Skip to content

Stephen

7 वचने

Stephen चा उल्लेख असलेली वचने

  1. गटातील सर्वांस हा प्रस्ताव योग्य वाटला. त्यांनी स्तेफनाची निवड केली, जो विश्वासाने आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता; फिलिप्प, प्रखर, नीकानुर, तीमोन, पर्मिना व नीकलाव हा अंत्युखियाचा असून यहूदी मतानुसार त्याचे परिवर्तन झालेले होते

  2. आता स्तेफन परमेश्वराच्या कृपेने आणि सामर्थ्याने परिपूर्ण असा मनुष्य होता आणि त्याने लोकांमध्ये मोठी आश्चर्यकृत्ये व चिन्हे केली होती.

  3. परंतु लिबेर्तिन (असे ज्यास म्हणत होते त्या) सभागृहातील काही सभासद, कुरेनेकर, आलेक्सांद्रेयकर आणि किलिकिया व आशिया प्रदेशातील यहूदी लोक स्तेफनाबरोबर वादविवाद करू लागले.

  4. ते स्तेफनाला दगडमार करीत असताना, स्तेफनाने प्रार्थना केली, “प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार करा.”

  5. भक्तिमान लोकांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी मोठा शोक केला

  6. स्तेफनाचा वध झाल्यानंतर छळामुळे जे इतरत्र पांगले होते ते प्रवास करीत फेनिके, सायप्रस व अंत्युखिया येथे गेले व त्यांनी केवळ यहूदीयांनाच वचन सांगितले.

  7. आणि तुझा रक्तसाक्षी स्तेफनाचे रक्त सांडत होते, तेव्हा मी त्याला मान्यता देत उभा होतो आणि जे धोंडमार करीत होते त्यांचे काढून ठेवलेले अंगरखे मी राखीत होतो.’