- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1900–1700 BC
Jacob, Joseph & Egypt
Jacob wrestles with God and becomes Israel; Joseph is sold into slavery yet rises to save the world from famine.
या कालखंडातील वचने
- उत्पत्ती २७:१६सुमारे इ.स.पू. १७६०
तिने त्याचा हात आणि मानेवरचा गुळगुळीत भाग करडांच्या कातड्याने झाकला.
- उत्पत्ती २७:१७सुमारे इ.स.पू. १७६०
नंतर तिने रुचकर भोजन व भाकर आपला मुलगा याकोबाजवळ दिली.
- उत्पत्ती २७:१८सुमारे इ.स.पू. १७६०
आपल्या वडिलाजवळ जाऊन याकोब म्हणाला, “बाबा.” तो म्हणाला, “काय माझ्या बाळा? तू कोण आहेस?”
- उत्पत्ती २७:१९सुमारे इ.स.पू. १७६०
तेव्हा याकोबाने उत्तर दिले, “मी एसाव, तुमचा ज्येष्ठपुत्र आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केले आहे. कृपया उठून बसा आणि तुमच्यासाठी शिकार करून आणलेले भोजन खा, म्हणजे तुम्ही मला तुमचे आशीर्वाद द्या.”
- उत्पत्ती २७:२०सुमारे इ.स.पू. १७६०
त्यावर इसहाक म्हणाला, “माझ्या मुला, इतक्या लवकर तुला शिकार कशी मिळाली?” तेव्हा तो म्हणाला, “तुमचे परमेश्वर याहवेह यांनी मला यश दिले.”
- उत्पत्ती २७:२१सुमारे इ.स.पू. १७६०
मग इसहाक याकोबास म्हणाला, “माझ्या मुला, जरा माझ्याजवळ ये. तू खरोखरच एसाव आहेस की नाही ते मला चाचपून पाहू दे.”
- उत्पत्ती २७:२२सुमारे इ.स.पू. १७६०
तेव्हा याकोब आपला पिता इसहाकाजवळ गेला व त्यांनी त्याला चाचपून म्हटले, “वाणी तर याकोबाची आहे, पण हात एसावाचे आहेत.”
- उत्पत्ती २७:२३सुमारे इ.स.पू. १७६०
त्याने त्याला ओळखले नाही, कारण त्याचे हात एसावाच्या हातांसारखे केसाळ होते. तो याकोबाला आशीर्वाद देण्यासाठी तयार झाला,
- उत्पत्ती २७:२४सुमारे इ.स.पू. १७६०
त्याने विचारले, “तू खरोखर माझा पुत्र एसावच आहेस काय?” तो म्हणाला “होय, मीच आहे.”
- उत्पत्ती २७:२५सुमारे इ.स.पू. १७६०
मग इसहाक त्यास म्हणाला, “त्या शिकारीचे भोजन इकडे आण. मी ते खाईन आणि माझे आशीर्वाद तुला देईन.” तेव्हा याकोबाने जेवणाचे ताट आणले, तो जेवला आणि मग द्राक्षारस त्याच्याकडे आणले, तेही तो प्याला.
- उत्पत्ती २७:२६सुमारे इ.स.पू. १७६०
मग इसहाक त्याला म्हणाला, “माझ्या मुला इकडे ये आणि माझे चुंबन घे.”
- उत्पत्ती २७:२७सुमारे इ.स.पू. १७६०
तो आपल्या पित्याजवळ गेला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. जेव्हा इसहाकाला त्याच्या वस्त्रांचा वास आला, तेव्हा त्याला आशीर्वाद देत तो म्हणाला, “अहा, माझ्या पुत्राचा सुगंध, जसा याहवेहने आशीर्वादित केलेल्या शेताचा.
- उत्पत्ती २७:२८सुमारे इ.स.पू. १७६०
परमेश्वर तुला आकाशातील दव आणि पृथ्वीची समृद्धी देतील, भरपूर धान्य आणि नवीन द्राक्षारस देतील.
- उत्पत्ती २७:२९सुमारे इ.स.पू. १७६०
राष्ट्रे तुझी सेवा करोत, आणि लोक तुझ्यापुढे नमोत. तू तुझ्या भाऊबंदाचा धनी हो. तुझ्या आईची मुले तुझ्यापुढे लवून तुला मुजरा करोत. जे तुला शाप देतात ते सर्व शापित होवोत, आणि जे तुला आशीर्वाद देतात ते सर्व आशीर्वादित होवोत.”
- उत्पत्ती २७:३०सुमारे इ.स.पू. १७६०
इसहाकाने त्याला आशीर्वाद देण्याचे पूर्ण केले आणि याकोब आपल्या वडिलांच्या उपस्थितीतून पडतो न पडतो तोच एसाव शिकारीहून परतला
- उत्पत्ती २७:३१सुमारे इ.स.पू. १७६०
त्यानेही आपल्या पित्यासाठी रुचकर भोजन तयार केले आणि त्याच्याकडे ते घेऊन आला व म्हणाला, “बाबा, हे पाहा मी शिकार घेऊन आलो आहे. उठून बसा आणि हे खा म्हणजे मला तुम्ही तुमचे आशीर्वाद देऊ शकाल.”
- उत्पत्ती २७:३२सुमारे इ.स.पू. १७६०
हे ऐकून त्याचा पिता इसहाक त्यास म्हणाला, “तू कोण आहेस?” त्याने उत्तर दिले, “मी एसाव तुमचा ज्येष्ठपुत्र आहे.”
- उत्पत्ती २७:३३सुमारे इ.स.पू. १७६०
त्याचवेळी इसहाकाच्या शरीराला भयंकर कंप सुटला आणि तो म्हणाला, “तर मग आताच शिकार घेऊन माझ्याकडे आला होता तो कोण होता? तू येण्यापूर्वी मी तर ते खाल्ले आणि माझे आशीर्वादही त्याला दिले. होय, त्याला ते आशीर्वाद आता मिळणारच.”
- उत्पत्ती २७:३४सुमारे इ.स.पू. १७६०
जेव्हा एसावाने आपल्या पित्याचे हे शब्द ऐकले, तेव्हा तो अतिदुःखाने हंबरडा फोडून आपल्या पित्यास म्हणाला, “बाबा, बाबा, मलाही आशीर्वाद द्या.”
- उत्पत्ती २७:३५सुमारे इ.स.पू. १७६०
परंतु तो म्हणाला, “तुझा भाऊ कपटाने आला होता आणि तुझे आशीर्वाद तो घेऊन गेला.”
- उत्पत्ती २७:३६सुमारे इ.स.पू. १७६०
यावर एसावाने म्हटले, “त्याचे नाव याकोब योग्यच नाही काय? त्याने दुसर्यांदा मला फसविले आहे. त्याने माझा जन्मसिध्द हक्क घेतला आणि आता माझा आशीर्वादही चोरला आहे.” नंतर त्याने विचारले, “माझ्यासाठी तुम्ही एकही आशीर्वाद राखून ठेवला नाही काय?”
- उत्पत्ती २७:३७सुमारे इ.स.पू. १७६०
परंतु इसहाकाने एसावास उत्तर दिले, “मी त्याला तुझा धनी आणि तुझ्या सर्व नातेवाईकांना त्याचे नोकर करून ठेवले आहे. मी त्याला भरपूर धान्य आणि द्राक्षारस यांची हमी दिली आहे. आता देण्याचे काय शिल्लक राहिले आहे, माझ्या मुला?”
- उत्पत्ती २७:३८सुमारे इ.स.पू. १७६०
एसाव आपल्या वडिलांना म्हणाला, “तुमच्याकडे एकच आशीर्वाद आहे काय? अहो बाबा, मलाही आशीर्वाद द्या!” मग एसाव मोठ्याने रडू लागला.
- उत्पत्ती २७:३९सुमारे इ.स.पू. १७६०
त्याचे वडील इसहाक त्याला उत्तर देत म्हणाले, “तुझे वास्तव्य सुपीक प्रदेशापासून दूर आकाशातील दहिवर पडते तिथून दूर असेल.
- उत्पत्ती २७:४०सुमारे इ.स.पू. १७६०
तलवारीच्या जोरावर तू जगशील तू आपल्या भावाची सेवा करशील, परंतु जेव्हा अस्वस्थ होशील, तेव्हा तुझ्यावर असलेले त्याचे जू तू तुझ्यावरून झुगारून देशील.”