मुख्य मजकुरावर जा

circa 1900–1700 BC

Jacob, Joseph & Egypt

Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.

840 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती २८:२०सुमारे इ.स.पू. १७६०

    नंतर याकोबाने नवस केला, “जर परमेश्वर माझ्यासोबत असतील, या प्रवासात माझे रक्षण करतील, मला अन्नपाणी, वस्त्र देतील,

  2. उत्पत्ती २८:२१सुमारे इ.स.पू. १७६०

    व मला आपल्या पित्याच्या घरी सुखरुपपणे परत आणतील, तर याहवेह माझे परमेश्वर होतील

  3. उत्पत्ती २८:२२सुमारे इ.स.पू. १७६०

    आणि हा जो धोंडा मी स्तंभ म्हणून उभा केला आहे ते परमेश्वराचे भवन होईल आणि जे सर्वकाही ते मला देतील, त्यातील प्रत्येकाचा दशांश मी त्यांना अर्पण करेन.”

  4. प्रवास करीत याकोब पूर्वेकडील लोकांच्या प्रदेशात आला.

  5. त्याला समोरच्या मैदानात मेंढरांचे तीन कळप, एका विहिरीजवळ पाणी पिण्यासाठी बसलेले दिसले, परंतु एका मोठ्या दगडाने विहिरीचे तोंड झाकून ठेवलेले होते.

  6. सर्व कळप विहिरीजवळ जमल्यानंतर मेंढपाळ तो दगड लोटत असत आणि सर्व कळपांना पाणी पाजून मग तो दगड विहिरीच्या तोंडावर पुन्हा ठेवीत असत.

  7. याकोब मेंढपाळांकडे गेला, आणि त्याने त्यांना विचारले, “माझ्या भावांनो, तुम्ही कुठून आहात?” ते म्हणाले, “आम्ही हारानाहून आलो आहोत.”

  8. तेव्हा त्याने त्यांना विचारले, “नाहोराचा नातू लाबान याला तुम्ही ओळखता काय?” “हो, आम्ही ओळखतो,” त्यांनी उत्तर दिले.

  9. यावर याकोबाने त्यांना विचारले, “ते बरे आहेत काय?” “तो बरा आहे, ती पाहा, त्याची कन्या राहेल मेंढरांचा कळप घेऊन इकडेच येत आहे.” ते म्हणाले.

  10. याकोबाने म्हटले, “पाहा सूर्य अजून मावळला नाही; कळपांना एकत्र करण्याची अजून वेळ झालेली नाही. त्यांना पाणी पाजून पुन्हा चरावयास घेऊन जा.”

  11. आम्ही तसे करू शकत नाही, त्यांनी उत्तर दिले, “सगळे कळप येथे जमल्यानंतर आम्ही विहिरीवरील दगड बाजूला काढतो आणि कळपांना पाणी पाजतो.”

  12. त्यांचे संभाषण चालू असताना राहेल आपल्या पित्याची मेंढरे घेऊन तिथे आली, कारण ती मेंढपाळ होती.

  13. जेव्हा याकोबाने त्याचा मामा लाबानची मुलगी राहेल आणि लाबानाची मेंढरे पाहिली, तेव्हा त्याने विहिरीच्या तोंडावरील दगड बाजूला केला आणि आपल्या मामाच्या मेंढरांना पाणी पाजले.

  14. नंतर याकोबाने राहेलचे चुंबन घेतले आणि तो मोठ्याने रडू लागला.

  15. याकोबाने राहेलला सांगितले की तो तिच्या पित्याच्या नात्यातील आहे आणि रिबेकाह हिचा मुलगा आहे. तेव्हा राहेल धावतच गेली आणि आपल्या पित्याला ही बातमी सांगितली.

  16. लाबानाला आपल्या बहिणीचा मुलगा याकोबाची बातमी कळताच तो त्याला लगबगीने भेटावयाला आला. त्याने त्याला मिठी मारली आणि त्याचे चुंबन घेतले आणि त्याला आपल्या घरी आणले आणि तिथे याकोबाने त्याला सर्व गोष्टी सांगितल्या.

  17. तेव्हा लाबान त्याला म्हणाला, “तू माझे स्वतःचे मांस व रक्त आहेस.” याकोबाला तिथे राहून सुमारे एक महिना झाल्यानंतर,

  18. लाबान त्याला म्हणाला, “आपण एकमेकांचे नातेवाईक असलो तरी त्यामुळे तू माझ्यासाठी फुकट काम करावे हे योग्य नाही. तू वेतन म्हणून काय घेशील?”

  19. लाबानाला दोन कन्या होत्या. वडील कन्येचे नाव लेआ व धाकटीचे नाव राहेल.

  20. लेआचे डोळे निस्तेज होते पण राहेल बांधेसूद व दिसायला सुंदर होती.

  21. याकोबाचे राहेलवर प्रेम बसले होते, म्हणून तो म्हणाला, “मला तुमची धाकटी मुलगी राहेल पत्नी म्हणून द्याल, तर मी तुमच्यासाठी सात वर्षे काम करेन.”

  22. लाबान म्हणाला, “परकीय मनुष्याला तिला देण्यापेक्षा ती तुला देणेच उत्तम आहे. माझ्यासोबत इथे राहा.”

  23. उत्पत्ती २९:२०सुमारे इ.स.पू. १७५३

    याप्रमाणे याकोबाने राहेलकरिता पुढील सात वर्षे काम केले. परंतु त्याचे तिच्यावर इतके प्रेम होते की, ही वर्षे त्याला काही दिवसांप्रमाणे भासली.

  24. उत्पत्ती २९:२१सुमारे इ.स.पू. १७५३

    तेव्हा याकोब लाबानाला म्हणाला, “माझी पत्नी मला द्या. माझी मुदत संपली आहे, आता मला तिचा स्वीकार करता येईल.”

  25. उत्पत्ती २९:२२सुमारे इ.स.पू. १७५३

    तेव्हा लाबानाने वस्तीतील सर्व लोकांना बोलाविले आणि मेजवानी दिली.