Skip to content

Antioch

14 verses

36.2000, 36.1600 गूगल नकाशावर पाहा

Antioch चा उल्लेख असलेली वचने

  1. गटातील सर्वांस हा प्रस्ताव योग्य वाटला. त्यांनी स्तेफनाची निवड केली, जो विश्वासाने आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता; फिलिप्प, प्रखर, नीकानुर, तीमोन, पर्मिना व नीकलाव हा अंत्युखियाचा असून यहूदी मतानुसार त्याचे परिवर्तन झालेले होते

  2. स्तेफनाचा वध झाल्यानंतर छळामुळे जे इतरत्र पांगले होते ते प्रवास करीत फेनिके, सायप्रस व अंत्युखिया येथे गेले व त्यांनी केवळ यहूदीयांनाच वचन सांगितले.

  3. तरी, सायप्रस व कुरेने, येथून अंत्युखिया येथे गेलेल्या काही लोकांनी प्रभू येशूंविषयीची शुभवार्ता ग्रीक लोकांनाही सांगितली.

  4. यरुशलेम येथे असलेल्या मंडळीने जेव्हा ही बातमी ऐकली, तेव्हा त्यांनी बर्णबाला अंत्युखियास पाठविले.

  5. जेव्हा तो त्याला भेटला, त्याने त्याला अंत्युखिया येथे आणले. बर्णबा व शौल दोघेही वर्षभर मंडळ्यांमध्ये अनेक लोकांना भेटून शिक्षण देत राहिले. अंत्युखिया मध्येच शिष्यांना ख्रिस्ती हे नाव प्रथम मिळाले.

  6. याकाळात काही संदेष्टे यरुशलेमकडून खाली अंत्युखियास आले.

  7. आता अंत्युखिया येथील मंडळीत संदेष्टे व शिक्षक होते: बर्णबा, शिमोन, ज्याला निगेर देखील म्हणत, कुरेनेचा लूक्य, मनायेन ज्याचे संगोपन मांडलिक हेरोद राजाकडून झाले होते आणि शौल.

  8. अत्तलियाहून ते तारवात बसून अंत्युखियास आले, आता जे कार्य त्यांनी पूर्ण केले होते त्यासाठी याच ठिकाणी त्यांना परमेश्वराच्या कृपेवर सोपविण्यात आले होते.

  9. मग प्रेषित आणि वडीलजन व सर्व मंडळीने ठरविले की त्यांची काही निवडलेली माणसे अंत्युखियास पौल व बर्णबा यांच्याबरोबर पाठवावीत. त्यांनी यहूदाह ज्याला बारसब्बास असेही म्हणत असत व सीला यांना निवडले. हे दोघे विश्वासणार्‍यामधील पुढारी होते.

  10. त्यांनी आपल्याबरोबर नेलेल्या पत्राचा मजकूर असा होता: प्रेषित, वडीलजन आणि बंधुवर्ग यांच्याकडून, अंत्युखिया, सिरिया व किलिकिया येथील गैरयहूदी विश्वासणार्‍यांना: सलाम.

  11. ती माणसे तिथून खाली अंत्युखियात आली आणि तिथे पोहोचल्यावर त्यांनी सर्व मंडळीला एकत्र जमवून ते पत्र त्यांच्याकडे सोपविले.

  12. पौल व बर्णबा अंत्युखियामध्ये राहिले, तिथे ते व त्यांच्याबरोबर अनेकांनी शिक्षण दिले आणि प्रभूच्या वचनाची घोषणा केली.

  13. जेव्हा तो कैसरीया येथे पोहोचला, तेव्हा तिथून तो वर यरुशलेमकडे आला आणि तेथील मंडळीला अभिवादन करून तो अंत्युखियास गेला.

  14. जेव्हा केफा अंत्युखिया येथे आला, तेव्हा मी त्याच्या तोंडावर त्याला विरोध केला, कारण तो दोषी होता.