मुख्य मजकुरावर जा

circa 1900–1700 BC

Jacob, Joseph & Egypt

Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.

840 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. उत्पत्ती ३०:१३सुमारे इ.स.पू. १७४७

    लेआने त्याचे नाव आशेर ठेवले. कारण ती म्हणाली. “मी किती आनंदी आहे! स्त्रिया मला धन्य म्हणतील.”

  2. उत्पत्ती ३०:१४सुमारे इ.स.पू. १७४८

    गव्हाच्या हंगामात रऊबेन शेतात काम करताना एके दिवशी त्याला पुत्रदात्रीची फळे सापडली. त्याने ती आपली आई लेआ हिला नेऊन दिली. तेव्हा राहेलने लेआजवळ विनंती केली, “तुझ्या मुलाने पुत्रदात्रीची फळे आणली आहेत, त्यातील काही मला दे.”

  3. उत्पत्ती ३०:१५सुमारे इ.स.पू. १७४८

    पण लेआ तिला म्हणाली, “माझा पती घेतलास तेवढे पुरे झाले नाही काय? आता माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे देखील तू घेशील काय?” राहेल म्हणाली, “ठीक आहे. तुझ्या पुत्रदात्रीच्या फळांच्या मोबदल्यात, याकोब आज रात्री तुझ्याकडे येईल.”

  4. उत्पत्ती ३०:१६सुमारे इ.स.पू. १७४८

    जेव्हा संध्याकाळी याकोब शेतातून आला, लेआ त्याला भेटण्यासाठी बाहेर गेली. ती म्हणाली, “आज तुम्ही माझ्याबरोबर निजावे, कारण माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे देऊन मी तुम्हाला त्या मोबदल्यात घेतले आहे.” त्याप्रमाणे त्या रात्री तो तिच्यासोबत निजला.

  5. उत्पत्ती ३०:१७सुमारे इ.स.पू. १७४७

    परमेश्वराने लेआचे ऐकले आणि ती पुन्हा गर्भवती होऊन तिने याकोबाच्या पाचव्या पुत्राला जन्म दिला.

  6. उत्पत्ती ३०:१८सुमारे इ.स.पू. १७४७

    तिने त्याचे नाव इस्साखार असे ठेवले. कारण लेआ म्हणाली, “माझ्या पतीला मी माझी दासी दिल्यामुळे परमेश्वराने मला हे प्रतिफळ म्हणून दिले आहे.”

  7. उत्पत्ती ३०:१९सुमारे इ.स.पू. १७४७

    नंतर लेआ याकोबापासून पुन्हा गर्भवती झाली आणि तिला सहावा पुत्र झाला.

  8. उत्पत्ती ३०:२०सुमारे इ.स.पू. १७४६

    तिने त्याचे नाव जबुलून असे ठेवले. कारण लेआ म्हणाली, “परमेश्वराने माझ्या पतीसाठी मला चांगल्या देणग्या दिल्या आहेत. कारण मी त्याच्या सहा पुत्रांना जन्म दिला आहे, आता ते मला माझा आदर करतील.”

  9. उत्पत्ती ३०:२१सुमारे इ.स.पू. १७४५

    काही वेळेनंतर तिने एका कन्येला जन्म दिला आणि तिचे नाव दीना असे ठेवले.

  10. उत्पत्ती ३०:२२सुमारे इ.स.पू. १७४५

    तेव्हा परमेश्वराला राहेलची आठवण झाली; त्यांनी तिचे ऐकले आणि तिला गर्भधारण करण्यास सक्षम केले.

  11. उत्पत्ती ३०:२३सुमारे इ.स.पू. १७४५

    ती गर्भवती झाली आणि तिने एका पुत्राला जन्म दिला ती म्हणाली, “परमेश्वराने माझा काळिमा दूर केला आहे.”

  12. उत्पत्ती ३०:२४सुमारे इ.स.पू. १७४५

    तिने त्याचे नाव योसेफ असे ठेवले, आणि म्हणाली, “याहवेहने मला आणखी एक पुत्र द्यावा.”

  13. उत्पत्ती ३०:२५सुमारे इ.स.पू. १७४५

    राहेलने योसेफास जन्म दिल्यानंतर याकोब लाबानास म्हणाला, “माझी रवानगी करा म्हणजे मी माझ्या देशाला जाईन.

  14. उत्पत्ती ३०:२६सुमारे इ.स.पू. १७४५

    माझ्या स्त्रिया व मुले यासह मला जाऊ द्या. त्यांच्यासाठी मी तुमची किती सेवा केली आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे.”

  15. उत्पत्ती ३०:२७सुमारे इ.स.पू. १७४५

    पण लाबान त्याला म्हणाला, “माझ्यावर तुझी कृपादृष्टी असेल तर कृपया थांब. तुझ्यामुळे याहवेहने मला आशीर्वाद दिला आहे हे मला भविष्यकथनाने कळले आहे.

  16. उत्पत्ती ३०:२८सुमारे इ.स.पू. १७४५

    तुला किती वेतन हवे ते मला सांग म्हणजे मी तुला तेवढे देईन.”

  17. उत्पत्ती ३०:२९सुमारे इ.स.पू. १७४५

    याकोब त्याला म्हणाला, “मी तुमची चाकरी कशी केली आणि तुमची गुरे माझ्या देखरेखीखाली कशी राहिली हे तुम्हाला माहीत आहे.

  18. उत्पत्ती ३०:३०सुमारे इ.स.पू. १७४५

    मी येण्यापूर्वी तुमच्याकडे जे होते ते खूप वाढले आहे आणि मी जिथे होतो तिथे याहवेहने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे. पण माझ्या स्वतःच्या कुटुंबीयांकडे मी केव्हा लक्ष देणार?”

  19. उत्पत्ती ३०:३१सुमारे इ.स.पू. १७४५

    “मी तुला काय देऊ?” त्याने विचारले. “मला काहीही देऊ नका,” याकोबने उत्तर दिले. “पण जर तुम्ही माझ्यासाठी हे केले तर मी तुमच्या कळपांचे पालन करेन आणि त्यांचा सांभाळ करेन:

  20. उत्पत्ती ३०:३२सुमारे इ.स.पू. १७४५

    आज मला तुमचे सर्व कळप बघून घेऊ द्या म्हणजे मी त्यातून डाग व ठिपके असलेली मेंढरे व बोकडे आणि गडद रंगाची मेंढरे वेगळी करेन व तेच माझे वेतन होईल.

  21. उत्पत्ती ३०:३३सुमारे इ.स.पू. १७४५

    आणि जेव्हा तुम्ही मला दिलेले वेतन तपासाल तेव्हा भविष्यात माझा प्रामाणिकपणा माझ्यासाठी साक्ष देईल. म्हणजे माझ्या कळपात तुम्हाला एखादा डाग व ठिपके नसलेला बोकड किंवा मेंढा आढळला, तर मी तो तुमच्या कळपातून चोरून घेतला आहे, हे तुम्हाला समजेल.”

  22. उत्पत्ती ३०:३४सुमारे इ.स.पू. १७४५

    लाबान म्हणाला, “ठीक आहे, तू म्हणतोस तसे होऊ दे.”

  23. उत्पत्ती ३०:३५सुमारे इ.स.पू. १७४५

    त्याच दिवशी लाबान आपल्या कळपात गेला आणि त्याने पट्टेदार आणि ठिपके असलेली बोकडे व डाग आणि ठिपके असलेल्या शेळ्या (ज्यांच्यावर पांढरा डाग होता) आणि गडद रंगांची मेंढरे वेगळी करून आपल्या पुत्रांच्या स्वाधीन केली.

  24. उत्पत्ती ३०:३६सुमारे इ.स.पू. १७४५

    नंतर त्याने त्यांच्यामध्ये आणि याकोबामध्ये तीन दिवसांच्या यात्रेचे अंतर ठेवले आणि याकोब लाबानाचे उर्वरित कळप राखू लागला.

  25. उत्पत्ती ३०:३७सुमारे इ.स.पू. १७४५

    मग याकोबाने चिनार, बदाम व अर्मोन वृक्षांच्या कोवळ्या फांद्या घेतल्या व त्यांची पांढरी अंतर्साल दिसेपर्यंत त्या सोलल्या.