मुख्य मजकुरावर जा

Reuben

70 वचने · 18 कुटुंब सदस्य

Reuben चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा ते गिलआद येथे रऊबेन, गाद, आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडे गेले; आणि त्यांना म्हणाले:

  2. तेव्हा रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी इस्राएलच्या कुटुंबप्रमुखांना उत्तर दिले:

  3. आमच्या आणि तुमच्यामध्ये याहवेहने यार्देन नदीची सीमा ठेवली आहे. तुम्ही रऊबेनी आणि गाद लोकांनो! याहवेहमध्ये तुम्हाला वाटा नाही.’ तेव्हा तुमचे वंशज आमच्या वंशजांना याहवेहचे भय बाळगण्यास थांबवतील.

  4. जेव्हा फिनहास याजक आणि समाजाचे पुढारी; इस्राएलच्या कुळांच्या कुटुंबप्रमुखांनी रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांना जे म्हणायचे होते ते ऐकले, तेव्हा त्यांचे समाधान झाले.

  5. मग एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासने रऊबेन, गाद आणि मनश्शेहला उत्तर दिले, “आज आमची खात्री झाली आहे की, याहवेह आमच्याबरोबर आहेत, कारण तुम्ही वेदी बांधण्याबाबतीत याहवेहशी अविश्वासू राहिला नाहीत. तुम्ही इस्राएली लोकांना याहवेहच्या हातातून वाचविले आहे.”

  6. मग एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहास आणि पुढार्‍यांचे रऊबेनी व गाद लोकांशी गिलआद येथे बोलणे झाल्यावर ते कनानाकडे परतले व इस्राएली लोकांना वृत्तांत सांगितला.

  7. तेव्हा वृत्तांत ऐकून इस्राएली लोक आनंदित झाले व परमेश्वराची स्तुती केली आणि रऊबेनी व गाद लोकांशी लढण्याची किंवा ते राहतात त्या देशाचा नाश करण्याविषयी ते पुन्हा बोलले नाही.

  8. रऊबेन आणि गाद वंशांच्या लोकांनी याहवेह हेच परमेश्वर आहे याची साक्ष म्हणून त्या वेदीला एद म्हणजे साक्ष असे नाव ठेवले.

  9. इस्साखारचे राजपुत्र दबोरा सोबत होते; होय, इस्साखार बाराक सोबत, रऊबेनच्या जिल्ह्यांमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली खोर्‍यामध्ये पाठविले अंतःकरणाचा बारकाईने शोध घेतला गेला.

  10. मेंढ्यांच्या कळपांची शिट्टी ऐकण्यासाठी तू मेंढवाड्यात का राहिलास? रऊबेनच्या जिल्ह्यांमध्ये अंतःकरणाचा बारकाईने शोध घेतला गेला.

  11. इस्राएलचे पुत्र: रऊबेन, शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार व जबुलून,

  12. रऊबेन हा ज्येष्ठपुत्र होता खरा, पण त्याने आपल्या पित्याचा पलंग भ्रष्ट केला म्हणून त्याचा ज्येष्ठत्वाचा हक्क इस्राएलपुत्र योसेफच्या संततीस देण्यात आला, म्हणून वंशावळीत रऊबेनचे नाव ज्येष्ठत्वाच्या हक्काप्रमाणे नमूद करण्यात आले नाही.

  13. इस्राएलचा ज्येष्ठपुत्र रऊबेनचे पुत्र: हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी.

  14. रऊबेनी, गादी व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रात 44,760 पुरुष योद्धे होते—ढालधारी, तलवारबहादूर, धनुर्धारी व युध्दकलानिपुण असे.

  15. मरारी वंशजास चिठ्ठ्या टाकून त्यांच्या पितृकुळाप्रमाणे रऊबेन, गाद व जबुलून या गोत्रांच्या प्रदेशातून बारा नगरे दिली.

  16. यार्देनेपलीकडे यरीहोजवळ, यार्देनेच्या पूर्वथडीस रऊबेन गोत्रातून रानातले बेसेर व त्याचे शिवार, याहसाह व त्याचे शिवार,

  17. एफ्राईमच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत रऊबेनचा एक भाग असेल.

  18. रऊबेनच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत यहूदाहचा एक भाग असेल.

  19. शहराची द्वारे इस्राएल गोत्रांच्या नावानुसार असतील. उत्तरेकडील तीन द्वारे असतीलः रऊबेनचे द्वार, यहूदाहचे द्वार आणि लेवीचे द्वार असणार.

  20. यहूदाह वंशातून 12,000; रऊबेन वंशातून 12,000; गाद वंशातून 12,000;