंवा दाहक उष्णता बाधणार नाही.

  5. प्रकटीकरण ७:१७सुमारे इ.स. ९६

    कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल, ‘ते त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झर्‍याजवळ नेईल,’ ‘आणि परमेश्वर त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रू पुसून टाकतील.’”

  6. प्रकटीकरण ८:१सुमारे इ.स. ९६

    त्यांनी जेव्हा सातवा शिक्का उघडला, तेव्हा स्वर्गामध्ये अंदाजे अर्धातास सर्वत्र संपूर्ण शांतता पसरली.

  7. प्रकटीकरण ८:२सुमारे इ.स. ९६

    नंतर मी पाहिले जे सात देवदूत परमेश्वरासमोर उभे राहिले, त्यांना सात कर्णे देण्यात आले.

  8. प्रकटीकरण ८:३सुमारे इ.स. ९६

    नंतर दुसरा एक देवदूत, सोन्याची एक धूपदाणी घेऊन आला व वेदीजवळ उभा राहिला. त्याला राजासनासमोरील सोन्याच्या वेदीवर अर्पण करण्यासाठी परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांच्या प्रार्थना मिश्रित बराच धूप देण्यात आला होता.

  9. प्रकटीकरण ८:४सुमारे इ.स. ९६

    त्या देवदूताच्या हातातून प्रार्थना मिश्रित धूपाचा सुगंध परमेश्वरासमोर वर चढला.

  10. प्रकटीकरण ८:५सुमारे इ.स. ९६

    तेव्हा त्या देवदूताने वेदीवरील अग्नी धूपदाणीत भरून घेतला आणि त्याने खाली पृथ्वीवर टाकला. त्याबरोबर मोठा गडगडाट व गर्जना झाल्या, विजा चमकल्या आणि प्रचंड भूमिकंप झाला.

  11. प्रकटीकरण ८:६सुमारे इ.स. ९६

    नंतर ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते, त्यांनी आपआपले कर्णे वाजविण्याची तयारी केली.

  12. प्रकटीकरण ८:७सुमारे इ.स. ९६

    पहिल्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा पृथ्वीवर रक्तमिश्रित गारा व अग्नीचा वर्षाव झाला. पृथ्वीच्या एकतृतीयांश भागाला आग लागली आणि त्यामुळे एकतृतीयांश वृक्ष व सर्व हिरवे गवत जळून गेले.

  13. प्रकटीकरण ८:८सुमारे इ.स. ९६

    नंतर दुसर्‍या देवदूताने आपला कर्णा वाजविला. तेव्हा एका मोठ्या जळत्या पर्वतासारखे काहीतरी समुद्रात टाकण्यात आले. त्यामुळे समुद्राचा तिसरा हिस्सा रक्तमय झाला. समुद्रातील एकतृतीयांश जिवंत प्राणी मरण पावले आणि एकतृतीयांश जहाजे नष्ट झाली.

  14. प्रकटीकरण ८:९सुमारे इ.स. ९६

    And the third part of the creatures which were in the sea, and had life, died; and the third part of the ships were destroyed.

  15. प्रकटीकरण ८:१०सुमारे इ.स. ९६

    मग तिसर्‍या देवदूताने आपला कर्णा वाजविला. तेव्हा आकाशातून एक मोठा जळता तारा पृथ्वीवरील एकतृतीयांश नद्या व झरे यावर पडला.

  16. प्रकटीकरण ८:११सुमारे इ.स. ९६

    त्या तार्‍याचे नाव कडूदवणा असे आहे. त्यामुळे पृथ्वीवरील एकतृतीयांश पाणी कडू विषारी बनले व अनेक लोक मरण पावले.

  17. प्रकटीकरण ८:१२सुमारे इ.स. ९६

    चौथ्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा सूर्याचा तिसरा हिस्सा, चंद्र व तारे यांचाही तिसरा हिस्सा काळा झाला. त्यामुळे दिवसाचा एकतृतीयांश भाग प्रकाशाविना आणि रात्रीचा एकतृतीयांश भाग अंधार झाला.

  18. प्रकटीकरण ८:१३सुमारे इ.स. ९६

    मी हे पाहत असतानाच, आकाशातून एक गरुड पक्षी उडतांना मला दिसला. तो मोठ्याने म्हणत होता, “धिक्कार! धिक्कार! पृथ्वीवरील लोकांना धिक्कार! कारण लवकरच उरलेले तीन देवदूत आपआपले कर्णे वाजवितील.”

  19. प्रकटीकरण ९:१सुमारे इ.स. ९६

    मग पाचव्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा जो तारा आकाशातून पृथ्वीवर पडला होता आणि ज्या तार्‍याला अथांग कूपाची किल्ली देण्यात आली होती, त्याला मी पाहिले.

  20. प्रकटीकरण ९:२सुमारे इ.स. ९६

    तेव्हा त्याने अथांग कूप उघडले आणि प्रचंड भट्टीच्या धुरासारखा धूर त्यातून वर आला. त्या अगाध कूपाच्या धुरामुळे सूर्य व आकाश अंधकारमय झाले.

  21. प्रकटीकरण ९:३सुमारे इ.स. ९६

    मग त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्यांना पृथ्वीवर असणार्‍या विंचवाप्रमाणे सामर्थ्य देण्यात आले होते.

  22. प्रकटीकरण ९:४सुमारे इ.स. ९६

    पृथ्वीवरील गवत, वनस्पती किंवा झाडेझुडूपे, यांना उपद्रव न करता ज्या लोकांच्या कपाळावर परमेश्वराचा शिक्का नाही, त्यांच्यावर हल्ला करण्यास सांगण्यात आले होते.

  23. प्रकटीकरण ९:५सुमारे इ.स. ९६

    त्यांना ठार मारण्याचा अधिकार त्यांच्याकडे नव्हता, तर फक्त पाच महिने पीडा देण्याचे काम सोपविले होते. विंचू मनुष्याला नांगी मारतो, तेव्हा त्याला होणार्‍या पीडेसारखी ती होती.

  24. प्रकटीकरण ९:६सुमारे इ.स. ९६

    त्या दिवसात लोक मरणाची वाट पाहतील पण त्यांना मृत्यू येणार नाही; मृत्यू यावा म्हणून ते उत्कंठित होतील, मृत्यू त्याच्यापासून दूर पळेल.

  25. प्रकटीकरण ९:७सुमारे इ.स. ९६

    पृथ्वीवर आलेले टोळ युद्धासाठी सज्ज केलेल्या घोड्यांसारखे दिसत होते. त्यांचे चेहरे मनुष्यांसारखे असून त्यांच्या डोक्यांवर सोन्याचा मुकुटांसारखे दिसणारे काहीतरी होते.