- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1900–1700 BC
Jacob, Joseph & Egypt
Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.
या कालखंडातील वचने
- उत्पत्ती २६:२६सुमारे इ.स.पू. १८०४
एके दिवशी त्याला भेटण्यासाठी गरारहून अबीमेलेख, त्याचा सल्लागार अहुज्जाथ आणि त्याचा सेनापती पीकोल हे आले.
- उत्पत्ती २६:२७सुमारे इ.स.पू. १८०४
“तुम्ही येथे का आला?” इसहाकाने त्यांना विचारले, “कारण तुम्ही मला द्वेषाने वागवून हाकलून दिले होते.”
- उत्पत्ती २६:२८सुमारे इ.स.पू. १८०४
यावर ते म्हणाले, “आम्हाला हे स्पष्टपणे दिसत आहे की, याहवेह तुला आशीर्वादित करीत आहेत; तुझ्याशी—तुझ्या आणि आमच्यामध्ये एक करार करावा असे आम्हाला वाटले. म्हणून आम्हाला तुमच्याबरोबर करार करू द्यावा.
- उत्पत्ती २६:२९सुमारे इ.स.पू. १८०४
आम्ही जसा तुला कसलाही उपद्रव दिला नाही, तसा तू आम्हाला कसलाही उपद्रव देणार नाहीस, असे वचन दे. उलट आम्ही तुझे भलेच केले आणि तुला शांतीने जाऊ दिले; आणि आता तू याहवेहद्वारे आशीर्वादित झाला आहे.”
- उत्पत्ती २६:३०सुमारे इ.स.पू. १८०४
इसहाकाने त्यांच्यासाठी एक मोठी मेजवानी दिली आणि त्यांनी खाणेपिणे केले.
- उत्पत्ती २६:३१सुमारे इ.स.पू. १८०४
पहाटेस उठल्याबरोबर त्यांनी एकमेकांशी करार केला. नंतर इसहाकाने त्यांना निरोप दिला व ते शांतीने परतले.
- उत्पत्ती २६:३२सुमारे इ.स.पू. १८०४
त्या दिवशी इसहाकाचे नोकर त्याच्याकडे येऊन त्याला सांगू लागले. “आम्ही खणीत असलेल्या विहिरीला पाणी लागले आहे!”
- उत्पत्ती २६:३३सुमारे इ.स.पू. १८०४
त्याने तिला शिबाह म्हटले, आणि आजपर्यंत या नगराचे नाव बेअर-शेबा असे आहे.
- उत्पत्ती २६:३४सुमारे इ.स.पू. १७९६
एसावाने त्याच्या चाळिसाव्या वर्षी यहूदीथ नावाच्या बवरी हिथीच्या मुलीसोबत आणि एलोन हिथी याची कन्या बासमाथ हिच्याबरोबरही विवाह केला.
- उत्पत्ती २६:३५सुमारे इ.स.पू. १७९६
त्या इसहाक आणि रिबेकाहसाठी दुःखाचे स्रोत होत्या.
- उत्पत्ती २७:१सुमारे इ.स.पू. १७६०
इसहाक वृद्ध झाला, त्याची दृष्टी मंद होऊन त्याला दिसेनासे झाले, तेव्हा एके दिवशी त्याने आपला ज्येष्ठपुत्र एसाव याला हाक मारली व म्हटले, “माझ्या मुला.” “बाबा, काय आज्ञा,” तो उत्तरला.
- उत्पत्ती २७:२सुमारे इ.स.पू. १७६०
तेव्हा इसहाक त्याला म्हणाला, “मी आता वृद्ध झालो आहे, आणि माझ्या मृत्यूचा दिवस मला माहीत नाही.
- उत्पत्ती २७:३सुमारे इ.स.पू. १७६०
तर तुझे शस्त्र घेऊन ये—धनुष्य व बाण घे—आणि खुल्या मैदानात जाऊन एखाद्या वनपशूची शिकार करून आण.
- उत्पत्ती २७:४सुमारे इ.स.पू. १७६०
मग माझ्या आवडीचे रुचकर भोजन तयार कर आणि मला खाण्यासाठी ते इकडे घेऊ ये, म्हणजे मरण्यापूर्वी मी माझा आशीर्वाद तुला देईन.”
- उत्पत्ती २७:५सुमारे इ.स.पू. १७६०
इसहाक आपला पुत्र एसावसोबत बोलत आहे हे रिबेकाह ऐकत होती. एसाव रानात शिकार करून मांस आणण्यास गेला,
- उत्पत्ती २७:६सुमारे इ.स.पू. १७६०
रिबेकाहने आपला पुत्र याकोब याला बोलाविले आणि ती त्याला म्हणाली “हे बघ, तुझे वडील तुझा भाऊ एसावाला म्हणाले,
- उत्पत्ती २७:७सुमारे इ.स.पू. १७६०
एखाद्या वनपशूची शिकार करून आण, मग माझ्या आवडीचे रुचकर भोजन तयार कर, म्हणजे मरण्यापूर्वी याहवेहच्या सानिध्यात जो आशीर्वाद आहे, तो मी तुला देईन, हे सांगताना मी ऐकले.”
- उत्पत्ती २७:८सुमारे इ.स.पू. १७६०
ती म्हणाली, “आता माझ्या मुला, नीट लक्ष देऊन ऐक व मी सांगते तसेच कर:
- उत्पत्ती २७:९सुमारे इ.स.पू. १७६०
बाहेर कळपात जा आणि दोन चांगली करडे घेऊ ये. मी त्या करडांचे तुझ्या वडिलांच्या आवडीप्रमाणे रुचकर भोजन तयार करेन,
- उत्पत्ती २७:१०सुमारे इ.स.पू. १७६०
मग ते तू आपल्या वडिलांकडे घेऊन जा. म्हणजे मृत्यूपूर्वी ते तुला आशीर्वाद देतील.”
- उत्पत्ती २७:११सुमारे इ.स.पू. १७६०
याकोब त्याची आई रिबेकाहला म्हणाला, “पण माझा भाऊ एसाव तर केसाळ आहे आणि माझी कातडी अगदी केसरहित आहे.
- उत्पत्ती २७:१२सुमारे इ.स.पू. १७६०
वडिलांनी मला चाचपून पाहिले तर? त्यांना वाटेल मी त्यांना फसवीत आहे आणि मग आशीर्वादाऐवजी मी स्वतःवर शाप ओढवून घेईन.”
- उत्पत्ती २७:१३सुमारे इ.स.पू. १७६०
तेव्हा रिबेकाह म्हणाली, “माझ्या बाळा, ते शाप माझ्यावर पडोत. मी सांगते त्याप्रमाणे तू कर, बाहेर जा आणि करडे घेऊन ये.”
- उत्पत्ती २७:१४सुमारे इ.स.पू. १७६०
तेव्हा याकोबाने करडे कापून, स्वच्छ करून आपल्या आईकडे आणली, आणि तिने त्याच्या वडिलांना आवडणारे रुचकर भोजन तयार केले.
- उत्पत्ती २७:१५सुमारे इ.स.पू. १७६०
मग रिबेकाहने घरात असलेले एसावाचे उत्तम कपडे घेतले आणि आपला धाकटा मुलगा याकोबाला ते घालण्यास सांगितले.