मुख्य मजकुरावर जा

circa 1900–1700 BC

Jacob, Joseph & Egypt

Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.

840 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती २७:४१सुमारे इ.स.पू. १७६०

    एसाव याकोबाचा त्याच्या पित्याने आशीर्वाद दिल्यामुळे द्वेष करू लागला. तो स्वतःशीच म्हणाला, “माझ्या वडिलांसाठी शोक करण्याचे दिवस जवळ आले आहे; मग मी माझा भाऊ याकोबाचा वध करेन.”

  2. उत्पत्ती २७:४२सुमारे इ.स.पू. १७६०

    परंतु एसावाचा बेत कोणीतरी रिबेकाहच्या कानावर घातला. रिबेकाहने याकोबाला बोलाविले आणि त्याला सांगितले, “एसावाने तुझा जीव घेऊन, सूड घेण्याची धमकी दिली आहे.

  3. उत्पत्ती २७:४३सुमारे इ.स.पू. १७६०

    तर आता माझ्या मुला, मी म्हणते तसे कर आणि माझा भाऊ लाबानकडे हारानला पळून जा.

  4. उत्पत्ती २७:४४सुमारे इ.स.पू. १७६०

    तुझ्या भावाचा राग शमेपर्यंत काही काळ तिथेच राहा.

  5. उत्पत्ती २७:४५सुमारे इ.स.पू. १७६०

    तू जे काही केलेस याचा त्याला विसर पडेपर्यंत तू तिथेच राहा. मग मी तुला बोलाविणे पाठवेन. एकाच दिवशी मी तुम्हा दोघांनाही का मुकावे?”

  6. उत्पत्ती २७:४६सुमारे इ.स.पू. १७६०

    नंतर रिबेकाह इसहाकास म्हणाली, “या हेथी मुलींमुळे माझा जीव मला नकोसा झाला आहे. याकोबानेही त्यांच्यापैकीच एकीशी लग्न केले तर माझ्या जगण्याचा काही उपयोग नसेल.”

  7. उत्पत्ती २८:१सुमारे इ.स.पू. १७६०

    तेव्हा इसहाकाने याकोबाला बोलावून आशीर्वाद दिला आणि नंतर त्याला आज्ञा दिली, “कनानी मुलीशी तू लग्न करू नकोस.

  8. उत्पत्ती २८:२सुमारे इ.स.पू. १७६०

    तू त्वरित पद्दन-अराम येथे तुझा आईचा पिता बेथुएल याच्या घरी जा, आणि तुझ्या आईचा भाऊ लाबान याच्या मुलींपैकी पत्नी कर.

  9. उत्पत्ती २८:३सुमारे इ.स.पू. १७६०

    सर्वसमर्थ परमेश्वर तुला आशीर्वाद देवो. तुला पुष्कळ संतती देवो आणि तुझ्यापासून अनेक वंशाचे एक मोठे राष्ट्र निर्माण करो.

  10. उत्पत्ती २८:४सुमारे इ.स.पू. १७६०

    अब्राहामाला जे आशीर्वाद परमेश्वराने दिले, ते तुझ्या वंशजाला लाभोत, ज्या भूमीवर तू आता परदेशी म्हणून राहत आहेस, ती भूमी तुझ्या मालकीची होवो, कारण परमेश्वराने ती अब्राहामाला दिलेली आहे.”

  11. उत्पत्ती २८:५सुमारे इ.स.पू. १७६०

    अशा रीतीने इसहाकाने याकोबाला पद्दन-अराम येथे अरामी बेथुएलाचा पुत्र आणि याकोब व एसाव यांची आई रिबेकाहचा भाऊ, लाबान याच्याकडे पाठविले.

  12. उत्पत्ती २८:६सुमारे इ.स.पू. १७६०

    एसावाला समजले की इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देऊन पद्दन-अराम येथे पत्नी करण्यासाठी पाठविले आहे, आणि जेव्हा त्याने त्याला आशीर्वाद दिला, तेव्हा त्याला आज्ञा दिली की तू कनानी मुलीशी विवाह करू नको,

  13. उत्पत्ती २८:७सुमारे इ.स.पू. १७६०

    आणि याकोब आपल्या पित्याची व आईची आज्ञा पाळून पद्दन-अराम येथे गेला.

  14. उत्पत्ती २८:८सुमारे इ.स.पू. १७६०

    तेव्हा एसावाला समजले की, त्याचे वडील इसहाकाला कनानी मुली अजिबात आवडत नाहीत.

  15. उत्पत्ती २८:९सुमारे इ.स.पू. १७६०

    म्हणून एसाव अब्राहामाचा पुत्र इश्माएलच्या घरी गेला आणि तिथे त्याने त्याची कन्या, नबायोथाची बहीण माहलथशी विवाह केला आणि माहलथ त्याच्या पूर्वीच्या पत्नींमध्ये सामील झाली.

  16. उत्पत्ती २८:१०सुमारे इ.स.पू. १७६०

    याकोब बेअर-शेबा सोडून हारानास जाण्यास निघाला.

  17. उत्पत्ती २८:११सुमारे इ.स.पू. १७६०

    त्या रात्री सूर्य मावळल्यावर तो मुक्कामास एके ठिकाणी थांबला असताना, त्याने एक धोंडा उशासाठी घेतला आणि तो त्या ठिकाणी झोपी गेला.

  18. उत्पत्ती २८:१२सुमारे इ.स.पू. १७६०

    तेव्हा त्याला एक स्वप्न पडले. त्यात त्याने पृथ्वीवर उभी केलेली व तिचे वरचे टोक स्वर्गाला टेकलेले आहे अशी एक शिडी पाहिली. परमेश्वराचे दूत त्या शिडीवरून वर जाताना व खाली उतरतांना त्याने पाहिले.

  19. उत्पत्ती २८:१३सुमारे इ.स.पू. १७६०

    शिडीच्या वरच्या टोकाला याहवेह उभे राहून त्यास म्हणाले, “मी याहवेह, तुझा पिता अब्राहाम व इसहाक यांचा परमेश्वर आहे. ज्या भूमीवर तू झोपला आहेस ती मी तुला आणि तुझ्या वंशजांना देईन.

  20. उत्पत्ती २८:१४सुमारे इ.स.पू. १७६०

    तुझे गोत्र धुळीच्या कणांइतके वाढतील. ते नेगेव पासून पूर्वेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत विस्तार करतील. तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील.

  21. उत्पत्ती २८:१५सुमारे इ.स.पू. १७६०

    पाहा, मी तुझ्याबरोबर आहे आणि ज्या ठिकाणी तू जाशील, त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करेन आणि याच भूमीवर तुला सुखरुपपणे परत आणेन. तुला दिलेले अभिवचन पूर्ण होईपर्यंत मी तुझ्याबरोबर सतत राहीन.”

  22. उत्पत्ती २८:१६सुमारे इ.स.पू. १७६०

    मग याकोब झोपेतून जागा झाला, त्याने विचार केला, “निश्चितच याहवेहची उपस्थिती या ठिकाणी आहे, पण मला हे माहीत नव्हते.

  23. उत्पत्ती २८:१७सुमारे इ.स.पू. १७६०

    तो भयभीत झाला आणि म्हणाला, हे किती अद्भुत स्थळ आहे! हे परमेश्वराच्या भवनाशिवाय दुसरे काहीही असू शकत नाही; हे स्वर्गाचे द्वार आहे.”

  24. उत्पत्ती २८:१८सुमारे इ.स.पू. १७६०

    दुसर्‍या दिवशी याकोब अगदी पहाटेस उठला आणि जो धोंडा त्याने उशाशी घेतला होता, तो त्याने स्तंभ म्हणून उभा केला आणि त्यावर जैतुनाचे तेल ओतले.

  25. उत्पत्ती २८:१९सुमारे इ.स.पू. १७६०

    त्याने त्या जागेचे नाव बेथेल असे ठेवले, जरी त्या नगराचे नाव लूज असे होते.