Skip to content

Silas

17 वचने

हे नावानेही ओळखले जाते: Silvanus

Silas चा उल्लेख असलेली वचने

  1. मग प्रेषित आणि वडीलजन व सर्व मंडळीने ठरविले की त्यांची काही निवडलेली माणसे अंत्युखियास पौल व बर्णबा यांच्याबरोबर पाठवावीत. त्यांनी यहूदाह ज्याला बारसब्बास असेही म्हणत असत व सीला यांना निवडले. हे दोघे विश्वासणार्‍यामधील पुढारी होते.

  2. यास्तव यहूदाह व सीला यांना पाठविले असून ते स्वतः आम्ही लिहिलेल्या या गोष्टी तुम्हाला तोंडी सांगतील.

  3. मग यहूदाह आणि सीला, जे स्वतः संदेष्टे होते, त्यांनी विश्वासणार्‍यांना पुष्कळ गोष्टी बोलण्याद्वारे उत्तेजित करून स्थिरावले.

  4. परंतु सीला तिथेच राहिला.

  5. परंतु पौलाने सीलाची निवड केली व त्यासह तो निघाला. विश्वासणार्‍यांनी त्यांना शाबासकी देऊन प्रभूच्या कृपेवर सोपविले.

  6. आपल्याला जे धन मिळत होते ते आता मिळणार नाही असे पाहून तिच्या धन्यांनी, पौल व सीलाला पकडून अधिकार्‍यांना तोंड देण्याकरिता बाजारपेठेत ओढत नेले.

  7. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला प्रार्थना करीत असताना आणि परमेश्वराचे गीत गात असताना इतर कैदी ते ऐकत होते.

  8. तुरुंगाच्या नायकाने दिवे मागविले व तो धावत आला आणि पौल आणि सीला यांच्यापुढे थरथर कापत पालथा पडला.

  9. ऐकणार्‍यांपैकी काही यहूदीयांची खात्री झाली आणि ती माणसे पौल व सीला यांना येऊन मिळाली. यामध्ये परमेश्वराचे भय धरणार्‍या ग्रीक लोकांची संख्या मोठी होती आणि त्यात काही प्रमुख स्त्रियाही समाविष्ट होत्या.

  10. रात्र झाल्याबरोबर विश्वासणार्‍यांनी पौल व सीला यांना बिरुयास पाठविले. तिथे पोहोचल्यावर ते यहूदी सभागृहामध्ये गेले.

  11. विश्वासणार्‍यांनी पौलाला ताबडतोब समुद्रकिनारी पाठविले, परंतु सीला व तीमथ्य हे बिरुया येथे राहिले.

  12. पौलाबरोबर जे गेले होते त्यांनी त्याला ॲथेन्सला पोहोचविले आणि सीला व तीमथ्य यांनी त्वरा करून त्याला येऊन मिळावे अशी आज्ञा त्यांना केली.

  13. जेव्हा मासेदोनियाहून सीला व तीमथ्य आले, तेव्हा येशू हेच ख्रिस्त आहेत असा प्रचार आणि साक्ष केवळ यहूदीयांनाच सांगण्यासाठी पौलाने स्वतःचे समर्पण केले होते.

  14. तीमथ्य, सीला व मी, तुम्हाला परमेश्वराचे पुत्र येशू ख्रिस्त यांच्याबद्दल संदेश सांगत आलो तो “नाही” आणि “होय” असा नाही, परंतु त्यांच्यामध्ये नेहमीच “होय” आहे.

  15. आपले परमेश्वर पिता व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या थेस्सलनीका येथील मंडळीस,

  16. परमेश्वर आपले पिता व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या थेस्सलनीका येथील मंडळीस,

  17. ज्याला मी एकनिष्ठ भाऊ मानतो, त्या सीलासच्या मदतीने मी तुम्हाला थोडक्यात लिहिले आहे, तुम्हाला उत्तेजित करतो आणि अशी साक्ष देतो की, हीच परमेश्वराची खरी कृपा आहे. यामध्येच स्थिर राहा.