मुख्य मजकुरावर जा

circa AD 95

The Revelation

John's vision on Patmos unveils the cosmic victory of the Lamb over evil and the final restoration of all creation.

404 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. प्रकटीकरण ३:२सुमारे इ.स. ९६

    जागृत व्हा! जे उरलेले आहेत व मरणाच्या पंथास लागले आहे त्यांना बळकट करा, कारण तुमची कृत्ये माझ्या परमेश्वराच्या दृष्टीने मला परिपूर्ण अशी आढळली नाहीत.

  2. प्रकटीकरण ३:३सुमारे इ.स. ९६

    जे तुम्ही प्रथम ऐकले व स्वीकारले, त्याची आठवण करा आणि त्यावर दृढविश्वास ठेऊन पश्चात्ताप करा. कारण तुम्ही जागृत झाला नाही, तर जसा चोर येतो तसा मी येईन आणि मी कोणत्या घटकेस तुमच्याकडे येईन हे तुम्हाला मुळीच समजणार नाही.

  3. प्रकटीकरण ३:४सुमारे इ.स. ९६

    मात्र ज्यांनी आपली वस्त्रे विटाळली नाहीत, असे थोडे लोक सार्दीस येथे तुमच्यामध्ये आहेत. ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्याबरोबर फिरतील कारण ते त्यास पात्र आहेत.

  4. प्रकटीकरण ३:५सुमारे इ.स. ९६

    जो विजय मिळवितो तो त्यांच्यासारखा शुभ्र वस्त्रे परिधान करेल. मी त्या व्यक्तीचे नाव जीवनाच्या पुस्तकातून कधीच खोडणार नाही. तर माझ्या पित्यासमोर व त्यांच्या देवदूतांसमोर मी त्याच्या नावाचा जाहीरपणे स्वीकार करेन.

  5. प्रकटीकरण ३:६सुमारे इ.स. ९६

    ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐको.

  6. प्रकटीकरण ३:७सुमारे इ.स. ९६

    “फिलदेल्फिया येथील मंडळीच्या देवदूताला लिही: जे पवित्र व सत्य आहे, ज्यांच्याजवळ दावीदाची किल्ली आहे, ते जे उघडतात, ते कोणालाही बंद करता येत नाही आणि ते जे बंद करतात, ते कोणाला उघडता येत नाही, ते असे म्हणतात.

  7. प्रकटीकरण ३:८सुमारे इ.स. ९६

    तुमची कृत्ये मला ठाऊक आहेत. पाहा, मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. मला माहीत आहे की तुमची शक्ती कमी आहे, तरी तुम्ही माझे वचन पाळले व माझे नाव नाकारले नाही.

  8. प्रकटीकरण ३:९सुमारे इ.स. ९६

    जे सैतानाच्या सभास्थानातील असून स्वतःला यहूदी म्हणतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात. त्यांना मी तुमच्या स्वाधीन करेन. पाहा, ते तुमच्या पाया पडतील व मी तुमच्यावर प्रीती केली आहे हे ते स्वीकारतील.

  9. प्रकटीकरण ३:१०सुमारे इ.स. ९६

    धीर धरण्याविषयीच्या माझ्या आज्ञा तुम्ही पाळल्या आहेत, म्हणून पृथ्वीवर राहणार्‍या लोकांची परीक्षा होण्याचा जो प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तुम्हाला राखीन.

  10. प्रकटीकरण ३:११सुमारे इ.स. ९६

    मी लवकर येत आहे. तुमचा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुमच्याजवळ आहे, ते दृढ धरून ठेवा.

  11. प्रकटीकरण ३:१२सुमारे इ.स. ९६

    जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या परमेश्वराच्या मंदिरातील स्तंभ करेन. ते तिथून कधीही बाहेर जाणार नाहीत. माझ्या परमेश्वराचे नाव, स्वर्गातून माझ्या परमेश्वरापासून उतरणारे नवे यरुशलेम, म्हणजे माझ्या परमेश्वराची नगरी, हिचे नाव आणि माझे नवे नाव मी त्याच्यावर लिहेन.

  12. प्रकटीकरण ३:१३सुमारे इ.स. ९६

    ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ऐको.

  13. प्रकटीकरण ३:१४सुमारे इ.स. ९६

    “लावदिकीया येथील मंडळीच्या देवदूताला लिही: जे आमेन आहेत, विश्वासू व खरे साक्षी आणि परमेश्वराच्या सृष्टीचे शासक आहेत, ते असे म्हणतात.

  14. प्रकटीकरण ३:१५सुमारे इ.स. ९६

    तुमची कृत्ये मला ठाऊक आहेत. तुम्ही थंड नाही व उष्ण नाही. तुम्ही थंड किंवा उष्ण असता तर बरे झाले असते!

  15. प्रकटीकरण ३:१६सुमारे इ.स. ९६

    पण तुम्ही कोमट आहात, म्हणजे उष्ण नाही आणि थंडही नाही; म्हणून मी तुम्हाला माझ्या मुखातून बाहेर ओकून टाकीन.

  16. प्रकटीकरण ३:१७सुमारे इ.स. ९६

    तुम्ही म्हणता, ‘मी श्रीमंत आहे; हवे ते धन मिळविले आहे; मला कशाचीही उणीव नाही’ पण तुम्ही कष्टी, दीन, दरिद्री, आंधळे व नग्न आहात, हे तुम्हाला समजत नाही.

  17. प्रकटीकरण ३:१८सुमारे इ.स. ९६

    म्हणून तुम्हाला माझा असा सल्ला आहे की श्रीमंत होण्यासाठी तुम्ही माझ्याकडून अग्नीत शुद्ध केलेले सोने विकत घ्यावे. तुमची लज्जास्पद नग्नता झाकण्यात यावी म्हणून तुम्ही माझ्याकडून स्वच्छ, शुद्ध, शुभ्र वस्त्रे विकत घ्यावी. तुम्हाला दृष्टीलाभ व्हावा म्हणून तुम्ही माझ्याकडून अंजन विकत घ्यावे.

  18. प्रकटीकरण ३:१९सुमारे इ.स. ९६

    ज्यांच्यावर मी प्रीती करतो, त्यांना मी दटावतो व शिक्षा देऊन शिस्त लावतो. म्हणून आस्थावान होऊन पश्चात्ताप करावा.

  19. प्रकटीकरण ३:२०सुमारे इ.स. ९६

    पाहा! मी दाराशी उभा राहून, दार ठोठावीत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल, तर मी आत येईन; मी त्याच्याबरोबर भोजन करेन आणि तो माझ्याबरोबर भोजन करेल.

  20. प्रकटीकरण ३:२१सुमारे इ.स. ९६

    जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या राजासनावर बसण्याचा अधिकार देईन, जसा मी विजय मिळवून माझ्या पित्याबरोबर त्यांच्या राजासनावर बसलो.

  21. प्रकटीकरण ३:२२सुमारे इ.स. ९६

    ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ऐको.”

  22. प्रकटीकरण ४:१सुमारे इ.स. ९६

    यानंतर मी पाहिले, आणि माझ्यापुढे स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती व जी रणशिंग ध्वनीसारखी होती, ती म्हणाली, “इकडे वर ये, म्हणजे ज्यागोष्टी यानंतर घडणार आहेत त्या मी तुला दाखवेन”

  23. प्रकटीकरण ४:२सुमारे इ.स. ९६

    मी लगेच आत्म्यात संचारलो, आणि माझ्यापुढे स्वर्गात एक राजासन ठेवलेले होते व त्यावर एकजण बसला होता.

  24. प्रकटीकरण ४:३सुमारे इ.स. ९६

    आणि जो तिथे बसला होता तो हिर्‍यासारखा व माणकाच्या रत्नासारखा दिसत होता; त्या राजासनाच्या सभोवताली एक पाचूसारखे दिसणारे मेघधनुष्य होते;

  25. प्रकटीकरण ४:४सुमारे इ.स. ९६

    राजासनाभोवती चोवीस सिंहासने होती आणि त्यावर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले चोवीस वडीलजन बसलेले होते.