Family बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
तेव्हा मानव म्हणाला, “ही माझ्या हाडाचे हाड आणि मांसाचे मांस आहे; हिला नारी असे म्हणतील, कारण ती नरापासून बनविली आहे.”
या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती एकदेह होतील.
मग याहवेहने अब्रामाला दर्शन देऊन म्हटले, “हा देश मी तुझ्या संतानाला देणार आहे.” तेव्हा जे अब्रामाला प्रकट झाले त्या याहवेहसाठी त्याने एक वेदी बांधली.
तिथून तो बेथेलाच्या पूर्वेकडे डोंगराकडे गेला आणि जिथे पश्चिमेकडे बेथेल व पूर्वेकडे आय हे शहर होते, तिथे त्याने आपला तळ दिला. तिथेच त्याने याहवेहसाठी एक वेदी बांधली आणि याहवेहच्या नावाने उपासना केली.
नंतर ते नेगेवहून बेथेलच्या रोखाने उत्तरेकडे गेले. बेथेल व आय यांच्यामध्ये त्यांनी पूर्वी तळ दिला होता
व वेदी बांधली होती, तिथे पोहोचल्यावर अब्रामाने पुन्हा एकदा याहवेहची उपासना केली.
पुत्र जन्मल्यानंतर आठव्या दिवशी त्याची सुंता केली पाहिजे. सुंतेची ही अट तू पैसे देऊन विकत घेतलेल्या परदेशीय गुलामांना आणि तुझ्या घराण्यात जन्मलेल्या प्रत्येकाला, जी तुझी संतती नाही त्यांनाही लागू आहे.
तुझ्या घराण्यात जन्मलेल्या किंवा तू पैसे देऊन विकत घेतलेल्या प्रत्येक पुरुषाची सुंता केली जावो. तुझ्या शरीराशी केलेला हा करार सदासर्वकाळचा आहे.
सुंता न केलेल्या प्रत्येक पुरुषाला त्या समाजातून बेदखल करण्यात येईल कारण त्याने माझा करार मोडला आहे.”
तुम्ही स्वतःबद्दल जागरूक असणे आणि स्वतःची काळजी घेणे खूप आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी विसरून जाऊ नये आणि आयुष्यभर त्या तुमच्या स्मरणातून निघून जाऊ नये. तुम्ही ते तुमच्या पुत्रांना आणि त्यांच्यानंतर त्यांच्या पुत्रांना शिकवा.
ज्या दिवशी तुम्ही होरेब पर्वताजवळ याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर उभे होता, त्या दिवसाविषयी त्यांना सांगा. त्या दिवशी याहवेहनी मला म्हणाले होते, “माझ्यासमोर सर्व लोकांना माझे शब्द ऐकण्यासाठी एकत्र कर, म्हणजे ते पृथ्वीवर जिवंत असेपर्यंत माझा आदर करतील आणि आपल्या मुलाबाळांना माझे शब्द शिकवतील.”
त्या आपल्या मुलांना शिकवा. घरी बसलेले असताना, वाटेवर चालत असताना, झोपण्याच्या वेळी व झोपेतून उठल्यानंतर त्याबद्दल बोलत राहा.
त्या तुमच्या घरातील दाराच्या चौकटीवर व तुमच्या फाटकांवर लिहाव्या,
उलट, तुमच्या सर्व गोत्रांच्या जागेतून याहवेह तुमचे परमेश्वर निवडील व त्या जागेला ते स्वतःचे नाव देतील, त्या ठिकाणी तुम्ही जावे;
तिथेच तुम्ही आपली होमार्पणे, यज्ञार्पणे, तुमचे दशांश व विशेष भेटी, नवस फेडण्यासाठी आणलेली अर्पणे आणि तुमची स्वेच्छार्पणे आणि तुमच्या गुरांची व शेरडामेंढरांची प्रथम वत्सांची अर्पणे आणावीत.
त्या ठिकाणी याहवेह तुमच्या परमेश्वराच्या सान्निध्यात तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने भोजन करावे आणि तुम्ही हातात घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत आनंद कराल, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित केले आहे.
तेव्हाच तुम्ही तुमची सर्व होमार्पणे, यज्ञार्पणे, दशांश, नवसाची अर्पणे व स्वेच्छार्पणे—याहवेह तुमचे परमेश्वर स्वतःच्या नावाचे निवासस्थान म्हणून ज्या ठिकाणाची निवड करतील तिथे आणावीत.
आणि त्या ठिकाणी तुम्ही, तुमचे पुत्र आणि कन्या, तुमचे दास व दासी आणि तुमच्या नगरातील लेवी, ज्यांना स्वतःचा कोणताही वाटा किंवा वतन नाही, या सर्वांसह—याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर आनंदोत्सव करावा.
कैसरीया येथे कर्नेल्य नावाचा एक मनुष्य, जो इटलीच्या पलटणीचा शताधिपती होता.
तो व त्याचे सारे कुटुंब धार्मिक व परमेश्वराला भिऊन वागणारे होते; तो उदारहस्ते गरजवंतांना दानधर्म करीत असे आणि परमेश्वराची नियमितपणे प्रार्थना करीत असे.
एके दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याला एक दृष्टान्त झाला. त्याने स्पष्टपणे असे पाहिले की, परमेश्वराचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “कर्नेल्या!”
कर्नेल्याने त्याच्याकडे टक लावून पाहिले व भयभीत झाला. त्याने विचारले, “काय प्रभूजी?” देवदूत उत्तरला, “तुझ्या प्रार्थना आणि गरिबांसाठी केलेल्या दानधर्माची परमेश्वराला आठवण आहे.
आता योप्पा येथे माणसे पाठवून, शिमोन ज्याला पेत्र म्हणतात त्याला बोलावून घे.
ज्याचे घर समुद्राकाठी आहे, त्या शिमोन चांभाराच्या घरी पाहुणा आहे.”
“त्यांचा पाण्याने बाप्तिस्मा करण्यास निश्चितच कोणीही हरकत घेणार नाही, कारण पवित्र आत्मा जसा आपल्याला मिळाला, तसा त्यांनाही मिळालेला आहे.”