मुख्य मजकुरावर जा

circa 1900–1700 BC

Jacob, Joseph & Egypt

Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.

840 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती २९:२३सुमारे इ.स.पू. १७५३

    परंतु संध्याकाळी लाबानाने आपली कन्या लेआला याकोबाकडे पाठविले आणि याकोबाने तिच्याबरोबर रात्र घालविली.

  2. उत्पत्ती २९:२४सुमारे इ.स.पू. १७५३

    आणि लाबानाने आपली दासी जिल्पा, त्याची कन्या लेआ हिला दासी म्हणून दिली.

  3. उत्पत्ती २९:२५सुमारे इ.स.पू. १७५३

    पण याकोब सकाळी उठून पाहतो, तर ती लेआ होती! याकोब लाबानाला म्हणाला, “हे तुम्ही काय केले? मी राहेलसाठी सात वर्षे काम केले आणि तुम्ही माझी अशी फसवणूक का केली?”

  4. उत्पत्ती २९:२६सुमारे इ.स.पू. १७५३

    लाबानाने उत्तर दिले, “मोठ्या बहिणीचे लग्न झाल्याशिवाय धाकट्या बहिणीचे लग्न करून देण्याची आमच्यात प्रथा नाही.

  5. उत्पत्ती २९:२७सुमारे इ.स.पू. १७५३

    लग्नाचा सप्ताह पूर्ण होऊ दे, मग माझ्यासाठी आणखी सात वर्षे काम करण्याचे तू वचन देत असशील तर राहेलही तुला मिळेल.”

  6. उत्पत्ती २९:२८सुमारे इ.स.पू. १७५३

    याकोबाने त्याप्रमाणे केले. त्याने लेआसोबत संपूर्ण एक आठवडा घालविला, मग लाबानाने त्याला त्याची कन्या राहेल ही पत्नी म्हणून दिली.

  7. उत्पत्ती २९:२९सुमारे इ.स.पू. १७५३

    लाबानाने आपली दासी बिल्हा, त्याची कन्या राहेलला दासी म्हणून दिली.

  8. उत्पत्ती २९:३०सुमारे इ.स.पू. १७५३

    मग याकोबाने राहेलचाही पत्नी म्हणून स्वीकार केला. तो तिच्यावर लेआपेक्षा अधिक प्रेम करी आणि तिच्यासाठी आणखी सात वर्षे तिथे राहून त्याने काम केले.

  9. उत्पत्ती २९:३१सुमारे इ.स.पू. १७५३

    याकोब लेआला कमी प्रीती करीत आहे, म्हणून याहवेहने तिला गर्भधारणा करण्याचे सामर्थ्य दिले, पण राहेल वांझच राहिली.

  10. उत्पत्ती २९:३२सुमारे इ.स.पू. १७५२

    लेआ गर्भवती झाली व तिला एक पुत्र झाला आणि तिने त्याचे नाव रऊबेन असे ठेवले. कारण लेआ म्हणाली, “याहवेहने माझे दुःख पाहिले आहे. आता माझे पती माझ्यावर प्रेम करतील.”

  11. उत्पत्ती २९:३३सुमारे इ.स.पू. १७५१

    लवकरच ती पुन्हा गर्भवती झाली आणि तिला दुसरा पुत्र झाला. तिने त्याचे नाव शिमओन असे ठेवले, कारण ती म्हणाली, “याहवेहने माझे ऐकले आहे, मी नावडती आहे म्हणून त्यांनी मला आणखी एक पुत्र दिला.”

  12. उत्पत्ती २९:३४सुमारे इ.स.पू. १७५०

    मग ती पुन्हा गर्भवती झाली आणि तिला पुत्र झाला; आणि ती म्हणाली, “यावेळी माझे पती माझ्याशी पुन्हा जोडले जातील, कारण मी त्यांना तीन पुत्र दिले.” म्हणून त्याचे नाव लेवी असे ठेवण्यात आले.

  13. उत्पत्ती २९:३५सुमारे इ.स.पू. १७४९

    ती पुन्हा एकदा गर्भवती झाली आणि तिला आणखी एक पुत्र झाला तिने त्याचे नाव यहूदाह असे ठेवले, कारण ती म्हणाली, “आता मी याहवेहची स्तुती करेन.” यानंतर तिला मूल होण्याचे थांबले.

  14. राहेलने पाहिले की याकोबाला तिच्यापासून मूल होत नाही, तेव्हा ती आपल्या बहिणीचा मत्सर करू लागली. “मला मूल द्या, नाहीतर मी मरून जाईन,” ती याकोबास म्हणाली.

  15. त्यामुळे याकोब संतापून राहेलला म्हणाला, “मी काय परमेश्वराच्या ठिकाणी आहे, ज्यांनी तुला मूल होण्यापासून रोखले आहे?”

  16. मग ती म्हणाली, “तुम्ही माझी दासी बिल्हा हिचा स्वीकार करा. जेणेकरून ती माझ्यासाठी मुलांना जन्म देईल आणि मीही तिच्याद्वारे कुटुंब तयार करू शकेन.”

  17. याप्रमाणे तिने आपली दासी बिल्हा, त्याला पत्नी म्हणून दिली, आणि याकोबाने तिचा स्वीकार केला,

  18. आणि बिल्हा गर्भवती झाली व याकोबाच्या पुत्राला जन्म दिला,

  19. उत्पत्ती ३०:६सुमारे इ.स.पू. १७४८

    राहेलने त्याचे नाव दान असे ठेवले, कारण ती म्हणाली, “परमेश्वराने मला न्याय दिला आहे; त्यांनी माझी विनंती मान्य केली आणि मला एक पुत्र दिला आहे.”

  20. उत्पत्ती ३०:७सुमारे इ.स.पू. १७४७

    राहेलची दासी बिल्हा ही पुन्हा गर्भवती झाली आणि तिने याकोबाच्या अजून एका पुत्राला जन्म दिला.

  21. उत्पत्ती ३०:८सुमारे इ.स.पू. १७४७

    राहेलने त्याचे नाव नफताली असे ठेवले. कारण ती म्हणाली, “मी माझ्या बहिणीशी जोरदार संघर्ष करून विजयी झाले आहे.”

  22. उत्पत्ती ३०:९सुमारे इ.स.पू. १७४८

    आपण पुन्हा गर्भवती होत नाही, हे लक्षात घेऊन लेआने आपली दासी जिल्पा याकोबाला पत्नी म्हणून दिली.

  23. उत्पत्ती ३०:१०सुमारे इ.स.पू. १७४८

    याकोबापासून लेआची दासी जिल्पाने एका पुत्राला जन्म दिला.

  24. उत्पत्ती ३०:११सुमारे इ.स.पू. १७४८

    लेआ म्हणाली, “हा किती आशीर्वाद आहे!” म्हणून तिने त्याचे नाव गाद असे ठेवले.

  25. उत्पत्ती ३०:१२सुमारे इ.स.पू. १७४८

    लेआची दासी जिल्पाला याकोबापासून दुसरा पुत्र झाला.